Sunday 30 April 2017

"तू कोण आहेस?"

मी पार्टनर ला विचारलं "तू कोण आहेस?"

त्याने विचारलं "म्हणजे?"

मी विचारलं "तुझा धर्म कोणता?"

दोन मिनिटे तो शांत बसून राहिला. आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो.

मग तो म्हणाला "I am capitalist by brain and socialist at heart"

मी म्हणालो "अरे मला विचारायचं........."

मला मधेच थांबवून पार्टनर म्हणाला "आजच्या जगात तुमच्या तथाकथित धर्माच्या व्याख्या काही कामाच्या नाहीत. एकमेकांशी भांडण्यासाठी उपयोगी येतील कदाचित अन्यथा त्या कालबाह्य झाल्या आहेत. समाजात वागावं कसं याच्याशी संबंधित वेगळे इझम अंगीकारल्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणून म्हणतो माझा मेंदू भांडवलदार आहे तर मन समाजवादी"

"म्हणजे काय जरा उलगडून सांगतो का?" मी विचारलं.

तर म्हणाला "काही नाही, कंपनीचा प्रॉफिट, कॅश इन फ्लो मेंटेन करताना मी कॅपिटलिस्ट असतो. अगदी पक्का. पण जेव्हा कॅश आऊटफ्लो होतो तेव्हा मी सोशालिस्ट होतो. एम्प्लॉईज वेल्फेअर, शासनाला जाणारे टॅक्स, सी एस आर हे करताना माझ्या कपाळावर आठी येत नाही. किंबहुना ते करताना मला बरं वाटतं."

दीड शहाणा आहे हा 

No comments:

Post a Comment