काल नासिकला गेलो होतो. कस्टमर कॉल वर. बऱ्याच दिवसांनी मेझरिंग इन्स्ट्रुमेंट्स हातात घेतले. मशीनमध्ये घुसून काम केलं. शर्ट ला ऑइल लागलं आणि ट्राऊजर ला काळे डाग पडले. जेवण्याच्या आधी हात धुतले खरे, पण हाताला तो जुन्या काळात येणारा मंद असा ऑईलचा वास आला. माझ्या लेखी तो वास म्हणजे पारिजातक चुरगळल्यावर हाताला जो येतो तोच.
हे माझं आवडतं काम. कस्टमर ला सोल्युशन देणे. इम्पोर्ट सब्स्टीट्युट बनवणे. थोडक्यात कस्टमरची कम्फर्ट लेव्हल तयार करणे. आजकाल कस्टमर पण अवघड प्रश्न विचारत नाहीत. पूर्वी बजाज ऑटो, टाटा मोटर्स वगैरे कंपनीतील लोक असे प्रश्न विचारायचे की उत्तरं देताना त्रेधा उडायची. आता कुणी असे इंटरेस्टिंग प्रश्न विचारले की भारी वाटतं. आणि मी मग बोलूनही दाखवतो, की चर्चा करताना मजा आली.
कंपनी मोठी झाली. मॅनेजमेंटचं काम वाढलं. स्ट्रॅटेजी, बॅलन्स शीट, एचआर, फायनान्स हे असलं काहीतरी अवघड काम आजकाल करावं लागतं.
काल जाणवलं, हार्ड कोअर टेक्निकल काम केलं की दिल गार्डन होऊन जातं. पण नंतर हे पण वाटलं, की तेच काम करत राहिलो असतो तर कदाचित ग्रोथ पण झाली नसती. कुणास ठाऊक जॉईंट व्हेंचर पण झालं नसतं आणि पुण्याव्यतिरिक्त चेन्नई आणि दिल्लीत प्लांट पण चालू करू शकलो नसतो.
ते काय असेल ते असेल, पण आता ठरवलं आहे. सहा महिन्यातून का होईना एखादा असला खंग्री टेक्निकल सेल्स कॉल करायचा. वर उल्लेखलेली अवघड काम करताना डोकं खूपदा पकून जातं. त्यावर उतारा म्हणून. मन फ्रेश होऊन जातं.

No comments:
Post a Comment