Saturday, 18 January 2014

१७/१२

 अमेरिकेचे तिघं  जण आले होते, स्कॉट, ब्रायन आणि जिम. पहिले दोघं बुधवारी अमेरिकेला गेले आणि आज मी आणि जिम मुंबईला आलो. गप्पा मारत होतो.  एक्स्प्रेस हाय वे चालू झाल्या एक माणूस धार मारताना दिसला, त्याने त्याचा फोटो काढला. मी म्हणालो, मित्रा जे तु कॅमेरात बंदिस्त करतो आहेस तो खरा भारत नाही आहे रे! तो म्हणाला "कुठे बघायला मिळेल मला तुझा भारत" मी म्हणालो, तुला फोटोच न्यायचे ना तर घेऊन जा अजंता एलोराचे फोटो, ही बघ विजयाची गाथा जिथे लिहीले जात असे ते विजयनगर (हंपी), हे आजूबाजूला दिसणारे सह्याद्रीचे डोंगर सुद्धा जिथे टेकड्या वाटतात तो हिमालय, त्याला खजुराहोचेही फोटो दाखवले. (गूगल इमेजेस कृपा). . तो हरखून गेला. मी म्हणालो " it is unfortunate that western world knows India as corrupt country, country of snakes and elephants, monks. Please come with me and I will show you this beautiful country" त्याला श्रीनगर आणि पहेलगामबद्दल सांगितलं.  जिम म्हणाला " can I see life of rural India" मी त्याला मनोजचं पाराशर अॅग्रोटुरीझम ची website दाखवली. माडाच्या मनात दाखवलं, गणपतीपुळेचं.

देशाबद्दल बोलताना मी बहुधा एक दोनदा भावुकही झालो होतो. (तुम्ही बोलून बघा कधी, फारंच भारी वाटतं) तो मला म्हणाला "I have not seen a person like you who is so passionate of his country" मग मी त्याला शिवाजी महाराज आणि भगतसिंह यांची गोष्ट सांगितली. त्याला म्हणालो "याला म्हणतात passion".

आता ऐकतोच आहे म्हंटल्यावर इंग्रजांनी आमच्या देशाला कसा लुटला त्याचंही रसभरित वर्णन केलं.

त्याला म्हणालो " believe me, this country has immense potential and also bright future"

संध्याकाळी निरोप घेताना जिम म्हणाला "till date I had a different perspective of your country. Today it is completely changed" थोडक्यात साॅलीड पकवला होता त्याला.

जाताना म्हणाला " I just have a last question. And you can answer this in my next visit to Pune. Why do so many indian people migrate to USA?"

तो जाऊन २४ तास झाले, मी त्या प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे.

आणि एक सल, ह्या देशाचं भविष्य उज्वल आहे हे सांगण्यासाठी मला भूतकाळाचा आधार घ्यावा लागला. वर्तमानाचा नाही आणि हेरंब जोशींना मनोमन नमस्कार केला. चुकलो



No comments:

Post a Comment