(मनोगत माझे आणि वैभवीचे नाही आहे. नाहीतर लागलीच "काय लिहलं, बघू" भ्रमनिरस होईल)
वैभव, माझ्या कंपनीत काम करणारा. तुम्ही म्हणाल आज काल लैच कौतुक लावलंय या माणसाचं. (आणि सिंहगडचं पण. चार रविवार काय गेला नाही तर च्यायला चाळीस वर्षापासून जातोय असं लिहित सुटलाय. आता हे शेवटचं बरं का, बास) पण बघा आता, संसारी माणूस. बायका पोरं तिकडे साताऱ्याजवळ. हा राहतोय एकटा. सकाळी चार ला दिवस चालू होतो. आवरून पाच वाजता एका सोसायटीत जातो गाडया धुण्यासाठी. साडे सहा ला परत येतो. चहा नाश्ता स्वतः बनवतो आणि साडे आठ ला आमच्या इथे बाजूच्या कंपनीत येतो. अकरा वाजता माझ्या कंपनीत येतो. तिथे काम करतो. मग दोन वाजता जेवण झाले कि माझ्या नांदेड सिटी च्या घरी जातो. तिथे काम करतो. मग परत कंपनीत येतो. साफसफाई करून मग साडेपाच ला घरी जातो. परत घरी गेल्यावर स्वतःचा स्वयंपाक करतो. जेवतो आणि झोपतो. आणि सगळी रपेट सायकल वर. वाचूनच दमलात ना.
तर तो मला म्हणाला "साहेब, मी पण येतो तुमच्याबरोबर सिंहगडला. दर रविवारी." येतो सांगितल्या वेळेला. पाच मिनिटे अगोदरच. पायात चप्पल. अरे म्हंटल, बूट तर घे. तर म्हणतो "काही नाही फरक पडत".
लेकाचा कडाकड सिंहगड चढतो. मी इकडे धापा टाकत चढत असताना हा पट्ट्या मात्र सहजपणे गप्पा मारतो. माझी ऐकण्याची पण ताकद संपल्यावर एकटाच पुढे जातो. आणि वर जाऊन थांबतो, माझी कीव करत बघत असतो. मनातून मी जळफळत असतो. मला असं सारखं वाटतं कि तो गालातल्या गालात हसतो आहे. मी नसेल तर ३०-३५ मिनिटात चढेल हा सिंहगड. वर पोहोचल्यावर अंगावर घामाचा टिपूस नसतो.
उतरताना मी शेर असतो. त्याच्या पायात चप्पल असल्यामुळे त्याला थोडे हळू चालावे लागते. मी पुढे जाऊन छद्मीपणे त्याच्याकडे बघून हसतो. वर जाताना तो पुढे असतो. त्याचा मी बदला घेतल्यासारखे वाटते.सिंहगड पायथ्याला (बेस कॅम्प म्हणायचं का, तेवढंच हिमालयात जाऊन आल्यासारखे वाटते) पोहोचल्यावर दर वेळेस म्हणतो "मजा आली. पण तुम्ही सायकल घ्या, दम कमी लागल"
वैभवचे फेसबुक account असले असते तर त्याचे मनोगत बहुधा असे असले असते.
दर वेळेस पोहोचलो कि साहेब दात घासत असतो. पण ठीक आहे, आई तोपर्यंत माझा चहा बनवून देतात. तसा साहेब बराच म्हणायचा कि, त्याला म्हंटले "मी पण येत जाईन" तर चल म्हणाला. सायबाची खरी मजा येते, गड चढताना. लैच हापतो. हापिसात एवढी शायनिंग टाकतो, इथे पार शेळी होऊन जाते. कंटाळा येतो एवढं हळू चढायला. माणसानं कसं झप झप गेलं पाहिजे. पण मी पुढं जाऊन थांबतो. हो, परत साहेब मधच कुठं बसला तर केवढ्यात पडायचं. परत आई म्हणायच्या तुला कळत नव्हतं का, थांबायचं त्याच्याबरोबर.
वरती पोहोचल्यावर सायबाची order ठरलेली. कांदापोहे अन ताक. अरं, काय पोहे, जरा कांदाभजी घ्यावी तर म्हणतो नको. तब्येतीला चांगलं नाही. इतर वेळेस चिकन हाणताना त्याला नसते तब्येतीची काळजी. बरं आपण घ्यावं तर खिशात हात बी टाकू देत नाही. जाऊ द्या, घरीच बनवतो.
उतरताना सायबाला लैच जोर चढतो. सारखं पुढं जाऊन म्हणतो "वैभव, हळू रे बाबा, पडशील" वर चढताना आवाजात एवढा जोर आण कि म्हणा, तेव्हा तर बोलायला सुधरत नसतं. कंपनीत कसा चुरचुर बोलत असतो.
त्याच्या मागं लागलो आहे सायकल घे म्हणून, जरा माणसासारखा चढशील. म्हणतो तर खरं, घेतो म्हणून, केव्हा मुहूर्त काढतो काय माहित. कांदा पोहा खाऊ घालतो वरती, पण तुम्हाला आतली गोष्ट म्हणून सांगतो लैच चिंगूस आहे बर का, हा साहेब !!

No comments:
Post a Comment