तसं लाच दयायचा प्रसंग राकेश वर कमी वेळा आला. म्हणजे २/३ वेळा. पण जेव्हा आला, एकदम खणखणीत. शे मध्ये नाही, एकदम हजारात. ठाण्याच्या एका बंद पडलेल्या विभागात १९९६ मध्ये मोजले होते रु २००००. मटेरिअल सोडवण्यासाठी. १५ दिवस करमत नव्हतं, सारखी १०० ची दोन बंडलं दिसायची स्वप्नात.
दुसर्या एका ठिकाणी एक परवानगी हवी होती. राकेश गेला केबिन मध्ये. बाई होत्या. सावंत नावाच्या. (नाव बदललं आहे). बापू नावाचा accounts चा माणूस होता बरोबर. रु ५००० पर्यंत द्यावं लागेल. आधीच सांगितलं होतं. सावंत बाईंचे मिस्टर *********** नावाच्या वाहन उदयोगात Sr Manager होते.
राकेश : सावंत साहेब ओळखीचे आहेत. (५ चे काय ४ किंवा ३ होतात का या आशेवर)
बाई: हो का? अरे वा छान.
(बाकी पेपर तपासल्यावर)
बाई: हा, ठीक आहे १०००० दया
(केबिन चा दरवाजा उघडा, पण आवाज खणखणीत)
राकेश: वरचे ५ कसली फी का? receipt मिळेल का?
बाई: अहो नाही, माझेच १००००.
राकेश: अहो फार होतात. छोटी कंपनी आहे
बाई: होईल कि मोठी. ********** चे supplier ना तुम्ही. छोटे का राहणार आहात. ते काही नाही देऊन टाका १०. मिळून जाईन permission ३-४ दिवसात.
झक मारली आणि मिस्टर सावंतांची ओळख सांगितली असं झालं.
मुंबई ला गेला होता. असंच मटेरियल अडकलं होतं एका ठिकाणी. courier कंपनीचा फोन आला सप्लायर ने invoice मध्ये चुकीचा आयटम लिहिला आहे. माहिती नव्हतं आणि त्यातून गोंधळ उडाला होता, पैसे दयावे लागतील. राकेशनी विचारले "किती" तर म्हणाला "आणा १० पर्यंत" अडकलेल्या material ची किंमत साधारण लाखापर्यंत होती. राकेश गेला साहेबाच्या केबिन मध्ये. साहेब म्हणजे स्मार्ट पोरगा होता तिशीतला. जीन्स trouser, उंची t shirt, Italian shoes थाट होता नुसता. तिवारी नाव ठेवू त्याचं.
तिवारी: (खुर्चीवर रेलत, हात डोक्यावर नेत) हा, क्या है भाई.
राकेश: साब वो मटेरियल
तिवारी: हा बोलो
राकेश: आप ही बोलो
तिवारी: ३०,००० लगेगा
(राकेश उडालाच )
राकेश: साब, गलतीसे हो गया, मालूम नहीं था. छोटी गलती, उसकी इतनी बड़ी सजा.
तिवारी: (बाजूच्या माणसाला) अरे सुन, इनका केस डाल दे. (राकेशला) छः महीने के बाद आना, जो decision होगा देखा जायेगा। ६० तक फ़ाईन हो जायेगा।
राकेश ढिम्म उभा
तिवारी: अच्छा ठीक है, २५ दे दो. बस इसके नीचे नहीं। अरे यंहा पे ५/६ लोगोंको देना पड़ता है, मै अकेला थोड़ी ना हु. इसके बाद किसीको देना नहीं पड़ेगा। ८ दिन में मटेरियल आएगा।
खिशात १० च होते. जवळच भाऊ राहत होता. त्याच्याकडून १५ आणले. आणि गेला परत तिथे. courier कंपनीच्या माणसाला विचारलं, जाऊ का दयायला आत. तो तोंडावर हात ठेवत म्हणाला "अहो, येडे आहात का तुम्ही. तिथे शेवटच्या केबिन मध्ये वाट बघा. तिथे येईल एक जण" राकेश गेला . २-४ लोकं खाली मान घालून काम करत होती. मग आला, कोंकणातला मराठी होता. सुरेश म्हणू त्याला.
सुरेश: राकेश का?
राकेश: हो
सुरेश: २५ घायचे, बरोबर
राकेश: (आश्चर्याने) पण तुम्ही
सुरेश: तुम्हाला काय करायचं, २५ ठरले आहेत ना! दया तेवढे
राकेश नि दिले, आणि थोडया गप्पा मारल्या. हळूहळू कळलं. पण जे कळलं ते धक्कादायक होतं.
सुरेश एका c & f मध्ये कामाला होता. १५००० पर्यंत पगार होता. सारखा यायचा या विभागात. साहेब लोकं ओळखू लागले त्याला. त्यांना गरज लागू लागली, मध्ये कोणीतरी पैसे घेण्यासाठी. मग ते सुरेश ला सांगू लागले. सुरेश गोळा करायचा आणि मग साहेब लोकं त्याला त्या बदल्यात ५००-१००० रु देऊ लागले. पैसा खुळखुळू लागला. काम फारच वाढलं. मग सुरेश नि रेट च फिक्स करून टाकला, रकमेच्या २%. काम वाढलं. महिन्याची कमाई ४०००० झाली. जॉब सोडला आणि फुल टाइम हाच उदयोग. राकेश नि विचारलं "टेन्शन नाही येत" तर म्हणाला "सवय झाली" राकेश नि विचारलं "फसवा फसवी नाही?" "अजिबात नाही, जागच्या जागी हिशोब. इमानदार आहेत लोकं" हसलाच राकेश . बोलता बोलता पैसे मोजले. राकेशनी विचारलं "भाऊ, मटेरीअल येईल ना व्यवस्थित" तर टेचात म्हणाला "बिनधास्त जावा घरी. मी सांगितलं ना, इमानदार आहेत लोकं"
कपाळावर मारून घेतलं आणि निघाला राकेश.
(ध चा मा झाला, तसा ज चा क झाला असं कुणाला वाटत असेल तर ते बरोबर आहे. आणि एकदम विषयाला हात कशाला घालावा म्हणून लेखाचं शीर्षक लाच नाही तर चाल)

No comments:
Post a Comment