माझी
कंपनी तशी लहानंच आहे, २३ जणांची. त्यात कॅंटीन facility आहे. १/३
employee ने द्यायचे, २/३ कंपनीने. जेवणाचे कंत्राट एका मराठमोळ्या
माणसाकडे. त्याचे नाव रमेश. रमेशच्या खूपच complaints करायची, आमची पोरं.
जेवणात किडे निघाले, स्टेपलर पिन निघाली, जेवण कमी पडलं, भात कच्चा राहिला,
एक ना अनेक. रमेशनी कधी तक्रारीं्कडे लक्षंच दिले़ नाही. उलटं सुनवायचा
"घरी होत नाही का असं" "हे आहे असं आहे, बघाजमतं का ते" "छोटे मोठे
problems होतंच राहणार" ३० डिसेंबर ला म्हणाला "उद्या canteen बंद, मला ३१
ची मोठी order आहे" मी म्हणालो "कंपनीत काय फुकट जेवण देतोस का, दुसरी
order मिळाली तर इथे जेवण नाही हा काय प्रकार" रमेश बधलाच नाही.
तक्रारी होत्याच, रमेशचं contract बंद केलं.
नवीन contractor शोधला, शाम त्याचे नाव, गुलबर्ग्याचा. छोटंच हाॅटेल.
रमेशचाच रेट, पण एक भाजी, पापड़ आणि कोशिंबीर extra. "३६५ दिवस सर्विस
मिळेल, सुट्टी नाही" "काहीही complaint असेल, सांगा काळजी घेईल" मी म्हणालो
"चांगली ताटं वाट्यालागतील" तर म्हणाला "आणेल की, शेवटी धंदा वाढवायचा
आहे" मी विचारलं " मग उद्यापासून जमेल" तर म्हणाला "करतो की, काळजी नका
करू"
Canteen सुरळीत चालू.
पाच वर्षानंतर मला शामसेठ
एका भारी हाॅटेल च्या गल्ल्यावर बसून सिंहगड रोडच्या लोकांच्या जिंभेचे
चोचले पुरवताना दिसतोय, आणि रमेश मराठी लोकांवर अन्याय झाला म्हणून
मनसेच्या मोर्च्यात राज ठाकरे झिंदाबादच्या घोषणा देताना दिसतो आहे.
No comments:
Post a Comment