नमस्कार,
सप्रेम भेट म्हणून The Drought Within नावाचं पुस्तक आपल्याला कुरियर ने पाठवलं आहे. त्याचा स्वीकार व्हावा.
हे पुस्तक खास भेट म्हणून पाठवण्यामागे काही कारण आहे. सदर पुस्तक फेबु मित्र शिवा आयथळ याचा पंधरा वर्षीय मुलगा गणेश आयथळ याने लिहिलं आहे. आणि विषय आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येईल याची फिक्शन पद्धतीने केलेली मांडणी.
त्याचं साहित्यिक मूल्य चांगले आहे असं मला वाटतं. अर्थात मी एक वाचक आहे, समीक्षक नाही. पण हे पुस्तक partridge नावाच्या पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलं आहे जी पेंग्विन ची शाखा आहे यातच सगळं आलं. एखादं पुस्तक प्रकाशित करण्याअगोदर ते वेगवेगळ्या कसोटीवर कसं चेक केलं जातं याची माहिती मी जेव्हा ऐकली तेव्हाच त्याच्या गुणवत्ते बद्दल खात्री वाटली.
चकित करणारा भाग हा की एक पंधरा वर्षाचा मुलगा, आणि पुस्तकाची संकल्पना त्याच्या डोक्यात आली तेव्हा तो एक दोन वर्षाने लहान असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर किती सखोल विचार करू शकतो. याशिवाय कौटुंबिक आणि सामाजिक सुसंवाद/विसंवाद याचं वर्णन बघून आपण स्तिमित होतो.
या पुस्तकातील चित्रे शिवा च्या एका विद्यार्थ्याने काढली आहेत. त्याचं वैशिष्ट्य असं की तो निराशेने त्रस्त होता. गणेश चं हस्त लिखित त्या मुलाच्या हातात शिवाने दिलं आणि त्या मुलाने झपाटल्यासारखं वाचून काढलं आणि एक वेगळीच ऊर्जा त्याला मिळाली आणि त्याने ते तीस चाळीस चित्र शिवाला प्रसांगानुरूप काढून दिली. आणि तो मुलगाही निराशेच्या गर्तेतून बाहेर पडला आहे.
पुस्तकाचं नाव आपले फेबु मित्र आर बी देशपांडे यांनी दिलं आहे.
शिवा अन गणेश आयथळ या बाप लेकाने ह्या पुस्तकाचे उत्पन्न शेतकऱ्यांचं rehabilitation करण्यासाठी वापरण्याचं ठरवलं आहे.
एकंदरीतच ह्या पुस्तकाची कल्पना, संकल्पना मला मनोमन आवडली. म्हणून या संकल्पाचा अत्यंत छोटा का असेना आपला सहभाग म्हणून काही प्रती आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवत आहे. मला खात्री आहे तुम्हाला ही भेट नक्कीच आवडेल.
पुन्हा एकदा सस्नेह नमस्कार.
राजेश मंडलिक