फेसबुकवरच्या पोस्टवरून असं कुणाला वाटू शकतं की मला सकारात्मकतेचा रोग लागला आहे. हो, अति सकारात्मकता हा रोगच. प्रत्यक्ष जीवनात पॉझिटिव्हिटी ची टाळ सारखी कुटू शकत नाही आणि जर कुटत असू तर त्याचा प्रौढ गटणे झाला आहे असं खुशाल समजावं.
बऱ्याचदा पॉझिटिव्हिटी म्हणजे आयुष्यातला नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करणे असा घेतला जातो. हा खरंतर गुन्हाच. मी आतापर्यंत जे पाहिलं आहे, अनुभवलं आहे आणि वाचलं आहे त्यावरून एक निष्कर्ष काढला आहे.
Being positive does not mean overlooking negatives. It just means seeing eye to eye of negativism and telling "I know you are there and I am working on you. With my efforts, I am letting you go."
नैसर्गिकरित्या काही प्रश्न सुटतील ही आपली विशलिस्ट असते. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. जेवताना चुकून तोंडात खडा आला, तर आपण त्याला तोंडात ठेवून आता पुढचा घास चांगला येईल, अशी वाट बघत बसत नाही. तर तोंडातला खडा थुंकून टाकतो, तोंड स्वच्छ धुतो आणि मग पुढचा घास घेण्यास सज्ज होतो. नकारात्मकतेवर अगदी असंच काम करावं लागतं.
व्यावसायिक जीवनात प्रश्न उभे राहतातच. त्यावर साधकबाधक विचार करून एक ऍक्शन प्लान बनवून त्याला उत्तर देण्यात शहाणपणा आहे.