म्युनिक मध्ये सिटी टूर घेतली होती. अन्द्रेआस नावाचा गाईड होता एक साधारण १०० किलो वजनाचा. थोडा वजनामुळे चालायचा पण त्रास व्हायचा. दिवसभर बडबड करत होता, हा राजवाडा, museum, B M W ची factory, stadium आणि सगळ्यात शेवटी octoberfest. Octoberfest तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच कि तो beer फेस्टिवल आहे. म्युनिकला beer खूप brew होते. (प्रत्येक म्युनिकर वर्षाला १०३ लि beer पितो. जगात एक नंबर झेक १०७ लि: इति अन्द्रेआस). नावाप्रमाणेच इथे आबालवृद्ध beer पिण्यासाठी येतात. १२ ऑक्टोबर चा राजाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हि प्रथा चालू झाली. एक रस्ता आहे साधारण ७५० मीटर लांबीचा (चूकभूल देणे घेणे), त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठे असे मंडप असतात, म्हणजे एका मंडपात ५-६००० लोकं मावतील असे . आणि तिथे एक कलमी कार्यक्रम चालू असतो तो म्हणजे beer ढोसण्याचा. त्या मंडपात जाण्यासाठी प्रचंड रांगा असतात (रांगा चं नका सांगू हो कौतुक आम्हाला).
तर octoberfest ला आम्ही संध्याकाळी ४ वाजता पोहोचलो. बस पार्किंगचे वांदे च होते. खूप लांब बस पार्क करून शेवटी त्या फेस्ट ला पोहोचलो. सूचनेप्रमाणे ६ वाजता परत यायचे होते. ग्रुप disburse झाला. मरणाची गर्दी. मी आणि अजून ५ जण अन्द्रेआस बरोबर लटकलो होतो. रस्त्याच्या शेवटी एका टेन्ट मध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे त्या जाड्यामुळे. नाहीतर फक्त बीअर चा वासच घेऊन परत यावं लागलं असतं. अमृततुल्य मध्ये असतात तशी निव्वळ बाकडी असतात लांबच्या लांब, मध्ये एक टेबल. त्यावर बसायचं आणि मग त्या ललना घेऊन येतात ते १ लि चे टम्पास. आणि मग हाणायच अमृत जमेल तेवढं
आमच्यात एक जोगळेकर म्हणून होते. त्यांनी एक भारी jacket (अगदी किमतीत सांगायचं असेल तर ५-६ हजाराचं) घातलं होतं. गर्दीमध्ये उकडायला लागलं म्हणून बाजूला काढून ठेवलं. बीअर प्राशन झाले २ मग प्रत्येकी. घाई होती, ६ च्या आत बसमध्ये जाऊन बसायचे होते. आणि टायमिंग एकदम कडक, त्यामुळे तडक निघालो परत अन्द्रेआस आणि आम्ही ५ जण. फेस्ट मधून बाहेर पडलो, बसच्या दिशेनं जायला लागलो. अन्द्रेआस ला बिचार्याला चालायचा त्रास होत होता. अर्थात तो आम्हाला एका स्पॉट पर्यंत सोडून अलविदा म्हणणार होता. तो स्पॉट साधारण २०० मी असेल आणि जोगळेकर थबकले आणि फक्त म्हणाले "jacket राहिलं" आता बोंबला. तेव्हा सांगताहेत बायको नि वाढदिवसाला घेतलं होतं २ महिन्यापूर्वी. म्हणजे सत्यानाश. अन्द्रेआस नि ताडलं काय झालं म्हणून. थोडा खल झाला, एवढी गर्दी तिथे, कोण ठेवणार ते आणि परत पोहोचण्याची वेळ, कडक जर्मन बस चालक यावरून सर्वानुमते असे ठरले कि त्या jacket वर पाणी सोडायचे. (कि बीअर सोडायची). जोगळेकरांनी सुद्धा खुल्या मनाने बायकोच्या शिव्या खायची तयारी करून घेतली.
अन्द्रेअस ला अलविदा म्हणण्याची जागा आली. बिचार्याने आमच्यासाठी खूपच त्रास घेतला होता. वजनामुळे चालायचा त्रास असून सुद्धा आमच्याबरोबर न कंटाळता भटकला. फेस्टमध्ये त्याच्या बीअर चे पैसे आम्ही दिले तीच काय टीप (१५ युरो मोजले हो वट्ट).
त्याला अलविदा करून आम्ही बस मध्ये अगदी वेळेवर पोहोचलो. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती, पण काही इलाज नव्हता. आमचा पुढचा कार्यक्रम डिनर चा होता एका Indian Restaurant मध्ये.
आम्ही पोहोचलो तर buffet मांडूनच ठेवला होता. सूप घेतले आणि ग्रुप मध्ये गप्पा चालू झाल्या. गप्पा अर्थात जोगळेकरांच्या jacket बद्दलच होत्या. तिथली गर्दी, आणि त्यामुळे कसं बाजूला काढून ठेवलं आणि विसरलो वैगेरे…………. आम्हाला पोहोचून २०-२५ मिनिटे झाली होती. आणि माझं लक्ष हॉटेलच्या मेन गेट कडे गेलं. अचानक मला चेहरा घामाने डबडबलेला एक जाडा माणूस दिसला आणि हो अन्द्रेआस च होता तो आणि त्याच्या उजव्या हातात होतं ते…………………………… जोगळेकरांचे jacket.
आम्ही अवाक झालो होतो. आम्हाला बाय केल्यानंतर अन्द्रेआस ला काही करमेना. तो परत त्या शेवटच्या टेंट मध्ये चालत गेला. त्या ५-६००० लोकांच्या टेंट मध्ये ते jacket होतं त्याच बाकड्यावर. अन्द्रेआस नि त्यावर झडप च घातली आणि झपझप आमच्याकडे येऊ लागला.आमच्या गप्पामधून त्याला कळले होते कि आम्ही कुठल्या तरी Indian Restaurant मध्ये जाणार होतो. ते तसं फेस्ट पासून लांब होतं. पण पठ्ठ्या आला शोधत. त्याचे बीअरचे पैसे देताना गुणिले ५५ चा हिशोब करणारा मी, मानभावीपणे त्याला जेवायचा आग्रह करत होतो. पण अन्द्रेआस काही बधला नाही. काही महत्वाचे काम आहे म्हणून सटकलाच. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर ख़ुशी ओसंडून वाहत होती. माझे लक्ष बाय बाय करणाऱ्या अन्द्रेआस च्या घामेजलेल्या चेहऱ्याकडे गेले……………. त्यावर एक वेगळेच आत्मिक समाधान विलसत होते.

No comments:
Post a Comment