काही काळाने मला त्या चर्चेचा वीट आला आणि मी या प्रश्नाला काही वेगळं उत्तर आहे का यावर विचार करू लागलो. त्याच सुमारास आर सी पी आय टी शिरपूर चे प्राचार्य जयंतराव पाटील यांनी मला त्यांच्या कॉलेज मध्ये भाषणासाठी निमंत्रित केलं. ते आणि पुढची अजून एक दोन भाषणं झाल्यावर मला हे जाणवलं की एकुणात मेकॅनिकल इंडस्ट्री बद्दल मुलामुलींच्या मनात अनेक गैरसमज होते. तिथे करिअर ग्रोथ च्या संधी आहेत की नाही याबद्दल शंका होत्या. त्यातही एम एस एम इ च्या बद्दल अढी च होती म्हणा ना. याला कारण इंडस्ट्री ची संकुचित ध्येय धोरणे पण होती.
मी माझ्या कंपनी पुरता हा प्रश्न सोडवायचा ठरवलं. कुठल्याही कॉलेज मधून बोलण्यासाठी निमंत्रण आलं तर ते नाकारायचं नाही. त्यामध्ये दोन उद्देश होते. एक सेटको च नाव इंजिनियर्स लोकांना त्यांच्या कॉलेज च्या दिवसापासून माहीत व्हावं आणि दुसरं म्हणजे या फिल्ड मध्ये काय संधी आहेत आणि कसं कोअर ला चिकटून राहिलं तर लॉंग टर्म करिअर ग्रोथ प्लॅन करता येईल.
२०२० मध्ये कोविड आला. त्यानंतर मात्र हे कॉलेज मध्ये जाऊन बोलण्याचा धडाका लावला. उत्पादन क्षेत्र वेगाने वाढणार याचे संकेत होते. आमचा नवीन एच आर हेड मयूर जॉईन झाला. त्याला मी एकच सांगितलं "I want to change problem of scarcity of manpower to problem of abundance".
डिजिटल मार्केटिंग, लिंक्ड इन ऍड, मॅन पॉवर एजन्सी, आणि कॉलेजेस मधून केलेलं ब्रँडिंग या सगळ्या फ्रंट वर काम केल्यावर आता परिस्थिती अशी आहे की बिझिनेस मिटिंग मध्ये माणसं मिळत नाही हा मुद्दा चर्चेला आला की मी गप्प होतो. आणि एके काळी अप्रसिद्ध असणाऱ्या कॉलेज मधून लोक घेऊन समाधान मानणाऱ्या सेटको मध्ये आज चांगल्या कॉलेजेस मधली मुलं मुली इंटर्नशिप करतात, जॉब साठी अप्लाय करतात.
तर सांगायचं हे आहे की कॉलेज मध्ये जाऊन भाषण देणे हे माझं व्यावसायिक धोरण आहे. त्यांनी बोलावणं आणि मला ऐकणं ही त्यांची गरज नाही आहे तर मी तिथं जाणं आणि माझे विचार त्यांना ऐकवणे ही माझी, व्यवसायाची गरज आहे. ज्या असोशीने मी कस्टमर कडे ऑर्डर मागायला जातो त्याच भावनेने मी कॉलेजेस मध्ये पण जातो. त्यातून काल कॉमेंट मध्ये काही मित्रांनी लिहिलं की मी पुढची घडवतो आहे. खरंतर असं जर काही होत असेल तर तो माझ्यासाठी हा स्वार्थ साधून परमार्थ आहे.
माझ्याकडे दोन चॉइसेस होते. एक, प्रचलित पद्धतीप्रमाणे माणसं मिळत नाही या प्रश्नाबद्दल चर्चेचं दळण दळायचं किंवा काहीतरी वेगळा मार्ग निवडून यावर उपाय शोधायचा.
मी दुसरा चॉईस निवडला. आहे हे सगळं असं आहे.
No comments:
Post a Comment