लहानपणापासून मी एका प्रश्नाची फारच धास्ती घेतली आहे तो म्हणजे "मार्क्स किती मिळाले?". ह्या प्रश्नाचे उत्तर देता देता मी मोठा झालो, engineer झालो. यथावकाश लग्नही झाले, दोन मुले झाली. तो अवघड प्रश्न आयुष्यातून हद्दपार होता होताच मुलांच्या रूपानी परत शार्क माशाच्या जबड्या सारखा आ वासून तो प्रश्न समोर येऊ लागला "मार्क्स किती मिळाले?".
"माझ्या मुलांनी कधी पहिला नंबर सोडला नाही" हे वाक्य माझ्या पालकांना म्हणायची मी कधी नौबत च येऊ दिली नाही. (माझी मुलही हा वडिलोपार्जित वारसा अगदी जिद्दीने पुढे चालवीत आहेत). माझ्या शालेय जीवनापसून ते अगदी कॉलेज पर्यंत माझे जे गुणसंकीर्तन झाले त्याची तुलना फक्त भारतीय अर्थव्यवस्थेशी होऊ शकते……………कायम दोलायमान. कधी वर तर कधी तळाला. (बहुतेकवेळा तळालाच). आणि अतिशय unpredictable.
तिसरी पर्यंत यवतमाळ ला शिकलो आणि चौथी ला सरस्वती भुवन औरंगाबाद येथे आलो. बरीच मुले scholarship चा फॉर्म भरत होते म्हणून आमच्या बिदरकर बाईंनी मलाही सांगितले, किंबहुना आईला सांगितले याचाही फॉर्म भरा. परीक्षा दिली आणि विसरून सुद्धा गेलो. काही महिन्यांनी आमच्याच कॉलनीत शेजारच्या कडे पेपर वाचत होतो आणि शिष्यवृत्ती चा निकाल दिसला. आपला "निकालच" लागला असेल या भावनेने वाचत असतानाच अघटित घडले, चक्क माझा नंबर झळकत होता. उड्या मारत घरी आलो, आईला सांगितले. पोळ्या करताना मातोश्रींनी ढूंकूनही न बघता म्हंटले "नीट बघ, तुझाच नंबर आहे का? नाहीतर....." Confidence च तसा होता.
Scholarship च्या पार्श्वभूमीवर ५ वीला पेठे हायस्कूलला डेरेदाखल झालो. पहिल्याच चाचणीत गणितात २४/२५ मिळवून झळकलो, आणि गाडी उताराला लागली. सातवीला तर पार प्रगतीपुस्तकावर चाचणी परीक्षेत लाल शेरे बसले आणि विषय कोणते तर गणित/विज्ञान. भूकंपच झाला की हो! पण आईबाबा जास्त रागवायचे नाहीत. म्हणजे त्यांना राग यायचा नाही असे नव्हते तर त्यांना माझी बौद्धिक कुवतच माहिती होती. त्यांना माहिती होते गाढवाला घोड्यांच्या रेस मध्ये पळ म्हणून सांगण्यात काही मतलब नाही.
