आमच्या एका फोरम मध्ये आम्ही काही ग्रुप तयार केले आहेत. जीडीपी ग्रुप म्हणतो आम्ही. ग्रोथ ड्रिव्हन पॅशनेट पीपल. महिन्यातून एक मिटिंग असते. व्यवसायाच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांशी शेअर करतो ज्यायोगे व्यवसाय करण्याच्या पद्धतीत काही बदल आणता येतील. अर्थात चांगल्यासाठी.
काल मीटिंगमध्ये आमचा एक चर्चेचा मुद्दा होता, जो पुढील आर्थिक वर्षाच्या संदर्भातील होता. प्रत्येकाने काही गोष्टीवर प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं. काही जणांचं झालं होतं. काहींचं नव्हतं झालं. त्या मध्ये मी पण एक होतो. काम पूर्ण न झाल्याचं सांगताना मी पटकन म्हणून गेलो "नाही झालं, कारण मला सुचलं नाही. किंवा कंटाळा आला. मी कबूल करतो कि चूक झाली."
माझं बोलून झाल्यावर ग्रुप मधील एक जण म्हणून गेला "ते ठीक आहे. पण कन्फेशन इज नॉट ओन्ली सोल्युशन".
थोडं हार्ड हीटिंग स्टेटमेंट होतं माझ्यासाठी. मी विचार केला त्यावर. आणि जाणवलं की त्या स्टेटमेंट मध्ये तथ्य आहे.
बऱ्याचदा आपण चुकीची कबुली देऊन ते काम न केल्याचं प्रायश्चित्त घेतलं अशी मनाची समजूत घालतो. पण आपल्या वागण्यात एखादी चूक झाली तर ते कबूल करणं ही पहिली स्टेप झाली. ती झालेली चूक सुधारून बरोबर प्रोसेसच्या दृष्टीने आपण काउंटर कृती करायला हवी ही पुढची पायरी. त्यापुढे जाऊन तशाच टाईपची चूक पुन्हा होऊ नये यासाठी आपण आपल्या जीवनपद्धतीत काय बदल घडवतोय यावर सुद्धा कॉन्शसली काम करण्याची तयारी हवी. नुसतीच तयारी नव्हे तर तसं प्रत्यक्ष वागत त्याची एसओपी बदलली की मग ते चूक झाल्याचं अकौंट क्लोज होतं.
अवघड प्रोसेस आहे, पण स्वतःला व्यावसायिक म्हणून एस्टॅब्लिश करायचं असेल तर हे शिकायला हवं.
थर्टी इयर्स चा एक्सपिरियन्स झाला आहे, पण हे शिक्षण काही सुटत नाही आहे.
No comments:
Post a Comment