Wednesday, 28 May 2014

Duranto 27/05/2014

आनंद झाला, ठीक आहे. पण पाकिस्तानचे पंतप्रधान भारताच्या राष्ट्रगीताला उभे राहिले याचं "ग्वाड" वाटणे किंवा गुदगुल्या झाल्या अशा ७-८ पोस्ट वाचल्या. हे काही झेपलं नाही बुवा! म्हणजे protocol देशांचा आणि तो पाळला त्यात गुदगुल्या होण्यासारखं काय आहे? म्हणजे उद्या आपले पंतप्रधान पाकिस्तानात गेले आणि ते त्यांच्या राष्ट्रगीतासाठी उभे राहिले, तर आपल्या माना शरमेने खाली झुकणार आहेत का? की आपण असं hypothetical स्वप्नात मग्न आहोत की त्यांचं राष्ट्रगीत चालू झालं तरी आपले पंतप्रधान खाली बसून आपल्या देवाचा जप करणार आहेत,

राष्ट्रगीत ऐकताना रोमांच उभे राहतात हे माहिती होतं. पण गुदगुल्या??

Responsible आणि matured patriotism ही पण काळाची गरज आहे मित्रांनो.

********************************************************************************

क्रिकेट च्या खेळाडूंना (read Sachin Tendulkar) मिळणार्या पैशावरून लोकांचा फारंच पोटशूळ उठतो, का ते कळत नाही. म्हणजे त्यांनी काय करावं असं expected आहे. Endorsement करू नयेत हेच ना. तुमच्या माझ्यासारखी माणसंच आहेत हो, संत नाहीत. बरं तुम्ही या लोकांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर बरेचसे एकतर गरीब किंवा मध्यमवर्गीय घरातून आले आहेत ही. वयाच्या ज्या वर्षापासून आपण पैसे कमावण्याचं स्वप्न पाहतो, त्या वयात त्यांचं career संपतं. मग त्यांनी आयुष्यभर काय करायचं. आधीच प्रस्थापित व्यवस्थेला छेद देत स्वत:चा छंद जोपासायचा, त्यानंतर त्याचं रूपांतर उपजिवीकेसाठी करायचं. विचार करा, अवघड आहे.

आणि क्रिकेट शिवाय एक हाॅकी सोडलं तर प्रत्येक खेळाला हळूहळू का होईना glamour येत चाललंय. सानिया, सायना, आनंद, भुतिया, मेरी कोम, विजेंदरकुमार सगळ्यांना बर्यापैकी पैसे मिळतात. आणि जगात सगळीकडे खेळाडूंना पैसे मिळतात, आपण अपवाद कसे राहू. टायगर वुड्स, बेकहॅम, मेसी, रोनाल्डो, जाॅर्डन या one man industry आहेत. जे आहे ते आहे, मिळतात पैसे हे खरं.

सुदैवाने क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम या खेळांवर हात फिरवला आहे, तुम्ही पण आजमावला असेल. तुम्हालाही माहिती आहे की एखाद्या खेळात excel करताना किती पापड बेलावे लागतात ते. तेव्हा एखादी गोष्ट आवडतं नाही, नका follow करू. (मलाही  IPL चं अ का ठं कळत नाही).

जाता जाता अजून एक observation. आजकाल खेळाडूंना (read Vinod Kambli, Murlidharan, Leander Pes, Bhupsti, virat kohli) बायका किंवा गर्लफ़्रेंड पण फारच सुंदर भेटतात बुवा. त्याचा राग येतो का?

Duranto 27/05/2014

Saturday, 24 May 2014

विकसित भारत

- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा इथले श्रीमंत लोक MRT/Public Transport वापरण्यात भूषण समजतील, ना कि गरीब लोकं कार घरात असण्याचं स्वप्न पाहतील.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा युरोप मध्ये आपला रुपया exchange मध्ये युरो/किंवा डॉलर मध्ये परावर्तित करता येईल.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा अजून एखादा राजेश परभणी जवळ स्वत:ची कंपनी उघडेल आणि तेव्हा त्याला digital divide, दळणवळण, skilled manpower उपलब्धता हे प्रश्न राहणार नाहीत.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा appropriately loaded trucks ७० च्या स्पीड ने अपघात न करता पुण्याहून बंगलोर ला १२ तासात पोहोचतील.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा पाण्याची बाटली हि फक्त पाणी carry करण्यास सोयीस्कर म्हणून विकत घेतली जाईल ना कि सार्वजनिक नळावर ते अस्वच्छ असतं म्हणून.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा आजोबा आजींना रेल्वे प्रवास करताना platform वरचा दादरा कसा चढायचा याची चिंता राहणार नाही.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा एक माणूस दुसर्या माणसाला सायकल रिक्षा वर वाहवेल ते एक joy ride म्हणून, ना कि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटवण्यासाठी.

आणि
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा प्रसूतीपूर्व लिंग निदान केंद्रे पुन्हा चालू होतील, आणि घरात लक्ष्मी किंवा सरस्वती येणार म्हणून जल्लोष केला जाईल, पेढे वाटले जातील.

(सांगायला थोडं कसं तरीच होतं पण "भारत हा कृषिप्रधान देश आहे" या पलीकडे मला शेतीबद्दल काहीच माहित नाही. शेती संदर्भात एक वाक्य हवं होतं)

मित्रानो,  मला असं वाटतं विकसित देश असा असावा. किती मेसेजेस फिरले होते पेट्रोल, डीझेल चे भाव जगभर कमी आहेत फक्त भारतात जास्त आहेत. आपण पण केलेच ना कौतुकाने फोरवर्ड. अहो मिडल इस्ट सोडलं ना, थोड्याफार फरकाने सगळीकडे सारखेच भाव आहेत. किंवा अगदी साधं सांगतो, जिथे क्रूड ओईल मिळतं तिथं स्वस्त. आपण processor. आपल्याकडे महागच. ते जर कमी होतील याच्या भरवशावर असाल तर विसरा. लिटर मागे ५ रु कमी होऊन जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही श्रीमंत होणार, तेव्हा देश गरिबीकडे चालला आहे असं खुशाल समजा.

आणि हो, हे काही सहा महिन्यात किंवा एका वर्षात होईल असं मी अजिबात म्हणत नाही आहे. मी तर म्हणतो या आयुष्यात हे दिसलं नाही तरी चालेल, पण आज दहा वर्षाचा असलेला पोरगा मोठा झाल्यावर म्हणाला कि माझ्या बापानं हे लिहून ठेवलंय तरी बाजी मारली असं होईल.

