Friday, 6 June 2025

 तुम्हाला सगळ्यांना अ.......अभियंत्याचा चा इंग्लिश अनुवाद An Engineer's Journey to Entreprenueship च्या पुस्तक प्रकाशनासाठी निमंत्रित करताना खूप आनंद होतो आहे. 

या पुस्तक प्रकाशनासाठी श्री आनंद देशपांडे सरांनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचं मान्य केलं तेव्हा मी अक्षरश: सातव्या आसमान वर होतो. ज्याचं नाव हे पुण्यातच नव्हे तर देशात, आणि देशातच का जगात उद्योजकतेशी समानार्थी शब्द म्हणून घेतलं जातं, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या उद्योजकाच्या पुस्तक विमोचनाला येण्याचं मान्य केलं हा मेल पाहिल्यावर कृतज्ञतेची भावना सरसरत गेली.  

ज्याच्यामुळे उद्योजकता म्हणजे नक्की काय हे मला कळलं ते मनीष गुप्ता यांनी सुद्धा येण्याचं मान्य केलं हे अजून एक भाग्य.  

पुस्तक प्रकाशनाचा आनंद तर आहेच पण त्यापेक्षा या दोघांचे उद्योजकतेवरचे विचार हे जास्त प्रेरक असतील याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. 

अ...... अभियंत्याचा प्रकाशित होताना आपलं घर, स्नेहवन आणि आरंभ यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी तीन मला भावलेल्या उद्योजकांचा छोटा सत्कार यावेळेस करणार आहे. त्यामागे भावना ही अवॉर्ड वगैरे अशी नसून एका उद्योजकाने दुसऱ्या उद्योजकांना केलेला सलाम इतकी साधी भावना आहे. 

विक एन्ड ला पुण्यात हॉल उपलब्ध नसतात, त्यामुळे बुधवार २५ जून हा वीक डे कार्यक्रमासाठी ठरवला आहे, मयूर कॉलनी कोथरूड येथील एम इ एस चा हॉल हे ठिकाण आहे, वेळ: संध्याकाळी ६:३० वाजता. 

दोन्ही पाहुणे हे वेळ पाळण्याबाबत प्रचंड दक्ष आहेत, त्यामुळे कार्यक्रम बरोबर ६:३० वाजता सुरू होईल. उद्योजकता, व्यवसाय याबद्दल ऐकायचे असेल तर जरूर कार्यक्रमाला या. काही कारणाने तुम्हाला जमणार नसेल तर तुमच्या तरुण मुलामुलींना पाठवा. तुमची निराशा होणार नाही याची खात्री देतो. 

अ.... अभियंताचा प्रकाशित होताना भरभरून प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही तसाच प्रतिसाद द्यावा ही विनंती. 

भेटू यात. २५ जून २०२५, संध्याकाळी ६ वाजता एम इ एस हॉल, मयूर कॉलनी पुणे ३८. 


No comments:

Post a Comment