त्यांनतर अनेक घडामोडी घडल्या. कोविड आलं. कोविड मुळे चीनने जगाचा उत्पादक ही आपली विश्वासार्हता पूर्ण गमावली. त्यात भरीस भर म्हणून की काय पण अमेरिका आणि चीन मध्ये आता पराकोटीला पोहोचलेलं ट्रेड वॉर तेव्हा सुरू झालं. सेमी कंडक्टर ची सप्लाय चेन रोखून चीनमुळे अभूतपूर्व गोंधळ झाला. त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकाच नव्हे तर जगातल्या ज्या देशांनी चीनमध्ये प्लांट उभे केले होते, त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली. दक्षिण पूर्व आशियात असलेल्या कमी लेबर कॉस्ट मुळे तिथलेच देश उत्पादक शोधू लागले.
या सर्व देशांमध्ये सशक्त पर्याय उभा राहिला तो म्हणजे भारत. होलसेल मध्ये उपलब्ध असणारं तरुण टॅलेंट पूल, इंग्रजी भाषेशी जवळीक, सॉफ्टवेअर इंडस्ट्री मुळे तयार झालेला ब्रिज, कितीही विवादास्पद असली तरी खोलवर रुजलेली लोकशाही यामुळे जगभरातील उत्पादक भारताचे दरवाजे ठोठावु लागले. . आपण सुद्धा प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह देत या हे दरवाजे उघडले. सर्वच क्षेत्रात गुंतवणूक आल्या पण या इंसेंटिव्ह चा सगळ्यात मोठा दावेदार ठरला तो मोबाईल उत्पादक.
मोबाईल उत्पादनाने भारतातील केलेली नेत्रदीपक प्रगती अचंबित करणारी आहे. दक्षिण भारतातील चेन्नई, होसुर आणि बंगलोर हा पट्टा तर उत्तर भारतात नोएडा मध्ये आज जवळपास ३०० कंपन्या मोबाईल उत्पादन करत आहेत. याचा परिणाम असा झाला की आठ एक वर्षांपूर्वी प्रत्येक मोबाईल फोन आयात करणारा भारतीय ग्राहक आजच्या घडीला प्रत्येक मोबाईल फोन आपल्याच इथे उत्पादित केलेला वापरतो.
यातील पुढची आकडेवारी तर डोळे दिपावणारी आहे. मोबाईल उत्पादनाची निर्यात गेल्या दहा वर्षात शंभर पट वाढली आहे. आजच्या मितीला भारत रु १.२ लाख करोड किमतीचे मोबाईल निर्यात करतो. अमेरिकेत आयात केले जाणारे स्मार्ट फोन भारतात सगळ्यात जास्त बनतात. इथे आपण चीनला मागे टाकलं आहे. आजवर या क्षेत्राने जवळपास १५ लाख डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट रोजगार निर्मिती केली आहे.
आता कुणी म्हणेल की या सगळ्या उत्पादक कंपन्या बाहेरच्या देशातील आहेत. हे मान्य केलं तरी हे लक्षात ठेवायला हवं की एकदा तुम्ही इथल्या जमिनीवर उत्पादन चालू केलं की त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो तो त्या देशाच्या अर्थ व्यवस्थेला आणि इथल्या लोकांना. १९८३ मध्ये वसलेल्या मारुती सुझुकी चा सगळ्यात मोठा उत्पादक भारत आहे आणि त्यांचं वाहन क्षेत्रातील काँट्रिब्युशन हे वादातीत आहे.
मोबाईल पाठोपाठ आता सेमी कंडक्टर इंडस्ट्री गुंतवणूक घेऊन उभी आहे. मोबाईल इंडस्ट्री स्थिरस्थावर होईपर्यंत सेमी कंडक्टर इंडस्ट्री भरतीय उत्पादन क्षेत्रात हलचल निर्माण करणार आहे.
मागील अडीच दशकं सर्व्हिस इंडस्ट्री ने गाजवल्यावर किमान पुढचे दशक उत्पादन क्षेत्र, त्यातही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गाजवणार अशी चिन्ह तरी सध्या दिसत आहेत.
No comments:
Post a Comment