तेव्हा हे सुस्तावलेलं giant wheel आहे, त्याला गती देण्यासाठी प्रचंड शक्ती आणि तेव्हढाच वेळ हि लागणार आहे. समर्थकानो आणि विरोधकानो, सतर्क राहावं लागणार आहे. आता भरकटून चालणार नाही.

Friday, 23 May 2014

माझी पण चिठ्ठी

चेतन शर्मा च्या शेवटच्या ball वर boundary line वर जर catch पकडला असता तर त्याला हिरो बनवला असता आपण. "काय हुशार (मुत्सद्दी) गोलंदाज आहे. शेवटचा ball आणि फुल toss, मानलं बुवा.  याला म्हणतात थिंकिंग. crisis च्या वेळेस……" वैगेरे वैगेरे.

शेवटची ओवर सचिनला दिली धोनीने. बुकलला असता तर धोनीच्या अकलेचे वाभाडे ;काढले असते. "अक्कल कुठे शेण खायला जाते का. शेवटची ओवर आणि सचिनला, च्यायला नेहरा परवडला………. " सचिनचा पफलू फिट बसला आणि धोनी हिरो झाला.

मुत्सद्दी असणे आणि नसणे हे व्यक्तीसापेक्ष, स्थलसापेक्ष आणि परिस्थितीसापेक्ष बदलत असते. उगवत्या सूर्याला नमस्कार हा जगाचा नियम आहे तर आपण कसे अपवाद राहणार. असो
 
महत्वाचं ते नाही आहे. थोडा वेळ दया हो. अजून शपथविधी ही झाला नाही तर पब्लिक च्या याद्या तयार आहेत. किराणा माल वाल्याला देण्यासाठी कशा तयार करतो अगदी तशाच. (यात विरोधक हि आले आणि  समर्थकांच्या जरा जास्तंच लांब दिसताहेत). जादुगार थोडी आहेत ते कि छु मंतर केलं कि सगळं रामराज्य आलं सगळीकडे.

आणि त्यांच्यावरचे परवाचे विनोद पण अगदीच पांचट बरं का! साधं घर घेतलं किंवा वर्षापूर्वी भाड्याच्याच पण नवीन कंपनीच्या जागेत गेलो तर लोकांच्या समोर बोलताना माझा गळा भरून आला होता. इथे तर च्यायला एकहाती देश ढवळून विजयश्री खेचून आणली त्यांनी. मला तर अगदी नैसर्गिक वाटलं ते. आणि नमस्कार केला तर काय चुकलं हो. म्हणजे ठीक आहे विचार सरणीला विरोध करावाही पण नुसतं आपलं जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी नुसताच विरोध किंवा नुसतं कौतुक, फारच बोर होतं राव.

आता दिली आहे ना सत्ता. आणि लोकशाहीत काही म्हणू नाही शकत मी नाही मत दिलं त्यांना. majority carries the law. तेव्हा आता थांबा आणि १८० दिवस वैगेरे नाही चांगले २ वर्ष थांबा. मग बांधा कि निष्कर्ष. (आमची पार्टी बघा, ९ महिन्यात निवडणूक, लागलीच सत्ता, फडफड निर्णय, लागलीच राजीनामा, लोकसभेची निवडणूक, बेफाम हार आणि आता जेल. तरी  आम्ही अजून चिकटून आहोत). आणि तसंही इतक्या बहुमताने आलेत कि एखाद दुसरा निर्णय चुकलाच तर काही वाकडं करू शकत नाही.

सगळं मित्रमंडळ हुशार आहेच तेव्हा जास्त काय सांगणार. विरोधकांनी आणि समर्थकांनी सतर्क राहावं.

आता एवढं लिहिलंच आहे तर छोटा industrialist म्हणून आपली पण चिट्ठी लिहूनच टाकतो. UPA सरकारनी अडकवलेली GST tax ची कल्पना मूर्त व्हावी. वेगवेगळ्या tax चे return file करताना थकतो हो आम्ही. एकच tax करा १५,१६, अगदी १७% टक्क्यापर्यंत करा आणि गोळा करून लोकल body आणि स्टेट ला द्या.

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.

- रामं (टोपण नाव लावलंय, नवीन सरकार आल्यापासून)
माझी पण चिठ्ठी

सुविचार

तुमच्या आयुष्यातून विखारी विचारांच्या लोकांना हद्दपार करून देण्याचा अजिबात पश्चाताप होऊ देऊ नका. मग ते कुणीही असो, तुमचा नातेवाईक, तुमच्या कंपनीतील साहेब किंवा अगदी कंपनीचा मालक, ज्याच्याबरोबरच्या  रम्य आठवणी असतात तो बालपणीचा मित्र, इतके दिवस आगंतुक असलेला पण नुकतीच ओळख झालेला किंवा जिच्याबद्दल प्रेमाकर्षण वाटते अशी व्यक्ती. तुम्हाला सतत व्यथित करणाऱ्या, दु:खी करणाऱ्या किंवा हीन लेखणार्या लोकांची, तुमच्या मनाच्या कोपर्यात सुई इतकी पण जागा व्यापण्याची लायकी नाही आहे. परिस्थितीला समजून उमजून एखादी व्यक्ती तिच्या वागण्याचं स्वामित्व घेत वेळप्रसंगी त्यात बदल करण्याची तयारी दाखवत असेल तर ठीक, पण जर ती व्यक्ती तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहत, तुमच्या भावनांचा अनादर करत, तुमच्या मनाला ठेच पोहोचेल असंच चालचलन ठेवत असेल तर अशांना तुमच्या आयुष्यातून बेलाशक हाकलून देण्यात हयगय करू नका

WhtasApp वरील इंग्रजी मेसेज चा स्वैर मराठी अनुवाद


सुविचार 

Saturday, 17 May 2014

CEO

वसंतराव फारच कडक गृहस्थ. शाळेचे मुख्याध्यापक. हेडसर म्हणायचे त्यांना. त्यांचा मुलगा समीर हि त्यांच्याच शाळेत. वडिलांचे लक्ष. संस्कार. नजरेत जरब. समीरचे पण सगळ्यांशी खेळीमेळीचे संबंध होते. वसंतरावाना आवडत नसे ते. त्यांना कसं सगळं टापटीप लागायचं. कुणी विद्यार्थ्याने दुसर्याला काही मागितलेलं अजिबात आवडत नसे. शाळेचा गणवेश पण कडक लागे. अजिबात हयगय नाही.

