दिल्ली च्या कस्टमर चा स्पिंडल repair केला होता. तो म्हणाला पैसे मी तुला पुण्यातच द्यायची व्यवस्था करतो. त्यावेळेस मी फारंच माज करायचो, म्हणजे आधी पैसे मग माल. चितळे किंवा काका हलवाई स्टाईल. मी म्हणालो ठीक आहे.
दुपारी दोन च्या समोर फोन किणकिणला. समोरून एक मंजुळ आवाज आला. स्त्रीचा फोन किणकिणतो, माणसाचा रेकतो. "सर, अमितजी की बहेन बात कर रही हू. वो पैसे कलेक्ट करने के लिए आप आ सकते हो क्या" मी म्हणालो "कहा आना है" ती म्हणाली "मेरे घरपे, पिंपळे सौदागर में" मी "कभी आऊँ" ती "शामको ६:३० बजे"
अहाहा, म्हणजे किती जमेच्या बाजू बघा, एकतर मंजुळ आवाजाची बाई, घरी बोलावते आहे आणि कशासाठी तर पैसे देण्यासाठी. आणि कधी तर संध्याकाळी ६:३० वाजता. एखादी फ़िल्मी situation यापेक्षा वेगळी काय असणार आहे. आता तिची मुलं आजोळी गेली आहेत आणि नवरा टूर वर गेला आहे अशा रम्य कल्पना तुम्ही लढवा. पैसे देण्यासाठी मला कुणीही म्हणजे अगदी कुणीही, अगदी कुठेही बोलावलं तर एका पायावर तयार असतो. तर असो.
शक्यतो मी सकाळी ७:३०-८ ला आंघोळ केली की या हँडसम, पण रंग गेला तर पैसे परत, अशा चेहर्याला परत २४ तासानेच पाणी लागतं. त्यादिवशी मात्र मी कंपनीच्या बाथरूम मधे अगदी साबण लावून खसखस चेहरा धुतला. आमच्या कंपनीत एक हिरो सौंदर्य प्रसाधने आणतो, त्याचाही वापर झाला. तो माझ्याकडे डोळे विस्फारून बघत होता. मी त्याला बाय म्हणत शीळ वाजवत माझ्या मर्सिडीज़ चा स्टार्टर मारला. खरंतर सॅंट्रो होती, पण इतका बहकलो होतो की ती मला मर्सिडीज़ वाटत होती. माहोल तयार व्हायला पाहिजे ना!
पिंपळे सौदागर ला पोहोचलो. एव्हाना माझे २-३ फोन झाले होते अनिताशी. हो अनिताच नाव होतं. खरंतर मी मॅडमच संबोधत होतो, पण मला कळलं की नाव अनिता आहे. इथं लिहायला काय हरकत आहे, नाही का?. चौथ्या मजल्यावर घर होतं. गाडी पार्क केली. (वाॅचमन चा लेख आठवतो का, हो म्हणजे यहाँ नहीं, वहाँ, तेडी लगी थोड़ी सीधा वैगेरे नाटक झालं).
झालं, (कुठे काय, लिहीतो आहे अजून) उद्वाहन यंत्रात, मराठीत लिफ़्ट आणि क्लासिकल इंग्रजीत त्याला एलेव्हेटर असे संबोधतात, लिफ़्ट बरं आहे, बसलो. म्हणजे उभा राहिलो. आणि ती चौथ्या मजल्याकडे कूच करती झाली. तिचा एक स्पीड असणार, पण मला उगाच ती हळू चालली आहे असं वाटत होतं.
आणि अघटित घडलं. लिफ़्ट दुसर्या आणि तिसर्या मजल्याच्या मधे असताना वीज गेली. किती चुकीच्या वेळेला वीज गेली. मॅडम मला ट्रॅक करत असल्यामुळे तिला माहीत होतं की मी लिफ़्ट मधे आहे. लाईट जाऊन लिफ़्ट बंद पड़णे ही माझ्यासाठी फारंच casual गोष्ट होती. कारण जनरेटर बॅक अप वर ती दोन किंवा फारतर पाच मिनीटात चालू होणार हे माहिती होतं. ते न होता अचानक आवाज यायला लागल "वाॅचमन, कहा हो, अरे हमारे गेस्ट है लिफ़्ट में, अभीतक जनरेटर चालू क्यूँ नहीं हुआ. वाॅचमन, वाॅचमन" थोडक्यात यजमानीण बाई अस्मादिकाची चिंता करत ज़ोर जोरात बोंबलत होत्या. फोनवर कसला मंजुळ आवाज होता राव. इथे पहिला भ्रमनिरस झाला.
वाॅचमन पाच मिनीटे झटला जनरेटर चालू करण्यासाठी. त्या असफल प्रयत्नानंतर आणि अनिता मॅडमच्या कोकलण्यामुळे ते काम सोडून तो माझ्या मदतीसाठी वरती धावत आला. त्याच वेळेला अनिता चौथ्या मजल्यावरून तिसर्या मजल्यावर आली. कसली घामाघूम झाली होती, म्हणजे नाकी डोळी नीट्स होती पण त्या वाॅचमनला तिने पार भंडावून सोडलं होतं आणि घाबरल्यामुळे विचित्र दिसत होती. "अरे कुछ तो करो, हमारे मेहमान है. क्या ये सोसायटी है. मेहमान को कुछ हो जाएगा" मी म्हणालो "मॅडम आप घबराइए नहीं, मैं बिलकुल ठीक हू. आप वाॅचमन को बिलकुल
tension मत दिजीए" मग वाॅचमनला म्हणालो "लाईट कभी आएगी" तो "टाईम लगेगा" मी " तो तीसरे माले के गेट का
चाबी है क्या? " तो धावत गेला. गेटवरून चावी घेऊन आला. मनात आलं, काय घडायला पाहिजे होतं आणि काय घडत होतं. हे सगळं बि घडत असताना अनिताची बडबड चालूच होती. मी म्हणालो "बये, जरा गप बसतेस का. मी इथे निवांत आहे आणि तु काय बडबड लावली आहेस" हे सगळं सांस्कृतिक हिंदीत
वाॅचमन आला, त्याने गेट उघडलं. आता मला वर खेचण्याएवढी जागा तयार झाली होती. मी हात वर केला आणि म्हणालो "ओढ़ मला" हे सगळं वाॅचमनला बरं का, नाहीतर तुम्हाला वाटायचं....... मॅडम गालावर हात ठेवून (तिच्याच) माझी आणि वाॅचमन ची कसरत बघत होती. शेवटी जॅकीचॅन सारखी उड़ी मारत मी बाहेर आलो. उपमा जास्तंच भारीची दिली, घ्या सांभाळून. मी वरती आल्यावर मला मॅडम काय करेल या कल्पनाविश्वात असतानाच ती म्हणाली " जाओ, जनरेटर ठीक करो"
यांच्या पुढची गोष्ट फारंच नीरस आहे. म्हणजे वर जाणे, पैसे घेणे आणि निघणे.
खरंतर मी आज चेन्नईत आहे आणि सकाळी पेपर मधे बातमी वाचली लिफ़्ट मधे घाबरून मृत्यु. आपल्यातले पण बरेच जण लिफ़्ट बंद पडली की घाबरतात, आरडओरडा करतात. असं काही करू नका. शांततेत घ्या, तुम्ही व्यवस्थित बाहेर पडाल. लेखातला विनोदाचा भाग सोडून द्या. पण लिफ़्ट शी खेळ करू नका आणि त्याचा जास्त फोबिया ठेवून नका.

No comments:
Post a Comment