Saturday, 4 October 2025

गुणवत्ता

मध्ये मी टाटांच्या कार वर निगेटिव्ह कॉमेंट केली म्हणून मला मेसेज आला की "इतर वेळेस टाटा ग्रुपचं गुणगान गाता, मग कार बद्दल हे मत का?" त्यांना काय उत्तर दिलं ते जाऊ द्या पण एखाद्या प्रॉडक्टची स्वीकारार्हते साठी त्याची गुणवत्ता हा पहिल्या क्रमांकाचा गुण लागतो हे मी अनुभवावरून सांगतो. आणि दुसरा गुण लागतो, उच्च दर्जाची सेल्स आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस.

एक गोष्ट सांगतो. आमच्या फिल्ड मध्ये एक सी एम एम नावाचं हाय एन्ड मेट्रोलॉजी इक्विपमेंट लागतं. कार्ल झाईस किंवा हेक्झॉगोन नावाच्या बाहेरच्या प्रॉडक्ट ने मार्केट कवेत घेतलं आहे. त्यामुळे माझे अमेरिकन पार्टनर्स च नव्हे तर माझा क्वालिटी मॅनेजर सुद्धा इंपोर्टेड मशीन विकत घ्यावी या मताचा होता. पण मी मात्र पुणे स्थित ऍक्युरेट गेजिंग म्हणून विक्रम साळुंखे यांची कंपनी आहे, तिच्या पारड्यात वजन टाकलं. कारण मला खात्री होती की ती मशीन आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची आहे. आज ऍक्युरेट ची मशीन गेली दोन वर्षे उत्कृष्ट काम करत आहे.  मेक इन इंडिया विथ ग्लोबल क्वालिटी. 

टाटा ग्रुप च्या टीसीएस ने आमच्या सारख्या छोट्या कंपनीसाठी इऑन नावाची इ आर पी सिस्टम काढली. आम्ही ती वापरली. चांगली क्वालिटी आणि तितक्याच तोडीची सर्व्हिस. आम्ही काही तिकीट रेझ केलं की पटापट सूत्र हलायची आणि प्रश्न सोडवला जायचा. (काही वेगळ्या कारणांमुळे आम्ही दोन वर्षांपूर्वी इऑन वरून दुसऱ्या इ आर पी वर शिफ्ट झालो आहोत)



तर मत असं आहे की मेक इन इंडिया हा ड्राइव्ह छान आहेच. पण ते प्रॉडक्ट विकण्यासाठी, लोकप्रिय होण्यासाठी फक्त तोच निकष नसून गुणवत्ता आणि विक्रीपश्चात उत्तम सेवा हे दोन महत्वाचे निकष आहेत. 

No comments:

Post a Comment