समीरच्या शेजारी बाकावर सुरेश नावाचा परोपकारी मुलगा बसायचा. एकदा इस्माईल नावाचा अत्यंत गुणी परीक्षेच्या वेळी खोडरबर विसरला, परोपकारी सुरेशने लागलीच समीरच्या कंपास मधील रबर काढून इस्माईल ला दिले. आणि हे सरांनी बघितले. पुढे मागे न बघता काडकन सुरेशच्या कानाखाली लावली आणि इस्माईल ला पायाचा अंगठा धरायची शिक्षा दिली. खरं तर शाळेत शोएब नावाचा व्रात्य मुलगा होता, सगळ्यांना खूप त्रास दयायचा. सरांचा त्याच्यावर खूपच राग होता. तोच राग त्यांनी इस्माईल या हुशार मुलावर काढला. 

एकदा आंतरशालेय स्पर्धा होती. समीरला शाळेचा लीडर म्हणून पाठवलं. हेड सर पण हजर होते. सरांना दिसलं कि आपल्याच नजरेखाली, आपल्याच शाळेत शिकलेलं पोरगं काही छाप पाडत नाही आहे. बुजतंय. काहीतरी चुकत होतं.

सरांनी समीरला सरळ दुसर्या शाळेत टाकलं. पोरगं थोडं चमकू लागलं. तिथे गणवेशही पक्का नव्हता, थोडं मोकळं ढाकळ वातावरण होतं. समीर त्या नवीन शाळेत रमू लागला. अधून मधून अभ्यास, खेळ यात प्राविण्य हि मिळवायचा, पण परत सहा महिन्यात गाडी बिघडायची. पण एकंदरीत स्वत:च्या शाळेपेक्षा या नवीन शाळेत समीर ची चांगलीच प्रगती होऊ लागली. पण हेड सर लक्ष ठेवून होते. नवीन शाळेची प्रार्थना वेगळी असली तरी शाळेतून परत आल्यावर स्वत:च्या शाळेची प्रार्थना समीर कडून ते वदवून घ्यायचे.

यथावकाश शाळा संपली. महाविद्यालयीन शिक्षण सुरु झालं. तिथंही परिस्थिती कभी ख़ुशी कभी गम अशीच होती. दोलायमान. उच्च शिक्षण करायचं होतं. donation लागणार होतं. सरांचा विरोध होता. पण बाकी मित्रांनी सांगितलं, आता मागे नका बघू. जगात यशस्वी व्हायचं असेल हे उच्च शिक्षण हवेच. सरांनी रसद पुरवली समीर उच्च शिक्षित झाला.

समीर वर वडिलांचे फार ऋण झाले. संस्कार तर होतेच पण शिक्षणाला आर्थिक मदत पण केली.

समीर नोकरीला लागला. छोटीच कंपनी होती. हळू हळू एक एक शिडी चढत तो कंपनी चा हेड झाला. हेड होतानाच कंपनीत वचक निर्माण केला होता. काही लोकं टरकूनच असायचे. समीरचे यश बघून वसंतराव पुन्हा तरुण झाले. वसंतरावांनी सांगितलं समीरला "आता मागे बघू नकोस, ती multinational कंपनी बघतोयस. पार डबघाईला आली आहे. कुणाचा कुणाला पायपोस नाही आहे. finance department मध्ये top management ला आव्हान देत एक जण आला आहे पण त्याचं काही खरं नाही. तो नाही टिकणार कंपनीच्या अवाढव्य आकारासमोर". सध्याची कंपनी छोटी असली तरी तिचं balance sheet strong झालं होतं. कुणी म्हणतात त्यात manipulation केलं, कुणी म्हणायचे कंपनी एकदम छान आहे वैगेरे. पण एकंदरीत समीरची पत मार्केट मध्ये वधारली होती. नातेवाईक आणि मित्रांमध्ये पण समीरचा बोलबाला झाला.

समीर ला सुद्धा ते आव्हान खुणावू लागलं. त्याने सरळ छोट्या कंपनीचा राजीनामा दिला. त्याचाच एक विश्वासू साथीदार होता त्याला हेड बनवला. आणि स्वत: multinational कंपनी चा CEO बनला. हि कंपनी मोठी असली तरी तिची वाट लागली होती. छप्पर फाटला होतं, toilet चे नळ गळत होते. लोकांचा पगार वेळेवर होत नव्हता, tax department च्या नोटीसा येउन पडल्या होत्या. नुसती  अंदाधुंद झाली होती. नाही म्हणायला systems जागेवर होत्या, बँकेत credential होतं अजूनही, ,मालमत्ता हि होती पण collateral security म्हणून गहाण होती.  आता या अशा अवाढव्य कंपनीला परत जागेवर आणण्याचा अवघड शिवधनुष्य समीर ने पेलायचं ठरवलं होतं. अनेक कामगार समीर कडे डोळे लावून बसले होते. त्यांच्या नजरेत आशेचा किरण होता.

वसंतराव एव्हाना समीरच्या दैदिप्यमान यशाने भारावले होते. इतक्या वर्षाच्या मेहनतीचं चीज झालं होतं. समीर च्या नवीन नोकरीचा पहिला दिवस. वसंतरावाना नमस्कार केला. त्यांनीही समीरला आशीर्वाद दिला. म्हणाले "बाळा, माझी तत्वं विसरू नकोस". समीर ने त्यांचा हात प्रेमाने दाबला.

कंपनीच्या गेट मध्ये शिरताच कंपनीतील जुने दोन अधिकारी समीरच्या आजूबाजूला उभे राहून चालू लागले आणि सांगू लागले "इथे परिस्थिती अवघड आहे. नवीन तत्व अंगीकारावी लागतील. तुमच्या वडिलांनी भले तुम्हाला काही शिकवले असेल. पण इथे त्या तत्वांनी जाल तर वांदे होतील तुमचे. आणि मुख्य म्हणजे शिक्षण संस्था आणि कंपनी यात फरक आहे." वडिलांचा उल्लेख झाल्याबरोबर समीरला त्यांनी केलेले कष्ट आठवले, त्यांचे संस्कार, त्यांची प्रार्थना शिवाय शिक्षणाची मदत. हे आठवल्या बरोबर समीरची नजर ताठ झाली आणि त्यांनी त्या दोघांकडे पाहिलं आणि काहीच प्रतिक्रिया न देता तो ताडताड कंपनीच्या प्रवेशद्वारातून आत गेला.

