कालच्या बावन्नव्या वाढदिवशी आश्चर्यकारकरित्या मला खूप शुभेच्छा आल्या. इथे फेसबुकवर तर आल्याच आल्या पण कंपनीतल्या मुलांनी माझ्याबद्दल फार छान लिहिलं. इथल्या मैत्रगणांशी माझी दोस्ती तर आहेच पण लॉक डाऊन ४ आणि त्यात रविवार यांनी पण हातभार लावला. अन त्यात कडी म्हणजे माझ्या पुस्तकाची प्रकाशिका सानिका वाडेकर, लोकप्रिय मिलिंद शिंदे, श्रीरंग जाधव आणि जयंत विद्वंस हा मित्रत्रिकोण, आपल्या कल्पक डिजिटल मार्केटिंग स्टाईलने वहाण ब्रँड तयार करणारा भूषण कांबळे, ज्यांच्यामुळे या लॉक डाऊन च्या निराशाजनक काळात खूप वेगळी कामं करायची संधी मिळाली ते आपलं घर चे संस्थापक आणि मित्र विजय फाळणीकर, लिहिण्याची चांगली रेंज असणारे हेरंब जोशी उर्फ बगुनाना यांनी फार दिलसे भावना व्यक्त केल्या. त्यांच्या बरोबरच ऋषिकेश मारणे, महेश चव्हाण, सारंग भालेराव, विनय वझे, जयंत अत्रे, प्रणव कुलकर्णी, सुजाता मुनोत यांच्या लिहिण्याने मी काल हरभऱ्याच्या झाडावर बसलो होतो. संध्यकाळी "बास झालं कौतुक. भांडी घासून घे" हा इशारा ऐकल्यावर आपसूक खाली उतरलो.
असो. अजून एक वर्ष गेलं. पण आव्हानं काही संपली नाही आहेत. गेल्या वर्षी एप्रिल पासून परिस्थिती बिघडली ती अजून काही जागेवर येत नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांची मालिका येत गेली. त्यांना तोंड देताना सेटको चे सहकारी, माझ्या घरची लोक आणि इतर मित्रमंडळीची खूप मदत झाली. त्या सगळ्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो.
टाईमलाईन, व्हाट्स अप आणि फोनवर शुभेच्छा आल्या त्यांचे पुन्हा आभार. या करोनाच्या संकटातून जग मुक्त होवो, ही प्रार्थना.
लेथ जोशी चित्रपटासाठी श्री वैभव जोशी यांनी फार सुंदर काव्य रचलं आहे. आमच्या कंपनीच्या एका कार्यक्रमात म्हंटली होती ही कविता. मेधा जाधव यांनी त्याचं व्हिडीओ रूपांतरण केलं आहे. तुम्हालाही आवडेल.

No comments:
Post a Comment