आज मी निवेआ चा एक डिओ आणला. उडवला. आणि माझं लक्ष वेधून घेतलं ते त्याच्या बॉक्स च्या डिझाईन ने. (डिओ चा सुगंध घेऊन कुणी सुंदरी आली नाही हे समजून घ्याल). तर तो बॉक्स इतका सुंदर बनवला होता की डिओ व्यवस्थित त्यात बसत होता आणि त्या बॉक्स मधून बाहेर निघत होता. एकदम सुबक आणि सुलभ. हे प्रॉडक्ट डिझाईन.
एकंदरीत मला या डिझायनर मंडळी बद्दल अतीव आदर आहे. मग ते प्रॉडक्ट डिझायनर असो वा इंटेरियर डिझायनर असो. फॅशन डिझायनर असो वा मशीन डिझायनर असो. यांच्या सगळ्यांच्या नॉलेज बद्दल एक असूयामिश्रित आदर आहे. फॅशन डिझायनर बद्दल जास्त असूया आहे. कुठलीही गोष्ट बनवायची असेल तर या लोकांवर आपली दारो मदार असते. त्यांनी काम व्यवस्थित केलं तर जे त्याचं आउटपुट येतं त्याने आपण चकित होतो. डिझाईन चांगलं असेल तर जे प्रॉडक्ट बनतं ते देखणं तर असतंच पण त्याची युटिलिटी जास्त असते आणि लाईफ स्पॅन पण चांगला असतो.
अमेरिकेत क्रेडिट कार्ड खूप वापरायचे. एकेकाच्या पाकिटात पंचवीस तीस कार्ड सहज असायचे. आज आपल्याकडे पण दिसतात. आपल्या बँकेचं कार्ड पटकन त्या वॅलेट मधून हातात यावं म्हणून एका बँकेने कार्ड ला नॉच दिली होती ज्यायोगे पाकिटात हात घातला की ते कार्ड पटकन हातात यावं.
आता माझ्याकडे एक पेन आहे ज्याच्या मागच्या बाजूला यु एस बी स्टिक अडकवली आहे. बाहेरून वाटतं की फक्त पेन आहे. कल्पना इतकी भारी की मी चकित झालो. स्विस नाईफ आठवते का? एका आयटम मध्ये कमीत कमी दहा टूल्स बसवले आहेत.
सँट्रो ला क्लच च्या शेजारी पाय ठेवायला एक गटटू असायचा. ascent ला पण होता. गाडी चालवताना त्यावर पाय ठेवला की एक रिलीफ मिळायचा. छोटीशी गोष्ट पण कौतुकास्पद.
ते मंगळ यान. बाबो! करोडो मैल जाऊन मंगळावर पोहोचायच्या वेळेची अचूकता काही मिली सेकंद होती. एका रोबस्ट डिझाईन चं उदाहरण.
माझा मित्र विवेक पत्की, इंटेरियर चं काम करतो. १९९९ मध्ये त्यानी माझ्या घरात दोन वार्डरोब बनवले. ९९ च्या मानाने त्याने दाबून पैसे घेतले होते. पण आज सतरा वर्ष झालीत, ते वार्ड रोब नवीन च दिसतात. इतकेच काय पण मी २००५ मध्ये घर बदललं तेव्हा जुन्या घरातून नवीन घरात ते वार्डरोब शिफ्ट केले तरी काहीही डॅमेज झालं नाही. हे खरं डिझाईन. आणि दोन वर्षांपूर्वी मी एका दुसऱ्या डिझायनर कडून काम करून घेतलं त्यात भरपूर फंक्शनल चुका आहेत.
माझ्या लिस्ट मध्ये राजेंद्र निसळ आहेत. पेंटा डिझायनर्स म्हणून त्यांची कंपनी आहे. २००२ ते २००४ मध्ये मी खूप स्पेशल पर्पज मशिन्स बनवल्या, काही ऑटोमेशन प्रोजेक्ट केले. नगर रोड च्या एका कंपनीसाठी आम्ही असेम्ब्ली लाईन बनवली. निसळ साहेबांचं डिझाईन. परवा गेलो होतो त्या कंपनीत. तब्बल १३ वर्षांनी ती लाईन काहीही प्रॉब्लेम शिवाय चालू आहे. स्पेशल पर्पज मशीन चं इतकं लाईफ हे कौतुकास्पद आहे हे जाणकार सांगतील. मला आठवतंय, निसळ साहेबांचं डिझाईन आलं की कळायचं, ये लंबी रेस का घोडा है.
एखाद्या गोष्टीचं अस्थेटिक, वापर करताना त्यात असलेल्या सोयी सुविधा, ती गोष्ट तुम्ही मेंटेन कशी करू शकता, त्याचा लाईफ स्पॅन यावर डिझाईन ची क्वालिटी ठरते.
आमच्याकडे वेगवेगळ्या देशात बनवलेले स्पिंडल रिपेयर ला येतात. ते करताना आम्हाला सहज कळतं की डिझाईन पॉईंट ऑफ व्हयू कुठला स्पिंडल चांगला बनवला आहे.
मी स्वतः कधीही डिझाईन मध्ये काम केलं नाही आहे. तिथे मी जास्त तारे तोडत नाही. म्हणजे तितकी पोच नाही माझी. कुठलाही डिझायनर, मग तो आमच्या फिल्ड मधला असो वा ब्रोशर बनवणारा, वा इंटेरियर असो, मी त्यांच्या कामात लुडबुड करत नाही. फंक्शनल गरज सांगतो आणि बाजूला होतो. कारण त्यांच्या कॅपॅबिलिटी वर मला जास्त भरोसा असतो. काही ठिकाणी लोकं त्या भरवशाला जगतात तर काही ठिकाणी फसतो.
चलो, आज की शाम, इन डिझायनर के नाम. आमचं आयुष्य तुम्ही नक्कीच सुसह्य करता. तुम्हाला आमचा मानाचा मुजरा.