समीरच्या मनात काय आहे हे कुणालाच माहिती नव्हतं.

पण वडिलांच्या काही तत्वांना फाटा देण्याची हुशारी एव्हाना समीर मध्ये आली असावी. त्यांची कालातीत तत्व आणि नवीन जगाची बदलती समीकरणं घेऊन समीर ने कंपनीला गर्तेतून बाहेर काढावं असंच प्रत्येकाला वाटू लागलंय.

Thursday, 15 May 2014

दिगू

- कसं आहे, स्वत: Japanese कार मध्ये किंवा अमेरिकन कार मध्ये बसायचं आणि दुसर्याला मात्र patriotism च्या नावाखाली टाटा ची indica किंवा indigo कशी चांगली आहे ते पटवायचं

- स्वत:च्या arteries block झाल्या तर रुबी hall सारख्या हॉस्पिटल मध्ये जाऊन angioplasty किंवा bye pass करून घ्यायची आणि दुसर्याला मात्र खोपोलीजवळ च्या माधवबागेत कसं स्वस्तात हृदय रोग बरा होतो त्याचं lecture झोडायच. (व्यायाम करायचा आणि आहारावर कंट्रोल पाहिजे रे……… वरती अजून हे)

- स्वत:च्या धर्मपत्नी रिलायन्स मधून किराणा भरते ते चालतं, मित्राच्या बायकोला मात्र "रास्ता पेठ च्या नवलखा मध्ये किराणा भरत जा हो. स्वस्त आणि क्वालिटी पण एक नंबर"

- सरकारी अधिकारी आला आणि लाच मागितली कि त्याच्या एक कानाखाली लावायची म्हणे आणि तिच्या मारी ट्राफिक पोलिसाने पकडल्यावर ५०० रुपयाची सेटिंग १०० रुपयात करून वरती शहाजोगपणे सांगायचं "काय राव भ्रष्टाचार फार वाढलाय"

- सेमीनार मधे सांगायचं capital expenditure करताना working capital वर स्ट्रेस आला नाही पाहिजे. CSR (corporate social responsibility) मध्ये profit share केला पाहिजे. प्रत्यक्षात पैसे siphon करायचे आणि सप्लायर्सच्या पैशावर धंदा करायचा.

आणि सगळ्यात horrible म्हणजे

- साला सगळ्यांच्या समोर मार पुरोगामित्वाच्या गप्पा मारायच्या आणि कंपनीत लोकं घेताना स्वत:ची नातेवाईक नाहीतर वशिल्याची मंडळी भरायची.

आणि अशा दांभिक लोकांच्या बद्दल निषेध नोंदवायचा या आभासी जगात फेसबुकवर आणि प्रत्यक्षात संध्याकाळी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बियर चे घुटके घेत त्यांच्या हो ला हो म्हणायचं. ही माझी सोयीस्कर सामाजिक जाणीव आहे.

भाऊ, जास्त विचार नको करू, नाहीतर सिंहासन चा दिगू होईल तुझा.

Wednesday, 14 May 2014

Political Views

२-३ आठवड्यापूर्वी वातावरण फारच तापलेले होते. म्हणजे अगदी विनोदाच्या अंगानी  किंवा हलक्या फुलक्या ढंगानी लिहिलं तरी मित्र पार शिंगावरच घ्यायचे आणि पार फेकून दयायचे. आणि मग विविध विशेषणं दयायचे. अशाच एका जवळच्या मित्राबरोबर खडाजंगी झाली. म्हणजे काय तो सगळी आयुधं घेऊन तुटून पडला होता. मग मी त्याला खालील मेल पाठवली. exit poll चे अंदाज  हि आले आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे. चला म्हंटल ती मेल शेयर करूनच टाकावी. अर्थात हे सगळं झालं असलं तरी मैत्री अबाधित आहे कारण तिचा पाया फारच भक्कम आहे. तिच्यावर आच नकोच.

