तुमच्या आयुष्यातून विखारी विचारांच्या लोकांना हद्दपार करून देण्याचा अजिबात पश्चाताप होऊ देऊ नका. मग ते कुणीही असो, तुमचा नातेवाईक, तुमच्या कंपनीतील साहेब किंवा अगदी कंपनीचा मालक, ज्याच्याबरोबरच्या रम्य आठवणी असतात तो बालपणीचा मित्र, इतके दिवस आगंतुक असलेला पण नुकतीच ओळख झालेला किंवा जिच्याबद्दल प्रेमाकर्षण वाटते अशी व्यक्ती. तुम्हाला सतत व्यथित करणाऱ्या, दु:खी करणाऱ्या किंवा हीन लेखणार्या लोकांची, तुमच्या मनाच्या कोपर्यात सुई इतकी पण जागा व्यापण्याची लायकी नाही आहे. परिस्थितीला समजून उमजून एखादी व्यक्ती तिच्या वागण्याचं स्वामित्व घेत वेळप्रसंगी त्यात बदल करण्याची तयारी दाखवत असेल तर ठीक, पण जर ती व्यक्ती तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहत, तुमच्या भावनांचा अनादर करत, तुमच्या मनाला ठेच पोहोचेल असंच चालचलन ठेवत असेल तर अशांना तुमच्या आयुष्यातून बेलाशक हाकलून देण्यात हयगय करू नका
WhtasApp वरील इंग्रजी मेसेज चा स्वैर मराठी अनुवाद
सुविचार
WhtasApp वरील इंग्रजी मेसेज चा स्वैर मराठी अनुवाद
सुविचार
No comments:
Post a Comment