समजा मी एक कार विकत घेतली. त्याचा आनंद साधारण एक आठवडा टिकतो. एकदा ती कार माझ्या इको सिस्टम चा भाग झाली की माझं मन कुठलातरी दुसरा आनंद शोधण्यासाठी बाहेर पडतं. हा जो प्रकार आहे त्याला म्हणतात हेडोनिक ट्रेडमिल. (ट्रेडमिल वर आपण पळत राहतो पण असतो त्या जागेवरच, म्हणून हे नाव दिलं असावं असा माझा अंदाज) आपण काही भौतिक गोष्टींचा पाठपुरावा करतो, ज्यामुळे मला आनंद वाटेल. ती गोष्ट कवेत आल्यावर आपल्याला यशस्वी झाल्याचा अनुभव येतो. त्या अनुभवातून मिळणारा आनंद काही काळ टिकतो आणि मग आपण परत कोणत्यातरी नवीन अनुभवामागे धावत सुटतो.
पण मग यातून सुटका आहे का? तर आहे. तात्विक दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या हीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आली आहे. काही काळासाठी पटतं ही आपल्याला. पण थोड्या दिवसात आपल्याला त्याचा विसर पडतो.
१. जितके लागतात तितके पैसे मिळवण्याइतकं काम करा. (याचा अर्थ पैसे कमवू नका असा नाही.) एक लॉंग टर्म सेव्हिंग प्लॅन बनवला आणि रिटर्न्स ठरवले की मग पैसे जास्त मिळाले तरी त्याचा आनंद होत नाही. जिवंतपणी मोक्ष मिळाला असं होतं मग.
२. व्यायाम करून तब्येत खणखणीत ठेवा. आणि एनर्जी वाढवा.: या उपायाचे अनंत फायदे आहेत. व्यायाम, झोप आणि मोजके पण व्यवस्थित खाणं याला चॉईस ठेवण्यात मतलब नाही. याला महत्व दिलं की हे शरीर जे रिटर्न्स देतं त्याला तोड नाही.
३. जे लोक आवडीचे आहेत, त्यांच्याबरोबर वेळ घालवा: समान विचारसरणीचे लोक, मित्र, फॅमिली यांच्याबरोबर जास्त वेळ घालवा. ह्या लोकांना आपण गृहीत धरतो पण अडचणीवेळी हीच लोक आपल्या मदतीला येतात.
४. ज्या गोष्टी आयुष्यात डोक्याला शॉट लावतात त्यांना आयुष्यातून कायमचं हद्दपार करा. अशा गोष्टी शोधा आणि त्यावरचे उपाय छोटे असतात. उदा: टूर ची बॅग तयार ठेवायची अन त्यात चार्जर, टॉयलेटरीज ची बॅग वेगळं ठेवणे. दिलेली वेळ पाळणे. वगैरे.
५. शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं. नवनवीन आव्हानात्मक परिस्थितीला न डगमगता सामोरे जाणे. जर असं काही नसेल तर अशी आव्हानात्मक परिस्थिती शोधणे अन त्यावर मात करणे. नवीन प्रोजेक्ट्स, काही शिकणे (भाषा, वादन, गाणे, खेळ काहीही). यातून मिळणारा आनंद हा अफलातून असतो.
(एका इंग्रजी लेखाचा स्वैरानुवाद)

No comments:
Post a Comment