Dear xxxxx ,

By virtue of socially networked life style I expressed my political views recently on Facebook. (Not on Whatsapp as I think our closed knit group do not need political discussions). I must admit that I never expressed it in the past. I was never firm of it too. We had difference of opinions on backing up political parties. Having our own opinion indicates that democracy is live and I appreciate, admire it. I would not impose my views on you. I never did it in past nor I will do it in future. It is your thinking and I respect it.
>
> Now first let me explain you something in details:
>
> - I request you to be responsible netizan. Do you really think that the clip you sent me today carries any credentials?  What is this chouthi duniya.? Do you know the people who run this.? Do you really think that any sane person can reveal the things the way it is done in interview? Think twice before forwarding. I have visited website and Facebook page. Had it carry any weight it would have been viral by now. Remember it is posted on 19/04/2014 and we are talking on 05/05/2014. Good 15 days. Do not fall prey to these internet gimmicks which are mushroomed every day and die next day. I do not know if you have read my following status on Facebook.
>
> जेव्हा आपण एखादी पोस्ट शेअर करतो, आणि त्यास आपण सहमत आहोत की विरोध आहे हे लिहीत नाही तेव्हा आपसूक त्यात लिहीलेल्या मजकुराचे स्वामित्व आपल्याकडे येते. तेव्हा त्यात एखादी चूक दाखवली, मग ती कितीका serious असू द्या त्याची responsibility घेण्याची तयारी पाहिजे.
>
> फेसबुकवर तरी कळते आपण कुणाचा मेसेज शेअर केला ते. WhatsApp वर तर ते पण कळत नाही. पण तरीही त्याची सत्यासत्यता न पडताळता आपण जेव्हा मेसेज forward करतो तेव्हा त्याचे धनी आपणच असतो. तेव्हा असं म्हणून चालत नाही की ते माझं मत नाही.
>
> विन्स्टन चर्चिल, जॉन मेकॉले, विवेकानंद, कलाम, टाटा, बच्चन यांचे म्हणून मेसेज शेअर करताना ते त्यांचेच आहेत का हे तपासा आणि मगच पुढे ढकला. तसेच आजकालचे सर्व पक्षाचे नेते यांना सपोर्ट म्हणून तर काहींना विरोध म्हणून धादांत खोटी माहिती फिरवली जाते आणि आपण ती फिरवत जातो. मला असं वाटतं काळजी बाळगायला हवी.
>
> Be a responsible netizen नाही का?
>
> And I mean this. We should not be too susceptible to this myth which not only gets originated of internet but also becomes larger picture in which eventually we start believing. I am not going to get woo out of this internet stories, videos unless I have solid proof to believe it. Just tell me one instance where I have sent you videos, stories some one's thought to back up my views. Whereas all my friends are doing this day and night.
>
> - Now regarding Modi. I think you and many of my friends are misinterpreting that I oppose Modi. I am sorry friends, it is not so. I have written in one of my comments that I had been to Gujarat over 100 times since Modi became Chief Minister. Keeping aside the hype created of development in Gujarat, one thing is pretty sure that from beggar to CEO of company praises Modi. I spoke to hundreds of people and everybody supported Modi. Do you think I am fool to consider above all of them. No way. Me too admire him like you do. My opposition is to BJP. If you think on broader scale, it is ideology of BJP that does not appeal me. In the pretext of development they carry something else. The day BJP leaves a tag of religious party and carries a  any other tag like capitalist, socialist, labor, I am in for it. Remember that Congress's timid secularism is useless and put India in to all kind of troubles. On the same grounds BJP's aggressive religion based ideology is equally dangerous or I should say it is more hazardous to India as a country.
>
> - Second problem is the way BJP promoting Modi to the extent saying Modi Sarkar instead of BJP sarkar. To the extent "your every vote will come to me" instead of respective candidate or to BJP. I think the whole thought process in promoting individual over party is dangerous. Again, let me be clear that I would be more than happy if we get stable government out of this game. Nonetheless, it will be interesting to see five years down the line how are we developed as nation and as society. It tinkles in the ear when we talk on presidency rule etc on the basis of US. My dear friend, US  was fairly ahead of world being one religion country while they adapted this form of democracy. And the losses they have incurred due to this presidency rule are immeasurable. It was US who had loads of money could survive of its mistake, though leaving the country in to all kind of financial problems.
>
> - Forget about AAP. It is out of no choice. At one side, it was congress who are left paralyzed being without captain and on the other side BJP whose path of driving nation does not suit me. I do not know if Kejriwal is hypocrite or so. I can not ignore the fact that he is an IITian. I heard him while he talked on RTI. That left impression on me that he could be good alternative to this rotten system of fight between secularism and over reactive religion based thinking. We need a person who has this third angle which is far different than conventional wisdom. I could see that light in AAP as a party.
>
> - Politics is not a life and death for me. I have some thing better to die for. I have 23 families depending on me. But on the larger purpose of life, their well being is dependent on the way nation carries itself. You will find my posts are light worded and not out of hate.
>
> At the end, I can only tell you that these views are developed out of deep thoughts and not out of blue or being influenced by some one else. It took good old 16 years (considering that I might have become social at the age of 30) and it would not be changed unless I see  thought process which is in the good interest of nation. I will certainly go with it.
>
> I hope, I have tried to clear many things, since many of my friends termed it as "waste of time" "hopeless views" etc. Your todays video clip was height of it which prompted me to write in so much details.
>
> With love
>
> Rajesh Mandlik

You can use Facebook this way too

Man is not born to remain tangled in his unfulfilled or broken dreams. If human mind can dwell in past, it definitely cannot be chained and kept bound there, because he has a divine boon and strength for flying in the future with a vision. To dream, to make those dreams a reality, to put every possible effort in materializing those dreams into actuality and if for unfortunate reasons those dreams get ruined then walking on those shattered pieces with the injured feet full of blood towards reconstructing the same or following a new dream is a human virtue. And just because of this fact human existence acquires a purpose.

कुठे लागतोय का संदर्भ. Conference ची theme होती "Dream though times are turbulent" मला पण बोलायचं होतं. माझ्या छोट्या भाषणाचा शेवट वि स खांडेकरांच्या माझ्या आवडत्या वाक्याने करावा असं वाटलं. समोर भारताच्या विविध राज्यातून आलेले प्रतिनिधी. त्यामुळे मराठीतून सांगितलं असतं तर काहीच कळलं नसतं. पण इंग्रजीतून सांगायचं म्हणजे मग धूळदाण. अजून प्रत्यक्ष कधीही भेटलो नाही पण विचाराने जवळ आलेले खूपच मित्र झालेत फेसबुकवर. वाक्य पाठ होतंच, पाठवलं. आणि मदत तत्पर Shiva Aithal माझ्या मदतीला धावून आले. आणि वरील अनुवाद पाठवला त्यांनी दहाच मिनीटात. टाळ्या खाल्या हे वेगळं सांगायलाच नको. आपलं असं आहे "आयजीच्या जीवावर बायजी उदार"
तुम्ही वाचलं आहेच पण परत तुमच्या reference साठी
" भग्न स्वप्नांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही आहे. मानवाचे मन भूतकाळाच्या साखळदंडा नी करकचून बांधून ठेवता येत नाही, तर त्याला भविष्याच्या गरुड पंखाचे वरदानही लाभले आहे. एखादे स्वप्न पाहणे, ते फुलविणे, ते सत्यसृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावले तर रक्ताळलेल्या पावलांनी त्याच्या तुकड्यावरून दुसर्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या आयुष्याला अर्थ येतो तो या मुळेच. "
बहुतेक अमृतवेल
Milind P. Shinde यांच्या पोस्ट वरून प्रेरित
आणि शिवा, तुमचे आभार मानायचे राहून गेले, तेव्हा ही पोस्ट तुमच्यासाठी

Friday, 9 May 2014

वस्तुस्थिती

आज काल मी बर्याच पोस्ट वाचतो कि अमेरिकेला आपला बिझिनेस वाढवायचा आहे भारतात म्हणून मेडिया ला हाताशी धरले आहे वैगेरे. जे मांडलं जातं त्यात थोडं तथ्य असेलही कदाचित, पण थोडंच. माझा काही या विषयावर अभ्यास नाही किंवा आंतरराष्ट्रीय देशाच्या संबंधावर मी काही प्रोजेक्ट पण केला नाही आहे. एक छोटी कंपनी आहे, थोडी माहिती आहे. त्याला back up नाही आहे. जे तर्क बुद्धीला वाटतं ते लिहितोय.

