Saturday, 20 December 2025

मी जेव्हा अगदी छोट्या स्वरूपात व्यवसाय चालू केला होता तेव्हा त्याच को ऑपरेटिव्ह बँकेत आम्ही खातं उघडलं होतं. १९९९ साली जेव्हा प्रशिक्षणासाठी स्वित्झर्लंड ला जायची संधी मिळाली तेव्हा आमच्या कडे पैसे नव्हते तेव्हा याच बँकेने आम्हाला रु ५०००० कर्ज दिलं होतं. इतकंच नव्हे तर ५०० डॉलर्स घेण्यासाठी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तिथल्या लोकांनी डॉलर्स बरोबर पोतंभरून कौतुक पण दिलं होतं. 

पुढे त्या छोट्या व्यवसायाने बाळसं धरलं आणि जेव्हा कधी पैशाची गरज लागली तेव्हा त्यांनी आम्हाला टर्म लोन दिलं. सगळं व्यवस्थित चालू होतं. 

२०१० च्या सुमारास आम्हाला एक चेक आला होता. काही लाखाचा चेक होता. ज्या कंपनीचं पेमेंट होतं ते खूप फॉलो अप करून आम्हाला मिळालं होतं. फक्त एक चूक झाली होती. स्पिंडल मध्ये एन लिहायचं ते विसरले होते. त्यावेळी बँकिंग इतकं कडक नव्हतं. एक लेटर दिलं की चेक पास व्हायचा. असं एकदा आधीच्या मॅनेजर ने क्लिअर पण केला होता. पण यावेळेस मात्र त्याच बँकेचा मॅनेजर अडून बसला की चेक क्लिअर करता येणार नाही. मी खूप मिनतवारी केली की प्लिज चेक क्लिअर करा, खूप कष्टाने पेमेंट मिळालं आहे. अमाउंट मोठी आहे. नवीन पेमेंट करायला वेळ लागेल. मला पैशांची गरज पण होती. पण मॅनेजर साहेब काही बधले नाही. शेवटी मी चेक परत घेऊन आलो आणि महिन्याने नवीन चेक मिळाला. 

बँक मॅनेजर च्या वागण्याने मी खूप हर्ट झालो. डोक्यात तिडीकच गेली म्हणा ना. मी दुसऱ्या एका मोठ्या प्रायव्हेट बँकेत अप्रोच झालो आणि अकौंट उघडलं. हळूहळू माझं बँकिंग पहिल्या बँकेकडून नवीन बँकेत शिफ्ट होऊ लागलं. दोन-तीन वर्षात आमचं बहुतेक बँकिंग या मोठ्या बँकेमार्फत होत गेलं. गेल्या सहा सात वर्षात त्या पहिल्या को ऑप बँकेत व्यवहार शून्य झालं होतं. 

आम्ही अकौंट क्लोजर चा फॉर्म भरल्यावर तिथून तीन अधिकारी आले काल आणि अकौंट बंद करू नका म्हणून रिक्वेस्ट करत होते. पण आता खूप उशीर झाला होता. चांगले रिलेशन्स असून सुद्धा केवळ एका माणसाने अडमुठेपणा दाखवल्यामुळे बँकेने एक चांगला कस्टमर गमावला होता. कदाचित त्यावेळेस आमचं अकौंट मोठं नसावं पण व्यवसायाचं आताचं स्वरूप बघता त्या अधिकाऱ्यांना जाणवलं असावं की आपण एक मोठा ग्राहक गमावला आहे ते. 

असं आमच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचदा होतं. एखाद्या कस्टमरला आम्ही वर्षानुवर्षे सर्व्हिस देत असतो. शेकडो स्पिंडल रिपेअर केले असतात. पण एखाद्या स्पिंडल मध्ये आम्ही दर्जा राखू शकत नाही किंवा काही मोठी चूक होते. आधीच्या कामाची पुण्याई इथं बऱ्याचदा कामाला येत नाही. कस्टमर आम्हाला ब्लॅक लिस्ट करून टाकतो. (दुसरी कडे हात पोळल्यावर परत आले पण आहेत). 

व्यवसायाचा हा एक अवघड मुद्दा आहे. इथं चुकीला माफी नाही. प्रत्येक व्यवहार हा कस्टमर सेन्ट्रीसिटी च्या कसोटीवर खरा ठरावा लागतो तेव्हा कुठं सस्टनेबल व्यवसाय उभा राहतो. 

No comments:

Post a Comment