१९९४ पासून मी सेल्स मध्ये काम करतोय. एक आठवड्यापेक्षा सलग मी पुण्यात राहिलो आहे असं मला आठवत नाही. पण या कोविड ने ते करून दाखवलं. १४ मार्च ला मी दिल्लीहून पुण्यात आलो. कोविड चं सावट एव्हाना गडद व्हायला लागलं होतं. २० मार्च ला मी चेन्नई ला जायचो होतो, पण पोस्टपोन करून १६ एप्रिल तारीख केली. नंतर मात्र प्लॅन कॅन्सल केला.
१५ मे च्या सकाळी मी अमेरिकेला जायचो होतो, सहकुटुंब. आणि आज परत निघणार होतो. पण आपण काही ठरवतो आणि करोनाच्या मनात काही वेगळं होतं.
पुण्यात आलात आणि रहायला काही प्रॉब्लेम झाला तर कंपनीत राहू शकता हे आवाहान मी आमच्या एम्प्लॉईजला पहिल्या दिवसापासून करतोय. काल आमचा अतुल दीक्षित आला आणि त्याचं प्रायव्हेट हॉस्टेल अजून बंद आहे. तो म्हणाला की मी राहू शकतो का कंपनीत? कंपनीने आनंदाने परवानगी दिली. तो एकटाच कुठे राहणार कंपनीत, म्हणून मी त्याला म्हणालो की मी पण येतो तुझ्याबरोबर कंपनीत राहायला.
एका दगडात चार पक्षी मारले.
- तब्बल तीन महिन्याने घर सोडून राहणार.
- माझी ट्रॅव्हेल बॅग, जी पडून होती, तिला हवा लागणार.
- अतुल ला एक साथ म्ह्णून ते एक समाधान.
ह्या सगळ्या सांगायच्या गोष्टी. पण आज संध्यकाळी, ते स्कॉच ब्राईट नको, ते सिंक नको, तो व्हॅक्युम क्लिनर नको आणि तो मॉप नको.
मै और मेरी तनहाई अक्सर ये बाते.......म्हणत फुल टाईमपास.