अमेरिका किंवा युरोप ला आपली बाजारपेठ खुणवत आहे म्हणून strategically ते आपल्या मेडिया मध्ये घुसत आहेत किंवा ओबामा प्रशासनात काही भारतीय appoint करत आहेत या मध्ये मला काही तथ्य वाटत नाही. अंतर्देशीय बाजारात माझ्या मते middle east शी आपला जास्त व्यापार असावा चायना, अमेरिका, युरोप हे त्यानंतर येत असतील. पण एक गोष्ट नक्की कि चायना कडून आपण जास्त गोष्ट import करत असू त्यांना export करण्यापेक्षा. आणि अमेरिकेत मात्र किंवा युरोप ला याच्या बरोबर उलट. म्हणजे आपला पाश्चिमात्य देशात बिझिनेस आणि पर्यायाने इंटरेस्ट जास्त आहे न कि त्यांचा आपल्यात. या उलट चायना किंवा कोरिया यांना आपल्याला विविध गोष्टी supply करण्यात जास्त इंटरेस्ट आहे.

माझी काही निरीक्षणे:

- भारतातील नंबर एक कार कंपनी: सुझुकी जपानची आहे
- दोन नंबर ला Hyundai कोरियन आहे.
- white goods मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या LG आणि Samsung दोन्ही कोरियन आहेत.
- देशातील जनता ज्या गोष्टी जास्त consume करते त्या Asian country तून येतात.

म्हणजे भारताच्या लोकसंख्येचे कौतुक हे आशियातल्या देशांनाच आहे.

अमेरिकेतल्या general motors किंवा ford तसंच युरोप मधल्या Mercedes, Volkswagen, Volvo यांचे भारतातले प्लांट हे तुलेनेने लहान कमी investment चे. (नाही म्हणायला Benz ने चेन्नई ला HCV चा प्लांट उभा केला पण अजून पूर्ण capacity ने चालू व्हायचा, त्यात recession).

ज्या McDonald, KFC किंवा Wall mart वरून बोंब मारली जाते कि अमेरिकेला हे मार्केट खुणावतंय त्यांनी असे किती पाय रोवले हे जर बारकाईने बघितलं तर खिजगणतीत हि नाही आहोत आपण. २-३ किमी च्या लांबीच्या अमेरिकेच्या रस्त्यावर  McDonald, KFC, Subway, Pizza Hut यांची रेलचेल असते तिथे ९-१० किमी च्या सिंहगड रोड वर यापैकी एकही outlet नाही आहे. cadbury, नेसले, या कंपन्या कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसल्या आहेत भारतात पण त्यांच्या जागतिक उलाढालीपैकी भारत किती contribute करतो हे बघितलं तर लक्षात येईल कि आसपास पण नाही आहे आपण. हीच गोष्ट पेप्सी आणि कोकाकोला बद्दल असावी असा माझा अंदाज आहे. potential लाख असेल हो पण buying power तर पाहिजे ना.

ज्या SKF कंपनीत मी career चालू केलं तिची कित्येक वर्ष उलाढाल ३००-४०० कोटी मध्ये फिरत होती आता कुठे १२०० कोटीला पोहोचली आहे. किती वर्षानंतर तर तब्बल ५३ वर्षे.

अमेरिका तरी ठीक आहे हो, थोडा तरी भाव देतं आपल्याला. युरोप तर उभं पण करत नाही आपल्याला. काही घेणं देणं नसतं आपल्याशी. Germany आणि Switzerland आणि थोडं Italy (हा एक बावळट देश) सोडलं ना तर बिझिनेस साठी काही संबंध नाही आपला. (नाही म्हणायला UK आहे, पण लंडन मध्ये नाही ५ वर्षात अतिक्रमणावर कारवाई वैगेरे अशा बातम्या येतात कि नाही ते बघा एवढं आपल्या लोकांनी capture केलं आहे). France, Sweden (पुण्यातच ५/६ स्वीडिश कंपन्या, बाकी आनंद), Holland, Luxemburg, Norway, Finland, ऑस्ट्रिया  या अति प्रगत देशांचा आपल्याशी दूर दूर संबंध नाही हो.

टीचभर singapore आज जगातील सगळ्या जास्त per capita income असलेला देश आहे.

INR काही मोजके देश सोडले ना तर exchange मध्ये accept पण होत नाही हो.

माझ्या बिझिनेस च्या अनुषंगाने काही माहिती देतो:

- Westwind हि UK ची कंपनी महिन्याला २००० spindles बनवते. गेले कित्येक वर्षांपासून. अख्या भारतात westwind चे फक्त ४००० spindles आहेत. चायना मध्ये under one roof २००० पेक्षा spindles असणार्या २० कंपन्या आहेत.
- मशीन टूल च पूर्ण भारताचं production वर्षाला रु ५००० कोटी आहे (ओढून ताणून). जगात १५ कंपन्या आहेत जिचा प्रत्येकी turn over ५००० कोटी पेक्षा जास्त आहे.
- spindle ज्यात मी डील करतो आणि काही advance product develop करण्याचा काही वर्षांपासून प्रयत्न करतोय, ते बनवणारी भारतात एकही कंपनी नाही आहे. १५-२० लाख population असणार्या taichung मध्ये २० कंपन्या आहेत.
- भारतात PCB (printed circuit board) बनतात, पण हे बनवायला लागणारे raw material, process material आणि मशिन्स यापैकी एकही गोष्ट भारतात बनत नाही. सगळं बाहेरून आणायचं आणि मग काय value addition करणार.??

हि अमेरिका किंवा इतर प्रगत देश आहेत ना सगळं niche स्वत:कडे ठेवतात मग ते software असो, फार्मा असो, किंवा अजून काही असो research सगळं तिकडे. aviation industry किंवा aerospace industry झाली का develop आपल्याकडे. Boeing किंवा Airbus आहे का कुठे. आता कुठे हवा यायला लागली आहे त्यांची.

अशा भरपूर गोष्टी आहेत. बोर व्हाल. थोडक्यात माझं मत असं आहे कि पाश्चात्य देशाला आपल्या लोकसंख्येचं अजिबात कौतुक नाही. जे ते असेल तर आशिया तल्या देशांना असेल (चायना, तैवान, थायलंड वैगेरे, जपान पण टांगता आपल्याला). इथला बिझिनेस आहे म्हणून हे देश फार strategic decisions घेत आहेत वैगेरे आपले misconceptions आहेत.

तेव्हा काम करणे, आपली पत वाढवणे, Reliance सारख्या कंपन्या manufacturing सेक्टर मध्ये तयार करणे, value add करणारे products आणि प्रोसेस बनवणे आणि जगाला आपली जाणीव करून देणे हेच आपल्या हातात आहे.

