१९९९, माझा पहिला परदेश दौरा. Switzerland आणि UK. (तसं ९८ ला सिंगापूर ला गेलो होतो, पण इतक्या कमी दिवसाचा होता की जातो म्हणेपर्यंत दरवाजाची घंटी वाजवली होती) याचे खरंतर बरेच क़िस्से आहेत. पण काही गंमतशीर गोष्टी.
आता ५५०० sqft इतक्या प्रचंड जागेवर विस्तारलेल्या माझ्या वटवृक्षाची सुरूवात १९९४ साली सोमवार पेठेतल्या १०० sqft च्या रोपट्या रूपी एका गाळ्यात झाली होती. (भनकला का बे तु. लोकं वाचताहेत म्हणून वटवृक्ष अन काय काय. भयाडा, २० वर्षामधे लोकं हज़ारों कोटींची उलाढाल करतात, ७-८ आॅफीसेस भारतात असतात, एखादं दुसरं परदेशात असतं. अन तु बसला एकाला कवटाळून, गप्प बस) तर दिवसभर प्रथम M 80 नंतर Hero Honda Splendor यावर १०० किमी ची रपेट केल्यावर मी या गाळ्यात धंद्याला बसायचो. (ए, हसू नका रे. असंच म्हणायचं) रात्री ९-९:३० पर्यंत कधी रिकाम्या workbench कडे पाहत तर कधी फालतूचा time pass करत फार कष्ट केले असं दाखवत घरी धापा टाकत पोहोचायचो. नाही म्हणायला गाळा स्वत:चा असल्यामुळे भातुकली सारखा का असेना पण बिझीनेस करत होतो. Hobby business म्हणतात ना तसंच काहीसं. त्या गाळ्यामधे गाळ्यात गेलो नाही हेच काय नशीब. (धंदा कोटींचा केला नाही कारण हे अशा फ़ालतू कोट्या करण्यातच आयुष्य वाया चाललं आहे)
१९९९ फेब्रूवारी महिना. अशाच एका रम्य संध्याकाळी आॅफीस मधे माशा मारत बसलो असताना एक टपाल आलं. स्वत: च जावून आणलेल्या कामाशिवाय आणि पर्चेस आॅर्डर शिवाय त्या १०० sqft च्या विशाल आॅफीस मधे खरंतर माशांशिवाय काहीच यायचं नाही. पण आलं, त्यादिवशी ते टपाल आलं.
उघडलं. आणि आतमधे जो खलिता होता तो वाचून एखाद्या ट्रक रिपेअर करणार्या ला रतन टाटांचं लेटर आल्यावर जसं वाटेल तसंच वाटलं. Switzerland मधील Voumard नावाच्या एका अग्रगण्य मशीन टूल कंपनीच्या पेगार्ड नामक MD चं पत्र होतं. त्या पत्राचा मतितार्थ असा होता: (आज जरा इंग्रजी लिहीण्याचा मूड नाही, त्यामुळे मराठीच सहन करा)
Dear Mr Mandlik, (इतकं जमतं हो), लुकास टीव्हीएस चेन्नई कडून आम्हाला असं कळलं की तुम्ही आणि Mr Waghela पुण्यात spindle repair करता. तुम्हाला आमचे spindle repair करण्यासाठी आम्ही तुम्हाला training
देऊन तुम्हाला authorize करू इच्छितो आणि त्या कारणासाठी तुम्हाला Switzerland मधील Neufchâtel नामक गावी आमंत्रित करत आहोत.
देऊन तुम्हाला authorize करू इच्छितो आणि त्या कारणासाठी तुम्हाला Switzerland मधील Neufchâtel नामक गावी आमंत्रित करत आहोत.
एक अर्धा तास तर काही सुधरलंच नाही. पुन्हा पुन्हा वाचत होतो, म्हंटलं कुणी चेष्टा केली की काय. आजच्या वेगवान
communication च्या जगात जे लिहीलं ते हास्यास्पद वाटेल पण जे आहे ते आहे .
सगळी लिंक लागली. दोन महिन्यापूर्वी लुकास चेन्नई वरून एक माणूस Voumard चा spindle घेऊन आला होता.
Repair करून दिला. पण बोंबलायला बरोबर झाला की नाही, ते कसं कळणार. मला म्हणाला "तुमच्या repair ची quality कशी बघणार" मी म्हणालो "घेऊन जा, चालला तर पैसे पाठवा" (जन्म मराठवाड्यातला, त्यामुळे "आधी पैसे!" हे कधी जमलंच नाही). नंतर पैसे आले म्हणजे मटका बसला होता फ़िट. या लुकासच्या हेड ने Voumard ला लिहीलं असावं "दोघं जण पुण्यात तुमच्या spindle ची वाट लावतात. अजुन वांदे व्हायच्या आत, त्यांना शिकवा, कसे repair करायचं ते" आणि त्यांची परिणिती हे प्रेमपत्र.

No comments:
Post a Comment