Wednesday 31 July 2024

पुणे

नाही म्हणजे वाईट याच गोष्टीचं वाटतं की पुण्याची ही कॅन्सरस ग्रोथ चालू झाली तेव्हा टेक्नॉलॉजी आपल्या कवेत आली  होती. इंटरनेट मुळे जग जवळ आलं होतं. संख्याशास्त्र आणि तर्कशास्त्र हे पण विकसित झालं होतं. त्याच्याशी संबंधित संगणक प्रोग्रॅम तयार झालेले होते. तरी आपल्या राजकारण्यांनी, नोकरशहांनी आणि त्यांच्या कंत्राटदारांनी व बांधकाम व्यावसायिकांनी शहराची व्यवस्थित ग्रीस लावून ठासली. त्यांनी टेकड्या सोडल्या नाही, नदी काठ सोडले नाही, जिथं म्हणून शक्य आहे तिथं आपल्या अक्कलशून्यतेने अगदी सिस्टेमॅटिक वाट लावली. एकेकाळी अत्यंत कडक नियमावली असलेल्या या शहराची अंधाधुंद वाढ झाली आणि तिला साथ मिळाली ती नागरिकांच्या बेशिस्तीची. 

या शहराचे प्लॅनर जगभर अभ्यास दौरे करत असतात तरीही यांना स्वयंकेंद्रित स्वभावामुळे स्वतःच्या तुंबड्या भरण्यात फक्त सुख दिसतं. ही लोक पूल कसेही बांधतात, चुकीचे बांधले म्हणून पडतात, रस्त्याच्या कंत्राटदाराकडून अनिर्बंध पैसे खातात आणि शहरातल्या नागरिकांना रस्त्यावर बेवारस सोडून देतात. दुचाकी चालवणारी लोक अक्षरश: शीर तळहातावर ठेवून गाड्या चालवत असतात. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन एखाद्या तरुणाचा जीव जातो आणि त्याचा हतबल बाप एकहाती खड्डे बुजवण्याची मोहीम घेतो. त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात, पण त्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांचं मन द्रवत नाही. ते पुन्हा पुन्हा तितकीच घाण करत असतात आणि नागरिक लाचार होऊन जगत राहतात.

आम्ही टेक्नॉलॉजी च्या मदतीने डिजिटल पेमेंट चा जगात डंका बडवतो पण एक माईचा लाल इथं पैदा होत नाही की जो डिफेक्ट फ्री सिगनल रस्त्यावर बसवेल, त्याला व्हिजन कॅमेरा ची साथ देईल. कुणाचा तरी उठतो, सिग्नल चे खांब रोवून मोकळा होतो. त्याची प्रणाली काय आहे, परिणामकारकता काय आहे, अचूकता काय आहे याची कुणाला झाट पडलेली नसते. असले भंगार रोड अन त्या जोडीला ही बेशिस्त इको सिस्टम. मग गाड्या चालवणारे वाहतूक शिस्तीला खुंटीला टांगतात. तरुण, म्हातारे, पुरुष, बायका होलसेल मध्ये शिस्तीला गाड्या चालवताना फाट्यावर मारत असतात. ते सिग्नल तोडतात, रस्त्याने उलट बाजूने येतात, नो एन्ट्री मध्ये गाड्या चालवतात, मूर्खासारखी पार्किंग करतात. अगोदरच बोजवारा उडालेल्या सिस्टमला अजून खड्ड्यात घालतात. 

आम्हाला कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची त्याची अक्कल नाही, ओला आणि सुका कचरा वेगळा कसा ठेवावा याचं तारतम्य नाही, नदीचं पाणी स्वच्छ कसं ठेवायचं ते खिजगणतीतही नाही, बंदी टाकूनही तो घाणेरडा गुटखा खाऊन लोक पचापच रस्त्याने थुंकत असतात, प्लास्टिक च्या पिशव्यांची बंदी आम्ही झुगारून टाकतो. आम्हाला ऑर्गनाईझ्ड केऑस करायला खूप आवडतो. 

एकेकाळी देशाची सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधाचं शान असलेलं शहर आता बकाल, रोगांच्या साथीचे, रस्त्यावरील अपघातांचे, ड्रग्ज चे, अनिर्बंध बांधकामे केल्यामुळे आलेल्या पुराचे शहर म्हणून ओळखू लागले आहे ही एक दुःखद शोकांतिका आहे. 

  

Monday 8 July 2024

 

1)     तर साधारण पणे १९९५-९६ ची गोष्ट असेल. एफ सी रोडच्या एका हॉटेल मध्ये मी माझ्या साहेबाचे रुमचे बुकिंग करायचो. त्यावेळेला एका रात्रीचे २५०० रु मोजायचो. सागर प्लाझा त्या काळात ३००० रु चार्ज करायचे एका रात्रीचे.

१९९७ साली मी दिल्ली ला प्लास्ट इंडिया साठी गेलो होतो. कॅनॉट प्लेस ला मरिना इंटरनॅशनल मध्ये राहिलो होतो तेव्हा एका रात्रीचे ३००० रु मोजले होते वट्ट. खाणं, लॉंड्री, राहणं मिळून इतकं बिल झालं होतं की माझी क्रेडिट कार्ड ची लिमिट क्रॉस झाली होती.