Notes:
- defense हा एक grey area आहे ज्याच्यामुळे काही decisions होत असतील तर माहित नाही
- reference मागाल तर काहीच नाही. जे काही फिरलो, अनुभवलं त्यातून लिहिलं आहे. feelings आहेत, present करायचा पेपर नाही.
- चूक भूल देणे घेणे

वस्तुस्थिती

Thursday, 8 May 2014

कंजूष

डीएसके विश्व मधे एक डाॅ रीव्हस् नावाचे osteopathy ची प्रॅक्टीस करणारे डाॅक्टर राहतात. बायकोचा पाय दुखत होता म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो. मी जसा उभा राहतो हे पाहून त्यांनी मला दोन पायावर equal वजन ठेवून कसं उभं रहायला पाहिजे ते दाखवलं. मग माझं पाकीट खिशातुन काढायला सांगितलं. जाड पाकीट बघून म्हणाले "oh rich man" मला हसायला आलं. कधीही न वापरलेले credit cards, फुकटात मिळालेले वेगवेगळ्या malls चे कार्ड, दुनियादारीच्या चिठ्ठ्या चपाट्या, बिलं आणि यांच्या आत कुठेतरी लपलेले १५० रू यामुळे जाड झालेल्या पाकीटाला बघून तो जर मला rich man म्हणत असेल तर मी कशाला झाकलेली सव्वा लाखाची मूठ सोडू. असो. तर ते म्हणाले हे पाकीट घालून तु खुर्चीवर नको बसू. दोन्ही heap ची alignment चुकते आणि त्याचा effect पाठदुखीवर होतो. त्यामुळे ते पाकीट काढून मी आॅफीसमधे बसू लागलो.



 काल माझ्या मित्राच्या वडिलांचं निधन झालं. मी गेलो होतो अंत्यविधीला. तिथंच आला बायकोचा मित्र सुशील. अंत्यविधी पार पडला. सर्व मंडळी घरी निघाली. मी आणि सुशील थांबलो होतो काय मदत लागते का विचारायला. शेवटी मित्र पण निघाला. अशा वेळेस वातावरणात एक दु:खाची किनार असते. सर्व लोकं गेल्यावर सुशील मला म्हणाला "चल चहा पिऊ". मळभ साचलेल्या मनावर चहा एक ज़ालिम उपाय आहे. (खरं तर त्याचबरोबर एक सिगरेट. पण गेले काही वर्ष या स्वर्गीय आनंदाला सोडचिठ्ठी दिली आहे). मी पण लागलीच होकार दिला. नगर रोडच्या कैलाश मधून बाहेर आलो आणि लागलीच चहाची टपरी दिसली. गाड्या लावून तीन चहाची आॅर्डर दिली. (माझा सारथी पण बरोबर होता). एक एक सीप घेत चहा संपवला. (मी चहा पण सीप घेतंच संपवतो. दारूला सीप आणि चहासाठी घुटका हे मला मंज़ूर नाही). आणि मग सुशील ने त्याचं खरंखुरं जाडजूड पाकीट काढलं आणि त्यातुन सगळ्यात कमी denomination ची नोट बाहेर काढली जी अर्थात शंभरची होती. पिण्याचं पाणी आणि सुट्टे पैसे याचं नियोजन आपला देश ६६ वर्षापासून करू नाही शकला याचं नेहमीच आश्चर्य वाटतं. (वाईट दिवस संपणार आहेत आता) चहावाल्याकडे सुट्टे पैसे नव्हते याची कल्पना आल्या आल्या मी खिशात पाकीट काढण्यासाठी हात घातला (आधीच मला आवडत नाही हे काम) आणि डाॅ रीव्हस् च्या सल्ल्यानी काम दाखवलं. पाकीट मी आॅफीसमधे टेबलच्या वर ठेवून मी ऐटीत आलो होतो. सुशील ने साहजिकंच माझ्याकडे मदतीच्या आशेनं पाहिलं. मी आपल्या
ओशाळल्या चेहर्याने उभा राहिलो. तो असा विचित्र चेहरा बघून चहावाला त्याच्या व्यवसायबंधूकडे गेला आणि सुट्टे मागू
लागला. एव्हाना सुशीलच्या मनात आलं असावं "येडा आहे का हा, साला खिशातून २० रू काढत नाही आहे" नसलेली पण गेलेली इज़्ज़त वाचवावी म्हणून मी माझ्या चालकाला बोलावलं, पण तो पर्यंत चहावाल्याने उरलेले पैसे दिले आणि माझी हौदसे गयी हुई बुंदसे लानेकी कोशिश नाकाम गेली. सुशीलने मला बाय म्हंटलं (कोपर्यापासून नमस्कार केला असेल) आणि आम्ही मार्गस्थ झालो.

सुशील गाडी चालवत असताना असाच विचार करत असेल "वैभीचा नवरा फेसबुकवर चुरचुर लिहीतो पण actual मधे लैच चिंगूस आहे" आणि आता हे वाचल्यावर म्हणेल "तिथं सांगायचं ना हे, इथं फेसबुकवर टॅग करतोय. येडाच आहे" एकंदरीत गोळाबेरीज एकच. (वैभवीला काही मित्र मैत्रिणी वैभे/वैभी, तर काही वैभू म्हणतात आणि काही भूभू म्हणतात. मला हे शेवटचं नाव फारंच आवडतं)

काही काही दु:खद प्रसंगावेळी असं काही वेगळंच घडतं की त्याने थोडंसं हलकं व्हायला मदत होते. 

Tuesday, 6 May 2014

Sensitive

हो बरेच लोक मला म्हणतात मी संवेदनशील (sensitive) माणूस आहे.

- नितीन आगे बद्दल वाचतो मी, दाभोळकर आणि निर्भया ही ओरखडे ओढून जातात, २६/११ ला भयचकित होतो, मन विदीर्ण होतं, मुठी पण आवळल्या जातात कधी कधी. मग मला sense होतं कि माझी भावना हि केविलवाणी आहे. मी गपगुमान विसरतो आणि कामाला लागतो, पुढच्या खुनाची बातमी वाचेपर्यंत. हो मग, मी sensitive माणूस आहे.

- रस्त्यावर पडलेला माणूस पाहतो. रक्ताचा ओघळ दिसतोही. मनात खूप कालवाकालव होते. पण मग sense होतं कि चाळीस लाखाची order फायनल करायची आहे. साडेदहाची वेळ दिली आहे. वाईट वाटत वाटत मी हलकेच accelerator वर पाय दाबतो. त्याचं काय आहे, मी जरा sensitive आहे हो.