आठवीला अंकगणित सुटले आणि भूमिती/बीजगणित आले आणि माझी बुडालेली नाव जरा व्यवस्थित तरंगू लागली. दहावीला शाळेतले महारथी शिक्षक आणि विभा देशपांडेंचा क्लास यांनी फटके व्यवस्थित बसू लागले. मेहराचा तेंडुलकर झाला म्हणा की! पालक शिक्षक सभेत ८०% च्यावर मार्कस् मिळण्याच्या संभाव्य मुला मुलींवर चर्चा व्हायची. माझे नाव कुठेच नसायचे. आमची आई हळूच कुठल्यातरी सरांना विचारायची " राजेशला मिळतील का हो ८०% च्यावर" आता त्यावेळचे गुरूजीही भिडस्त. ते आईच्या समाधानासाठी हो म्हणायचे. शेवटी एकदाचे ८४.७१% मिळाले आणि त्या माऊलीचा जीव भांड्यात पडला. तरी एका मित्राचे वडील म्हणालेच "अरे याला कमी मिळाले ठीक आहे, तुला कसे काय एवढे मिळाले. बोर्डाचं चुकलं बरं का काहितरी" आता बोला! (आता खरं सांगायला हरकत नाही......................मला पण आणि आमच्या घरच्यांना पण तसंच वाटत होतं)
नंतर मेकॅनिकल इंजि चा डिप्लोमा. इथे म्हणजे सगळा आनंदी आनंद होता. आधीच इंग्रजीचं ज्ञान अगाध, माझंही आणि सरांचही. चित्र विचित्र विषय. कशीबशी चालढकल चालू होती. मित्रांच्या मदतीने वर्कशाॅप, ड्रॅाईंग पार पडत होते. शेवटच्या वर्षात तर गॅदरिंगमधील सहभागामुळे internal चे मार्क्स फिट झाले होते. Theory मध्ये अक्षरश: काठावरती पास झालो होतो. गोळाबेरीज (माझ्यासारख्या गोळ्याला किती चपखल शब्द आहे) केली तर झीट यायचीच बाकी राहिली. चक्क first class आला होता. जनरल नाॅलेज च्या competition मारून, क्रिकेट/बॅडमिंटन मनसोक्त खेळून नैया पार झाली होती. (खरंतर जनरल नाॅलेज मध्ये माझा एक ज्युनिअर होता कोतवाल म्हणून. उत्तर तो द्यायचा, मी बक्षीस घेउन यायचो)
डिप्लोमा नंतर खरं तर नोकरी ला लागायचो, प्लान पण तोच होता. बजाज मध्ये चांगली ८ ० ० रू पगाराची नोकरी होती . पण साला या first क्लास नि घात केला. आई बाबाना वाटले पोरांनी आता graduate व्हावे. त्यांना काय महिती होते हा first क्लास कसा आला ते. खरं तर बरं होते माहित नव्हतं, नाहीतर बजाज कंपनी राहू दे म्हंटले असतं आणि कुठल्या तरी ग्यारेज मध्ये कामाला लावलं असतं.
पोटाला चिमटे काढून भारती विद्यापीठ ला PRODUCTION engg ला दाखल झालो . सुदैवाने हि branch जर सोपी होती. आता बर्याच जणांना हे माहितीच नाही आहे कि mechanical engg पेक्षा हि सोपी आहे ते . मी ते कुणाला न सांगता स्वतःची लाल करून घेत होतो. नाही म्हणायला m ३ m 4 जिथे आमचे डिप्लोमा वाले हमखास गचकायचे, तिथे झेंडा जोरात फडफडला होता . अर्थात त्याला कारणे बरीच होती. third year ला ज्याला प्राकृत भाषेत "लफडं " आणि संस्कृत भाषेत " affair " म्हणतात ते चालू झालं. वाटले आता आपण गचाकणार पण वाचलो, त्यात माझ्या हुशारीचे कौतुक नव्हते तर वर लिहिल्याप्रमाणे ती branch सोपी…………
distinction ने BE झालो, पण कारण सांगितले न कि branch……………आता पुरे, च्यायला विनय म्हणून कौतुक केलं तर अतीच चालू आहे .
नंतर एक GRE नावाची परीक्षा होती. त्याचा स्कोअर हा तेव्हा प्रतिष्ठेचा विषय होता. मी आपलं " मेरा भारत महान" वैगेरे patriotism च्या नावाखाली त्याची बोळवण करून टाकली. आणि GATE, तो विषय तर मला आजही अप्रिय आहे. पण दुर्दैवाने माझ्या या attitude मुळे देश एका महान आयआयटीयन पासून वंचित झाला. असो.
अशा पद्धतीने माझा मार्क्सवाद शिक्षणाच्या रूपाने संपूर्ण झाला.
(या मार्क्स शब्दाचा एवढा धसका घेतला आहे की काही फेसबूक चे मित्र कार्ल मार्क्स वर काही लिहीतात, मी त्या पोस्टच्या वाटेलाच जात नाही)

No comments:
Post a Comment