त्याच सुमारास बोनी, माझा बॉस, विमानाने यायचा बंगलोर हुन. दररोज विमान असायचं. पण एकच. एक दिवस एअर इंडिया चं (तेव्हाची इंडियन एयरलाइन्स) तर एक दिवस जेट चं. आणि भाडं असलंच काहीतरी ३००० रु वगैरे.

आज वीस वर्षे झालेत. ते एफ सी रोड च्या हॉटेल कडे ढुंकून पण बघत नाही कुणी. गुरगाव मध्ये लेजर इन २३०० रु मध्ये मिळतं, प्राईड जास्तीत जास्त ४५००. एरो सिटी चं असेल तर ५०००. हैद्राबाद चं मारीगोल्ड मिळतं ४००० ला तर चेन्नई चं जेपी नावाचं कोयंबेडू चं अफलातून हॉटेल २८०० रुपयेमध्ये.

आज पुणे बंगलोर मध्ये आज दिवसाला वीस एक फ्लाईट आहेत. ऍडव्हान्स मध्ये तिकीट काढलं तर २२०० मध्ये तिकीट मिळतं. परवा दिल्ली बंगलोर तिकीट २३५० मध्ये मिळालं.

नाही पण हे मी तुम्हाला का सांगतोय? लाल करायची म्हणून. ती तर करायचीच आहे, पण इथे महत्व अधोरेखित होतं ते कॉम्पिटिशन चं. ती झाली आहे म्हणून किमती कमी झाल्यात. पुरवठा आणि मागणी याची सांगड असली की ग्राहकाला स्वस्त भावात चांगली सर्व्हिस मिळते.

हो, पण आज का? काही नाही, आमचा पण एक स्पर्धक पुण्यात शॉप थाटतोय. सुरुवातीला धास्तावलो होतो. पण मग विचार केला, येतोय ते बरंच आहे. स्पर्धा नाही म्हणून येणारा बिझिनेस गिळून अजगरासारखा सुस्तावलो होतो. थोडी मोनोपोली ची सुखनैव भावना मनात रुंजी घालत होती. आता बरोबर पाय लावून पळेल. सर्व्हिस अजून चांगली देईन. किंमत पण वाजवी ठेवेल. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवेन.

स्पर्धा कितीही आली तरी एक वास्तव मात्र कुणीही हिरावू शकणार नाही, अन ते म्हणजे हा स्पिन्डल रिपेयरचा बिझिनेस organised पद्धतीने करणारी भारतातील आमची पहिली कंपनी. फक्त "Father of Low Cost Airlines" म्हणून गौरवले गेलेले कॅप्टन गोपीनाथ हे नाव स्पर्धेमुळे जसं अस्तंगत झालं तसं आमच्या कंपनीचं होऊ नये, हीच मनोकामना.......दिल से ( स्पर्धा का महत्वाची ते थोडं स्पष्ट करावं लागेल, एक पॅरा अॅड करणे )-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


व्य व्यवसायात स्पर्धा असणं हे अपरिहार्य आहे. तरीही बरेच व्यवसाय हे स्पर्धेला थ्रेट समजतात. किंबहुना व्यवसायात स्पर्धा नसेल तर मोनोपॉली तयार होण्याची शक्यता असते. कदाचित त्यातून आत्मसंतुष्टता येण्याची शक्यता असते. आणि कुणास ठाऊक अल्पसंतुष्टता पण येऊ शकते. व्यवसायात स्पर्धा असेल तर आपल्याला नाविन्यपूर्ण कामाच्या पद्धतीचा अंगीकार करावा लागतो. व्यवसायातील कुठल्याही विभागात कौशल्य विकास करणं हे क्रमप्राप्त होतं. त्यामुळे साहजिकच व्यवसायातील संबंधित सर्व लोकांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांचे व्यवस्थापकीय कौशल्य, आपत्कालीन व्यवस्थापन, ग्राहक असंतुष्ट असेल तर त्याचे व्यवस्थापन, उत्पादनाचे गुणवत्ता व्यवस्थापन या आणि अशा अनेक आघाड्यांवर काम करत त्यात सुधारणेला सातत्याने वाव असतो. 


स्प    स्पर्धा नसेल तर ग्राहकाला काय मिळतं याचं उत्तम उदाहरण १९८० च्या अगोदरचे वाहन उद्योगाचे ग्राहक सांगू शकतील. अवजड उद्योगामध्ये टाटा आणि अशोक लेलँड, कार्स मध्ये हिंदुस्थान मोटर्स (अम्बॅसॅडर) आणि प्रीमियर ऑटोमोबाइल्स (फियाट) आणि दुचाकी वाहनामध्ये बजाज आणि एपीआय (लॅम्ब्रेटा) आणि फारतर एल एम एल. अत्यंत सुमार दर्जाचे वाहन फक्त स्पर्धा नसल्यामुळे त्या काळातील लोकांवर थोपले गेले. १९८३ मध्ये आलेली मारुती सुझुकी आणि त्यानंतर १९९१ नंतर आपण जागतिकीकरणाचा भाग झाल्यावर अनेक वाहन उद्योग याने