"तुला म्हणून सांगतो रामभाऊ, पण काय भारी चव होती या हॉटेलची दहा एक वर्षांपूर्वी! तब्येत खुश एकदम. पण आजकाल चव बिघडली यांची"
"शक्यता आहे. पण कुणास ठाऊक हॉटेलच्या पदार्थांची चव तशीच असेल. कदाचित अशीही एक शक्यता आहे की गेल्या दहा वर्षात वयोमानाप्रमाणे तुझ्या जिभेची चव बिघडली असेल."
"भावा, नेहमी लक्षात ठेव. तुझे पंचेंद्रिय कालमानानुसार घासत जा. चष्मा साफ कर, कान हलके होऊ देऊ नको, स्पर्श झाला तर अवघडु नको आणि प्रत्येक गोष्टीत चूक हुंगू नकोस."
रामभाऊ रॉक्स, मी शॉक्स.
"भावा, नेहमी लक्षात ठेव. तुझे पंचेंद्रिय कालमानानुसार घासत जा. चष्मा साफ कर, कान हलके होऊ देऊ नको, स्पर्श झाला तर अवघडु नको आणि प्रत्येक गोष्टीत चूक हुंगू नकोस."
रामभाऊ रॉक्स, मी शॉक्स.
No comments:
Post a Comment