अ………………अभियंत्याचा भाग ४
अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल (२००२-२०१९ ते २०२३)
आता खऱ्या अर्थाने मी कंपनी चालवायला लागलो होतो. कंपनी ४ जणांची, त्यातले २ डायरेक्टर. पण चालू झालं काम. तसं दोन वर्षात नाही म्हणायला कंपनीचं थोडं का होईना बस्तान बसलं होतं. २००४ च्या सुरुवातीला PCB industry साठी लागणारा air bearing spindle घेऊन एक जण आले होते. मी बोललो "ह्यातील आम्हाला काही नॉलेज नाही आहे. नाही होणार हा रिपेयर." आमचा छोटेखानी सेट अप बघून ते बोलले "प्रयत्न तर करा" मी विचार केला प्रयत्न करायला काय हरकत आहे. झाला सुद्धा तो रिपेयर, पण एक parameter काही सेट करू नाही शकलो. high rpm spindle चं एक वैशिष्ट्य आहे. तो पहिले दहा मिनिट फिरला कि झालं. फेल झाला तर त्या काळात होणार.
व्यवस्थित रिपेयर नाही झाला पण एक वेगळंच segment कळलं PCB इंडस्ट्री. तिथे वापरले जाणारे high rpm स्पिंडल्स. आणि त्याचा manufacturer वेस्टविंड. साहेबाच्या देशातील. मग त्यांच्या authorisation च्या मागे लागलो. वर्षभर मागे लागल्यावर शेवटी ती कंपनी पटली आणि आम्ही authorised spindle service provider झालो. (च्यायला, इतका वेळ मला वैभवीला पटवायला हि नाही लागला). आज नऊ वर्ष झाली आहेत. मस्त चाललंय. (लग्नाला २३. तिथंही मस्त चालू आहे). पण इथे एक गम्मत झाली. वेस्ट विंड चे टेस्ट रिग घेण्यासाठी २० लाख रुपयाची investment होती. आम्ही चार जणांचं बोर्ड. लैच खल व्हायचा. potential आहे का, भारतात किती स्पिंडल आहेत, कस्टमर कुठे आहे वैगेरे. २ दिवस चर्चेचं गुर्हाळ चाललं होतं. सगळी माहिती दिल्यावर ३ पैकी २ डायरेक्टर डोकं पकवत होते. मी बोललो "मला माहिती आहे हा बिझिनेस यशस्वी होणार आहे. याची सगळी जबाबदारी माझी." कुणाला काही बोलायला जागाच राहिली नाही.
आमचा रिपेयर चा बिझिनेस. एखादा पार्ट खराब झाला तर सप्लायर चे उंबरठे झिझवावे लागायचे. आणि डोक्याला ताप व्हायचा. सातारा रोड वर आमचा एक वेंडर होता. इतकी शायनिंग करायचा. मी विचार केला च्यायला याचे पाय किती काळ धुणार आपण. २००५ ला वेस्ट विंड साठी १७ लाखाचं लोन घेतल्यावर एका वर्षातच मी पुढचं लोन घ्यायच्या तयारीला लागलो. इथं बोंबलायला collateral security नव्हती. पण SV ग्रुप ने corporate guarantee दिली आणि आमचा मार्ग सुकर झाला. परत अजून पाहिलं लोन घेऊन एक वर्षही नाही झालं तर पुढचं लोन वैगेरे ऐकावं लागलं. पण मी रेटलं. आणि २००६ ला छोटं मशीन शॉप चालू केलं.
एकेरी, दुहेरी करत डाव रंगात आला. चाराचे आठ लोक झाले, आठाचे बारा.
साधारण २००५ च्या सुमारास लक्षात आलं कि आमची specialty ज्या grinding स्पिंडल मध्ये होती त्याचं मार्केट झपाटयाने कमी होत होतं. त्या ऐवजी मशिनिंग सेंटर्स वेगाने इंडस्ट्री मध्ये वापरू लागले होते. त्याचा स्पिंडल हि मोठा असतो. काम पण वेगळं आहे. काही अतिरिक्त नॉलेज ची गरज होती जे आमच्यापाशी कणभर हि नव्हतं. त्यातलं एक काम हे त्या प्रकारच्या स्पिंडल refurbishment मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, ते by default करावं लागतं याचा आम्हाला पत्ता हि नव्हता. पण आम्ही मग त्याच्या मागेच लागलो. मिळेल तिथून त्याचं नॉलेज गोळा करत गेलो. equipments जमा केले. प्रोसेस शिकलो. हे नवीन प्रकारचे स्पिंडल रिपेयर करायला शिकणे हा एक आनंददायी काळ होता. आणि त्याच्या बरोबर आम्ही एकेरी दुहेरी ऐवजी चौकार तर कधी छक्के हि मारायला लागलो.
आज सांगायला मस्त वाटते कि मशिनिंग सेंटर च्या स्पिंडल रिपेयरने आमच्या गाडीची ड्रायविंग सीट घेतली आहे.इतकेच नाही तर २०१२ मध्ये जेव्हा अमेरिकन कंपनी सेटको ने आमच्याशी JV केले त्यामध्ये मशिनिंग सेंटर चे स्पिंडल रिपेयर करण्याच्या proficiency चा सिंहाचा वाटा होता, नव्हे त्यामुळेच झालं ते.
मग २०१० मध्ये तिसरी शेड आणि २०१२ मध्ये अजून ३ शेड (अर्थात सगळं भाडयाच्या) असं करत गाडी १४० sqft पासून ५५०० sqft इथपर्यंत येउन पोहोचली आहे. कंपनीत २६ स्किल्ड लोकं काम करतात.
आज आमची कंपनी महिन्याला ९०-१०० स्पिंडल रिपेयर करते. त्यामध्ये मशिनिंग सेन्टर स्पिंडल, grinding स्पिंडल, PCB स्पिंडल, वूड वर्किंग स्पिंडल यांचा मुख्यत्वाने समावेश होतो. आणि या क्षेत्रातल्या भारतातल्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये आमचा समावेश होतो. कदाचित आत्मप्रौढी वाटेल पण, अगदी नंबर १ ला आहे असं म्हंटल तरी अतिशयोक्ती होणार नाही.
क्रमश: (पाचवा भाग शेवटचा, हे सगळं का लिहिलं त्याबद्दल)

एक नंबर
ReplyDeleteतुम्हाला सांगायला मस्त वाटलं आणि आम्हाला वाचायला
आभारी आहे भौ ....