Tuesday 7 January 2014

नियम

अशात शाश्वत अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग खुपदा वाचनात आला. गरजा वाढवून ठेवायच्या आणि मग पैशाच्या मागे लागायचं वैगेरे हे कसे चूक. बरोबरच आहे पण म्हणजे काय, यावर थोडा विचार केला. तर काही ठोकताळे बांधले. बघा पटताहेत का ते:

- कुठलेही वाहन घेतल्यानंतर त्या मध्ये इंधन भरताना "tank फुल करो" हे सांगताना टेन्शन नाही आले पाहिजे, म्हणजे थोडक्यात खिशाकडे लक्ष गेले नाही पाहिजे.
- मोबाईल बिल, विजेचे बिल, इंटरनेट चे बिल, सोसायटीचे maintenance बिल, corporation tax भरताना "शेवटच्या दिवशी भरू" हा विचार न येता दुसर्या दिवशी ते भरण्याची ताकद पाहिजे.
- बेडरूम मध्ये AC लावताना आता यामुळे विजेचे बिल किती वाढेल हा विचार जर मनात येत असेल तर AC लावू नये.
- घरासाठी किंवा वाहनासाठी कर्ज घेणे काहीच चुकीचे नाही. पण EMI हा घराच्या income source पेक्षा २५ ते ३०% पेक्षा जास्त नको. मग तो sustainable राहतो, आणि जसेजसे वर्ष जातील, तो डाचत नाही. हे जर गणितात बसत नसेल तर म्हण लक्षात ठेवावी "मुर्खांनी घर बांधावे आणि शहाण्यांनी त्यात भाडेकरू म्हणून राहावे".
- लग्न, वाढदिवस असले कार्यक्रम कर्ज काढून करू नये. स्वत:च्या saving मधून करावे . personal loan चा इंटरेस्ट रेट खूप जास्त असतो. पर्यटनासाठी सुद्धा हेच लागू. कर्ज काढून foreign trip करणे हा मूर्खपणा आहे.
- स्वत:ची ताकद उमजून क्रेडीट कार्ड वापरावे. GF, मित्र, नातेवाईक यांच्यावर shining ठोकण्यासाठी त्याचा वापर करू नये. क्रेडीट कार्ड चे पेमेंट बिल आल्याच्या दुसऱ्या दिवशी झाले पाहिजे. शेवटच्या दिवशी नाही.
- स्वत:च्या धंद्यात सगळी जायदाद collateral ठेवा, राहते घर सोडून.
- balance sheet strong ठेवा. बँक Balance Sheet बघून लोन देते, ना कि तुमच्या दरवाजातील अलिशान गाडी बघून.
- हे जरी खरं असले तरी cashflow ही reality आहे. ना कि profit, जो notional आहे. जो पर्यंत पैसॆ तुमच्या account madhe नाहीत तो पर्यंत तुम्ही त्याचे मालक नाही. त्याप्रमाणे खर्च प्लान करा
- लक्षात ठेवा, बँक त्यांनाच लोन देते जे बँकेला prove करतात कि त्यांना लोनची गरज नाही आहे. Bank always extends umbrella in all seasons other than rainy season.

थोडक्यात काय, तर पैसे कमवा आणि जेवढे कमावता त्यानुसार खर्च करा, ना कि, भरमसाठ EMI करायचा आणि मग त्याची पूर्तता करण्यसाठी खूप काम करायचे.

इकडचे, तिकडचे वाचताना जे जाणवले ते लिहिले आणि या दुसऱ्यांना सूचना नाही आहेत तर मलाच सावध करतो आहे. 
 
 

No comments:

Post a Comment