Some people will do anything to earn money and enhance their power-even become patriots and humanitarians.
१५ ऑगस्ट. याच दिवशी फाळणी झालेल्या आणि रक्ताळलेल्या आपल्या देशाला ब्रिटिशांकडूनच नव्हे तर ५६५ महाराजे, नवाब आणि हजारॊ जमीनदारांपासून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य, जे आजकाल आपण अध्याहृत धरतो, ते खरंतर आपल्या बापजाद्यांच्या देशाप्रतीच्या निष्ठा, अविरत प्रयत्न आणि बलिदान यामुळे मिळालं आहे याचा बऱ्याचवेळा विसर पडतो. "असंख्य बलिदानांतून मिळालेल्या उदात्त अशा स्वातंत्र्य या भावनेप्रती आपण संवेदनशील आणि सजग आहोत का?" आजच्या स्वातंत्र्यदिनी हा प्रश्न नक्कीच स्वतः ला विचारावासा वाटतो.
सत्तर एक वर्षांपूर्वी पारतंत्र्याच्या जोखडातून आम्ही भले मुक्त झालोही असू, पण एका जुनाट सामाजिक मानसिकतेच्या साखळदंडाने आपल्याला आजही जखडून ठेवलं आहे. आपला देश, भारत, हा खरंतर आर्थिक निकषांवर, तंत्रज्ञ बाबींवर, सामर्थ्याच्या कसोटीवर खणखणीत वाजेल असा आहे. पण तरीही जागतिक स्तरावर असलेलं त्याचं निम्न स्थान हे अचंबित करते आणि खोटं कशाला सांगू, निराशही करते.
"None are more hopelessly enslaved than those who falsely believe they are free"
आपला इतिहास दैदिप्यमान आहे हेच जर आपण कवटाळून बसलो आणि त्याच्या कडून जर काही शिकलो नाही तर भूतकाळात केलेल्या चुका परत परत करत राहू. तसं बघितलं तर इतिहास हा नेहमीच राज्यकर्त्यांच्या मर्जीने लिहिला गेला. आज मात्र, आपण सामान्य जन, स्वतंत्र आहोत. आपल्या इतिहासाचा धांडोळा घेत त्या चुका परत होऊ नये यासाठी कटिबद्ध होण्यात खरे शहाणपण आहे.
आपला देश, भारत, एक सशक्त राष्ट्र बनण्याच्या कुवतीचा आहे. जगभर ज्या शांतीचा धोशा लावला जातो त्याचा खंदा पुरस्कर्ता आहे आपला देश. आता गरज आहे शहाणपणाची आणि आत्मविश्वासाची. आपला देश हा खऱ्या अर्थाने सहिष्णू आहेच. मधल्या काळात विझलेली ज्ञानज्योत पुन्हा पेटवू यात. त्याच्या प्रकाशात उज्वल भविष्य दिसेल. आजही आपल्याकडे तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ यांची खाण आहे. गरज आहे ती यांनी मुक्त वातावरणात एकत्रित आव्हानांना सामोरे जाण्याची.
आपल्या स्वातंत्र्याइतकं महत्वाचं काहीच नाही. राजकारणाच्या वर, धर्मकारणाच्या वर, विचित्र पत्रकारितेच्या वर आणि समाजकारणाच्या वर स्वातंत्र्याचं स्थान अग्रणी आहे. आणि हे स्थान डळमळीत करणाऱ्या, पुरोगामित्वाचा मुखवटा खालून समाजात अंधाधुंद फैलावणाऱ्या, राष्ट्राभिमानाच्या नावाखाली समाजात दुही माजवणाऱ्या, माणसांनाच माणसाचं वैरी बनवणाऱ्या आणि आपसामध्ये भिती, दहशत, तिरस्कार, सूड अशा नकारात्मक गोष्टी रुजवणाऱ्या सगळ्याच घटकांना नाकारण्याचं सामर्थ्य आपल्यात येवो हीच १५ ऑगस्ट निमित्त शुभेच्छा.
If we cherish our freedom, then awaken we must to our own potential as a thriving diverse, united and secular India. All we need is to believe in ourselves, our innate good nature and watch the miracle unfold.
जयहिंद!!
संदर्भ: गुरविंदर सिंग यांचा लेख. स्वैर रूपांतर

No comments:
Post a Comment