पुण्यातील परिस्थिती जरी स्टेबल होत असली तरी अजूनही खूप पॉझिटिव्ह केसेस येत आहेत. भय इथले संपत नाही या ओळीप्रमाणे लोक अजूनही खूप घाबरत आहेत. कृपया खालील केसेस वाचा ज्या गेल्या पंधरा दिवसात बऱ्या झाल्या आहेत.
१. वय २८, सी आर पी सुरुवातीला चांगला होता, पण नातेवाईकाच्या मृत्यूचा स्ट्रेस आला आणि तो डायरेक्ट १०० वर पोहोचला. ऑक्सिजन ८८. वेळेत योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि पेशंट घरी आलाय.
२. वय ३२, सी आर पी ०. ८ आणि एच आर सी टी ९. दुसऱ्या आठवड्यात सी आर पी पोहोचला २५ आणि एच आर सी टी १३. योग्य ट्रीटमेंट मिळाली पेशंट हॉस्पिटल मधून घरी आलाय.
३. वय ६०, डी डायमर १२५००, एच आर सी टी १७. योग्य वेळेत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट. खूप सुधारणा आहे. बहुतेक एका आठवड्यात डिस्चार्ज मिळेल.
४. वय ८०, इतर व्याधींनी ग्रस्त. केवळ होम आयसोलेशन ने ओके. योग्य ट्रीटमेंट, योग्य वेळात मिळाली.
५, वय ४५, एच आर सी टी २५/२५. पेशंट ला योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि पेशंट बरा झालाय.
६. वय ५२, ऑक्सिजन खाली वर होतोय. ट्रीटमेंट मिळाली. आता स्टेबल झाला आहे.
या मनघडन कहाण्या नाही आहेत तर समोर घडलेल्या केसेस आहेत. सर्व परिचित आहेत.
हे सर्व पाहत असताना काही गोष्टी कळल्या आहेत, त्या तुमच्याशी शेअर कराव्या असं वाटलं.
१. भीती पासून दूर रहा. पेशंट ठीक होणार हा विश्वास मनात ठेवा. (पेशंट ने आणि त्याच्या नातेवाईकाने)
२. वेळेत ट्रीटमेंट घ्या. कुठंही दिरंगाई करू नका.
३. हॉस्पिटल आणि डॉक्टर्स वर विश्वास ठेवा. तुम्ही मरावं अशी ट्रीटमेंट मुद्दामून कुणी देत नाही. स्वतःहून हॉस्पिटल बदलण्याचा निर्णय घेऊ नका. डॉक्टर ने जर असमर्थता व्यक्त केली तरच हॉस्पिटल बदला.
४. एक कुणी डॉक्टर फॉलो करा. चार ठिकाणी ओपिनियन विचारू नका. तुमचं कन्फ्युजन वाढेल आणि निर्णय स्लो घेतले जातात.
५. आधी काही आजारासाठी ट्रीटमेंट घेतली म्हणून करोना ट्रीटमेंट चा प्रोटोकॉल टाळू नका. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर करोना ची औषधे घ्या.
६. नातेवाईक पेशंटला ट्रीट करताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या.
बाकी एस एम एस ची त्रिसूत्री सतत लक्षात असू द्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखणं हे आपल्या हातात आहे. लसीकरण झालं आहे किंवा करोना होऊन गेला म्हणून बेफिकीर राहू नका. रस्त्यावरचे अपघात रोखणे हे हॉस्पिटल चं काम नाही आहे, ते आपल्या वागण्यावर अवलंबून आहे. करोना चं पण तसंच आहे. मास्क आणि फिजिकल डिस्टन्स ठेवणे हे अजूनही चालू ठेवा. शारीरिक आणि श्वसनाचे व्यायाम करा. करोनाचा पराभव करा.
No comments:
Post a Comment