आजकाल नेटवरील बरेच तथाकथित विद्वान आपापल्या नावडत्या नेत्यांवर आगपाखड करत असतात़ बरं या लोकांचा त्या विषयांवर फार अभ्यास असतो असेही नाही. काहीतरी उथळ माहितीवर हे लोक बिनधास्त हाणामारी करत असतात़. गांधी, टिळक, फुले, अंबेडकर, सावरकर, बोस ही हिमालयाएवढी माणसं़. उत्तुंग असे त्यांचे कार्य. या आणि अशा अनेक लोकांच्या पायाशी राहण्याची आपली पात्रता नाहीं. हे विसरुन आपणातील काही लोक या वन्दनीय लोकांवर अश्लाघ््य आरोप करत असतात़. आणि मुख्यत: की ही महामानवं तुमच्याआमच्यासारखी हाडामासांची माणसं़ होती. त्यांच्या महनियतेमुळेच त्या काळातल्या लोकांनी त्यांना ने,तृत्व दिले़. त्यामुळे त्यांच्या कृतीचे दूरगामी चांगले परिणाम आपल्याला भोगायला मिळतात. आणि ज़र त्यांच्याकडून ज़र काही चूका झाल्या असतील तर त्यांचे परिणामही दिसणार. पण त्यावरुन त्यांच्या उद्देशांवर शंका घेण्यापेक्षा आजच्या काळाला सुसंगत असे निर्णय समाजानी वा देशानी घेणे जास्त संयुक्तिक ठरते़ देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हा सर्वांचा एककलमी कार्यक्रम होता. त्यांचे मार्ग कदाचित भिन्न असतील, पण त्यांचा हेतूच एवढा उदात्त होता की त्यांनी अवलंबलेला मार्ग हा बरोबर की चूक यावर आजच्या काळात वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीं. किंबहुना मिळालेले स्वराज्य हे सुराज्यात कसे परिवर्तित यावर आपल्या लेखण्या आणि पर्यायाने मेंदू झिजले पाहिजेत.
No comments:
Post a Comment