गुणवत्तेच्या जगात आपलं स्वागत आहे!
फोर्टिस केबल्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय वायर्स आणि केबल्स उद्योगक्षेत्रातील एक तरुण कंपनी आहे. २०१७ साली चालू झालेल्या फोर्टिस चे मुख्य कार्यालय पुणे इथे आहे. फोर्टिस वेगवेगळ्या क्षेत्रातील वायर्स, आणि केबल्स उत्पादित करते ज्यांचा वापर गृह प्रकल्प तसेच औद्योगिक इमारती यासाठी तर होतोच पण दूरसंचार क्षेत्रात पाण्याखाली जाणाऱ्या तारा तसेच वाहन उद्योग व रेल्वे साठी लागणाऱ्या तारांचं उत्पादन पण फोर्टिस करते.
या क्षेत्रात फोर्टिसने नुकताच प्रवेश केला आहे आणि त्याचे काही फायदे आहेत. आम्ही अगदी कोऱ्या पाटीवर लिहायला चालू केलं आहे आणि त्यामुळे आम्ही उच्च गुणवत्ता धोरण अवलंबलं आहे. आणि त्यामुळेच आमचे उत्पादन हे इतरांपेक्षा वेगळे ठरते. जरी उत्पादनाची प्रोसेस अवघड आहे किंवा आमचं प्रॉफिट मार्जिन कमी आहे तरी त्याचा परिणाम आम्ही गुणवत्तेवर होऊ देत नाही आणि याबाबत आम्ही सदैव दक्ष असतो.
होमफोर्ट, जे आमच्या गृहप्रकल्पासाठी लागणाऱ्या तारांचं ब्रँड नेम आहे आणि फ्लेक्सिफोर्ट, हे औद्योगिक इमारतींसाठी वापरल्या जाणाऱ्या तारांचं नाव आहे, ही दोन्ही उत्पादने ३ PRO तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादित केली जातात. त्या वायर्सचे कोअर हे उष्णता रोधक आहेत आणि ८५ डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वापरू शकता, तीन थरांमध्ये त्याचं इन्सुलेशन आहे ज्यामुळॆ करंटची गळती कमी होते आणि त्याचबरोबर त्या विशिष्ट इन्सुलेशन मुळे सुरक्षेची हमी जास्त मिळते.
या प्रॉडक्टस बरोबर वाहन उद्योग, रेल्वे आणि दूरसंचार उद्योगासाठी लागणाऱ्या वायर्स मध्ये सध्याच्या प्रचलित गुणवत्तेच्या आणि सुरक्षेच्या मापदंडापेक्षा आम्ही वरचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला आहे.
आमचा प्रवास नुकताच चालू झाला आहे, पण खूप काही घडलं आहे. एका वर्षातच आम्ही गुणवत्ता, वातावरण आणि सुरक्षेशी निगडित BIS, CE, ERDA, CPRI, RoHS तसेच ISO 9001, 14001, 18001 आणि TS16949 ही प्रमाणपत्रं प्राप्त केली आहेत. आणि वर उल्लेख केलेल्या सर्व केबल्स आणि वायर्स चं उत्पादन जोमाने चालू केलं आहे. येणारं भविष्य उज्वल आहे याबद्दल शंका नाही.
आपण आता एकमेकांशी संलग्न असणार आहोत आणि आम्ही तुम्हाला आमची कथा, भविष्याबद्दलचे प्लॅन्स आणि उत्पादनाविषयी माहिती देणारंच आहोत. पण सगळ्यात आधी फोर्टिस वर विश्वास ठेवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देतो. फोर्टिस कुटुंबात आपलं स्वागत आणि त्या निमित्ताने एक किट आपल्याला पाठवत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा ही विनंती. फोर्टिस च्या प्रॉडक्टसची विक्री करण्यासाठी हे किट उपयुक्त असेल याबाबत खात्री आहे.
भविष्यातील दमदार आणि यशस्वी व्यावसायिक संबंधासाठी आपण एकमेकांशी कटिबद्ध राहू यात.
आपला
अय्याज हमीरानी
व्यवस्थापकीय संचालक
फोर्टिस केबल्स प्रायव्हेट लिमिटेड