रेल्वे प्रवास, विमानप्रवास.
- जितकं कमीत कमी सामानात प्रवास करता येईल तेवढं जमवा.
- रेल्वेमध्ये बर्थ च्या खालची जागा किंवा विमानात सीटच्या वरची जागा म्हणजे आपल्या घराचा पोटमाळा आहे असं समजू नका. रेल्वे त खूप सामान असेल तर कार्गो van असते आणि विमानात bag मोठी असल्यास चेक इन करा.
- रेल्वेत बर्थ ची अदला बदल टाळा. (अगदीच अनिवार्य असेल तर ठीक. एकदा अहमदाबाद शताब्दी मध्ये C ९ मध्ये होतो. शेजारी एक नवविवाहित तरुणी बसली. तिचा नवरा आला आणि मला request केली sit बदलण्याबाबत. मी पण तरुणीचा विचार करत हो म्हणालो. सीट कुठे होती माहिती आहे C २ मध्ये. काही दिवसांपूर्वी राजधानीतून येताना एका बाईनी असलं डोकं पकवलं शेवटी गेलो २ डबे सोडून. असली होती ना, "आप please आज जरा राजधानी छोडके passenger से सेकंड क्लास मे आइए ना!" असं म्हणायला कमी केलं नसतं) विमानात तर सीट ची अदलाबदली नकोच. अहो श्रीनगरहून कन्याकुमारी चा विमानप्रवास ३ तासाचा असेल. अशा काय गप्पा मारायच्या असतात. आणि एवढीच हौस असेल तर रु १०० मोजून सीट बुक करा.
विमानात चढण्या अगोदर ठरवा कोण कसे बसणार ते. तुमच्यातच जर सीट बदली करायची असेल तर विमान उडल्यानंतर काही वेळाने करा. otherwise तुमच्यामुळे पूर्ण line खोळंबली असते.
- रेल्वे चा बर्थ म्हणजे आपल्या घराचा hall, किंवा बेडरूम, किंवा डायनिंग टेबल समजू नका. घरात जशा गुळण्या भरता तशाच इथे भरण्याची गरज नसते. एक दिवस थोडं कमी आवाज करून दात घासले तर काही फरक पडत नाही. जेवढे तुम्ही तिकिटासाठी पैसे मोजले असतात तेवढेच सहप्रवाशांनी पण, हे कायम लक्षात ठेवा.
- इनमिन एक ते दोन तासाचा विमान प्रवास असतो. airport ला सुसज्ज urinals असतात. त्याचा वापर सोडून ते air host किंवा होस्टेस जेव्हा refreshments serve करायला मध्ये पोहोचतात तेव्हाच बरोबर urinal चा वापर करायची इच्छा कशी होते हे काही अजून कळले नाही.
- Airport ला Security Check In च्या वेळेस "छ्या, काय फालतू system आहे. कसला वेळ लावतात" असल्या भंगार comment करून स्वतःचे हसू करून घेऊ नका. CISF ची लोकं हि सैनिकासारखी असतात. त्यांना orders follow करायच्या असतात. त्यांच्यावरून सकाळी सकाळी तुम्ही स्वतःबरोबर दुसर्यांच्या मुडची वाट लावत असता. इथे वेळ लागला तरी, तंत्रज्ञानाने पुणे ते बंगलोर चा प्रवास २० तासा ऐवजी एक तासाचा झाला आहे हे लक्षात घ्या.
- विमान halt ला पोहोचता क्षणी उठून उभे राहण्याची काहीच गरज नसते. त्यामुळे वेळ वाचतो असे जर वाटत असेल तर मोठया गैरसमजात आहात.
- जेव्हा अशी घोषणा होते कि "सीट १६ ते सीट ३० यांनी प्रवेश घ्यावा" तेव्हा तुमचा सीट नंबर त्यात नसेल तर उगाच घुसाघूस करून हसे करून नका घेऊ.
- जेव्हा विमानात असे सांगतात कि mobile आणि इतर electronic गोष्टी बंद करा तेव्हा त्या बंद करा. हे तुमच्या safety साठी आहे. "त्याने काय होते" असा विचार करण्याआधी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे का याचा विचार करा.
- प्रवास असा करा कि तुम्ही पण एन्जॉय करा आणि दुसऱ्यांचा प्रवास पण सुखकर करा.
- Happy Journey
तळटीप:
१. मला माहित आहे माझे फेसबुक चे मित्र सुज्ञ आहेत त्यांना या सगळ्या सूचनांची गरज नाही. मला हा फुकटचा सल्ला विमानतळावर किंवा स्टेशनच्या platform वर दयावासा वाटतो. पण तिथे शक्य नाही म्हणून मार्क चा platform वापरत आहे.
२. लहान मुले, senior citizen, रुग्ण यांच्यासाठी हे नसून माझ्यासारखे धडधाकट पण विचित्र वागणाऱ्या साठी आहे.
No comments:
Post a Comment