Friday, 19 September 2025

स्लो लिव्हिंग

समीर ने स्लो लिव्हिंग हा कन्सेप्ट पकडून एक पोस्ट लिहिली पण ते पूर्ण उलगडून सांगितलं नव्हतं. म्हणून मला जे कळलं ते लिहायचा प्रयत्न करतो. 

सगळ्यात पहिले म्हणजे स्लो लिव्हिंग म्हणजे काय नाही आहे ते सांगतो. स्लो लिव्हिंग म्हणजे आळशी पणा नव्हे. ते म्हणजे विरक्ती येणे नाही. सगळं सोडून निरिच्छता येणे नाही. 

माझ्या मते स्लो लिव्हिंग म्हणजे कॉन्शस पणे जगणं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एखाद्या महत्वाच्या गोष्टीला जास्त वेळ देणे आणि तो ही बिन महत्वाच्या गोष्टीचा वेळ कमी करून. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी ऑफिस ला जाताना वेगाने गाडी दामटणे, हे अनेकांच्या आयुष्याचं रेग्युलर फिचर आहे. मला यासाठी दोन महत्वाची कारणं वाटतात. एक सकाळी उशिरा जाग येणे आणि दुसरं सकाळच्या वेळी मोबाईल चा वापर करणे. 

आता सकाळी लवकर उठायचं असेल तर त्याचा अर्थ कमी झोप घेणे नाही तर आदल्या रात्री लवकर झोपणे. आणि सकाळी ऑफिसला जाण्याआधी मोबाईल कमीत कमी वापरणे. रात्री विनाकारण जागणे आणि सकाळी मोबाईल वापरणे या दोन्ही कमी महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यातला वेळ काढून महत्वाच्या गोष्टीला म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी लवकर निघणे आणि गाडी हळू चालवणे यासाठी देणे. 

अजून एक उदाहरण देतो. बऱ्याच लोकांना बँक टू बँक कमिटमेंट द्यायची सवय असते. म्हणजे चार ते पाच एक मिटिंग घ्यायची आणि मग एक तास प्रवास करून सहा ते सात दुसरी मिटींग प्लॅन करायची. बरं इथं चार ते पाच मिटिंग लांबण्याची किंवा एक तास प्रवास मध्ये ट्राफिक जॅम ची शक्यता अकौंट केलेली नसते. सहाच्या मिटींगला उशीर झाला की दिलगिरी व्यक्त करणे, काही थापा मारणे असा प्रकार करावा लागतो. इथे तुम्ही सहाची मिटिंग साडेसहा ला ठेवणं किंवा अगदीच जमत नसेल तर ती न करणं  संयुक्तिक राहतं. 

यासाठी अजून एक महत्वाचा गुण बाणवावा लागतो. तो म्हणजे प्रायोरटायझेशन. दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पण त्यापैकी गरजेची कुठली आहे हे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एका वेळेस दोन घोडयावर मांड ठोकता येत नाही. 

गरजा कमीत कमी ठेवणे. One can always build ability to get whatever he/she needs, but may not get whatever he/she wants. असं एक इंग्रजी वाक्य खरं आहे. घर, गाडी, सध्या ज्याची क्रेझ आहे तो मोबाईल फोन अशा अनेक गोष्टीबाबत आपण आपल्याला जितकी गरज आहे त्यापेक्षा +१ गोष्टी बाळगायचा अट्टाहास धरतो आणि या गोष्टींमागे पळण्याची सवय लावून घेतो. 

स्लो लिव्हिंग आयुष्याचा जर भाग बनवायचा असेल तर एक साधी गोष्ट सांगतो. आपल्या जगण्याचा मूळ उद्देश शोधणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या मूळ उद्देशच जगण्यामध्ये वर उल्लेखलेल्या भौतिक गोष्टी किंवा पैसे यांचा अगदी थोडा सहभाग असतो. त्यामुळे तो उद्देश एकदा गवसला आणि त्याच्या मागे धावलं तरी त्या धावण्याचा त्रास होत नाही आणि स्लो लिव्हिंग आपसूक जगलं जातं. 

कुणी असं म्हणू शकतं की पैसे कमावता येत नाही म्हणून ही सगळं नाटकं आहेत. पण मी स्वतः अनुभवलं आहे की एक काळ मी फास्ट लाईफ जगायचो, त्याचा स्ट्रेस ही व्हायचा पण आता महिन्यातले पंधरा दिवस बाहेर राहूनही जगाच्या लेखी मी बिझी असेल पण मला स्वतःला स्लो लिव्हिंग जगतो आहे असं वाटतं. 

No comments:

Post a Comment