मला असं वाटतं मुलामुलींपेक्षा, बदललेली परिस्थिती असं होण्याला जास्त कारणीभूत आहे. म्हणजे मी जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा डोक्यात एकच गोष्ट फिट होती ती म्हणजे कुठल्या तरी इंजिनियरिंग क्षेत्रातील कंपनीत जॉब ला लागणे. या बेसिक गोलपासून दूर करण्यासाठी कुठलेही एलिमेंट्स कार्यरत नव्हते. ना मोबाईल नव्हते, ना मॉल होते, ना ओटीटी प्लॅटफॉर्म होते, ना टीव्ही होते, ना सोशल मीडिया होता. यु ट्यूब नव्हतं, पॉडकास्ट नव्हतं. हे हात जॉब करण्यासाठी नव्हे तर जॉब देण्यासाठी जन्माला आलेले आहेत अशी आवेशपूर्ण भाषणं देणारी विवेक बिंद्रा सारखे लोक नव्हते. इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालून वडापाव ची गाडी टाकणारे लोक नव्हते किंवा एमबीए चहावाला नव्हता.
याउपर क्षेत्र पण फिक्स. मेकॅनिकल इंजिनियर झाला की ऑटो किंवा त्याचे पार्टस बनवणारी कंपनी, मेकॅनिकल पार्टस किंवा प्रोजेक्ट्स करणारी कंपनी आणि तत्सम. बाकी ब्रांचेस पण हीच तऱ्हा.
मग दिवस बदलत गेले. सगळ्या इंजिनियर्स ला सामावून घेणारे आय टी क्षेत्र आलं, माहितीचा प्रचंड फ्लो चालू झाला. इन्फोडेमिक आलं. अनेक सुविचार, कोट्स यांचा भडिमार युवा तरुणांवर व्हायला लागला. सरधोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळं करायचं अशा संधी आल्या खऱ्या पण त्या युवकाने विचारलं तसं कन्फ्युजन पण वाढलं.
यावर उपाय काय? आहे सोपा पण इम्प्लिमेंट करायला तितकाच अवघड.
गोल, फोकस, सिद्धांत, पर्पज हे एकेकाळी फक्त मॅनेजमेंट जार्गन्स होते. कधी नव्हे ते वैयक्तिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं झालं आहे. "मेडिटेशन वगैरे आपल्यासारख्या नॉर्मल लोकांसाठी नाही रे. मोठ्या लोकांचे चोचले आहेत" ही विचारधारा सोडून द्यायला हवी. व्यायामाचा उद्देश हा स्वतःला फिजिकली फिट ठेवणे तर आहेच पण त्यापेक्षाही जास्त मेंटली फिट हा आहे हे लक्षात ठेवण्याची निकड निर्माण झाली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे २००० च्या आधी रस्ता एकच असायचा. आता अनेक आहेत. कुठला घ्यायचा यावर साधकबाधक विचार करून निर्णय घेणं गरजेचं झालं आहे. त्यासाठी आपलं स्वतःबद्दल चं अंडरस्टँडिंग वाढवणं महत्वाचं झालं आहे. तुम्ही कसे आहात आणि काय करायला पाहिजे हे सांगणारे बाहेर अनेक आवाज तुमच्या कानावर आदळत राहतील. कधी नव्हे ते मनाच्या आवाजाला प्रथम प्रायोरिटी देण्याची गरज निर्माण झाली आहे. उपलब्ध असलेल्या साऱ्या संधींना नॅरो डाऊन करत दोन तीन मार्ग शोधणे, त्या मार्गावर चालण्यासाठी काय स्किल सेट्स लागणार त्याची माहिती घेऊन ते अक्वायर करणे आणि मुख्य म्हणजे आजूबाजूला काय चालू आहे ते बघून विचलित न होता, जे ठरवलं त्याकडे शांतपणे मार्गक्रमण करणे यात शहाणपण आहे, असं माझं मत आहे. जुन्या काळातील छान इंग्लिश वाक्य आहे "A bird in hand is better then two in bush" हे फॉलो करण्याची नितांत आवश्यकता आहे.
म्हणून म्हंटलं सुरुवातीला की प्रश्न साधा आहे पण महत्वाचा आहे. आजूबाजूला कोलाहल खूप आहे. त्यामध्ये राहून स्वतःच अस्तित्व हरवू न देण्याचं अवघड काम तरुणाईच्या खांदयावर आलं आहे.
त्या युवकाला थोडक्यात उत्तर दिलं होतं, त्याचा विस्तार झाला तो असा.
No comments:
Post a Comment