- सिग्नल ला गाडी उभी राहिली कि येतात २-४ चिल्लीपिल्ली काहीतरी मागण्यासाठी. जातोही हात खिशात २ रुपये फेकण्यासाठी देणगीच्या अविर्भावात. आणि मग sense होतं गाडीतला laptop चोरणार तर नाहीत ती. मी हळूच सेन्ट्रल lock चा खटका दाबतो. खरंच हो, मी फार sensitive माणूस आहे.

- कधी दिसतं डोळ्यांना कुठल्या तरी माय भगिनीची छेड काढतंय कुणीतरी, वडिलांच्या वयाच्या माणसाला त्याची चुकी असताना उद्दाम बोलताना. मग sense होतं कि ते "मेरे अपने" थोडीच आहेत. भोकर्या डोळ्यांनी बघत मी रस्ता काटून पुढे जातो. अहो विसरलात का, मी sensitive माणूस आहे म्हणून.

- आणि जातीय दंगलीच्या बातम्या, ओहो, इथे तर माझ्या संवेदनशीलतेचा कस लागतो. कधी झाड उन्मळून पडतं, तर कधी उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते म्हणे. असो बापडी. मला लागलीच sense होतं की दंगल माझ्या दाराशी थोडीच आहे. मी पण मग चार भिंतीआड बसून बियरचे घुटके घेत tv च्या बातम्या ऐकत बसतो. आता कितीदा सांगू राव की मी sensitive आहे.

अजूनही कळलं नाही म्हणता, ठीक आहे, मग ओरडूनच सांगतो "हो हो मी sensitive माणूस आहे"

Focussed

काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे १९९२ मधे धंदा करण्याची ठिणगी पडली मनात, आणि त्यामुळे ज्योत पेटलीही. पण ती ज्योत झाली मेणबत्तीची किंवा फारफारतर पणतीची. म्हणजे त्या ज्योतीने कधी आयुष्यात अंगार फुलवला नाही किंवा ती ज्योत दुसर्यांना प्रकाश देणारी मशाल नाही झाली. पण मिणमिणत्या प्रकाशात स्वत:ला मार्ग दाखवत गेली. आणि मग काही विशिष्ट लोकांना भेटलं की मग आपलं खुजेपण लक्षात येतं. कळतं की focused माणसं़ काय कमाल करतात ते.

म्हणजे कसं ते सांगतो तुम्हाला. अथांग अशा समुद्रात कधी पोहलोच नाही हो. त्या भिरकावून देणार्या लाटा, तोंडात जाणारं खारं पाणी आणि मग अचानक पाण्यानें ओढून नेल्यावर लक्षात येतं की जमीनंच नाही खाली. फाटते हो. मग कसं आपला स्विमींग पूलच बरा. पाणी पण गोड. बुडायला लागलो की तळ असतोच. थोडा धक्का मारला की येतो पाण्यावर. फार प्राॅब्लेम झाला तर लाईफ गार्ड असतोच.

हिमालय कधी खुणावत नाही मला. कुणी सांगितलं त्या जीवघेण्या थंडीत जायला. श्वास पण धड घेता येत नाही. आपली मजल सिंहगडापर्यंत. सगळं कसं तब्येतीला सांभाळून.

कातडी वाचवायची, पोटात जास्त खड्डा नाही पडू द्यायचा, मेंदू वापरायचा पण डोकं दुखु लागलं की बास!

लोकं भेटतात हो, सागराला कवेत घेणारी, एव्हरेस्टला साद घालणारी, ध्यास ठेवणारी आणि मग नतमस्तक होतो. आणि गर्दभावलोकन करायला मी मोकळा होतो. हात पाय कुठे झाडायचं ते कळतं तरी.

डबक्याला जलाशय आणि टेकडीला गड मानला नाही हेच नशीब.

अर्ध हळकुंड मिळालं आहे, पण पिवळा झालो नाही हीच काय ती जमेची बाजू.

समुद्र किनार्यावर सकाळी चालत असताना लाटा आदळल्या पण त्या अशा. 

अट्टल

आज सकाळीच बीचवर चालायला गेलो. हो, इकडे सगळी नाटकं करतो बरं का, सकाळी बीचवर चालणं, मग परत आलो की स्वीमिंग पूल मधे डुबकी. बरेच फायदे असतात़, एकतर conference ला आलेले फारंच कौतुकाने बघतात आणि विचारतात "morning walk।" "नाही, भेळपुरी खायला गेलो होतो" असं उत्तर द्यायची फार इच्छा होते. पण आवरतो. परत सकाळी विदेशी बा......जाउ द्या भौ, आपली भारी प्रतिमा आहे फेसबुकवर, कशाला डागाळा. असो तर कौतुकाने बघितलं की जे काही मिलीग्राम वजन कमी झालं असतं ते डबल वाढतं.

तर सांगत होतो की बीचवर माणूस इकडेतिकडे बघत एकटाच उभा होता. मला बघितल्यावर माझ्याजवळ आला. बघतो तर काय SKF चा, माझी पहिली कंपनी. CDO/MERI हायस्कूल नासिक, Govt Polytechnic Aurangabad, आणि SKF चे मित्र मैत्रिणी भेटले की मला विशेष ममत्व वाटतं. (मैत्रिणी फक्त नासिकच्या आहेत, त्या आहेत Whatsapp वर बाकी GPA आणि SKF मधे दुष्काळ. पण असं लिहीलं की वजन येतं वाक्याला) तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला "I will start running from that point for 50 mtrs in sea water. You need to shoot me" i phone होता. नाही म्हणायला काही कारणंच नव्हते. तो पळाला आणि मी इमानऐतबारे त्यांचं shooting केलं. त्यानं बघितलं आणि म्हणाला "thanks" मी म्हणालो "you are welcome. Let us get connected on Facebook. I will send you friend request as soon as I am back in room" तो चपापला. आणि फोनकडे बघत म्हणाला "oh no, this is not for Facebook, but to show to my daughter" मी म्हंटलं "भावड्या, तु ज्या मंदिराची घंटा वाजवतोस ना, त्या देवळाचा मी पुजारी आहे. तु काय मला सांगतोस" तर लाजलाच म्हणाला "I appreciate your guess which is right"

मग बाकी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि तो खुश होत विडीओ बघत हाॅटेल कडे परत निघाला.

मनात आलं "चला आजच्या रात्रीची पोस्टची सोय झाली" खुपंच खुश झालो.

एखादा बेवडा संध्याकाळच्या क्वार्टर ची सोय झाल्यावर खुश कसा होतो तसंच जणू.

अट्टल