Saturday 24 May 2014

विकसित भारत

- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा इथले श्रीमंत लोक MRT/Public Transport वापरण्यात भूषण समजतील, ना कि गरीब लोकं कार घरात असण्याचं स्वप्न पाहतील.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा युरोप मध्ये आपला रुपया exchange मध्ये युरो/किंवा डॉलर मध्ये परावर्तित करता येईल.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा अजून एखादा राजेश परभणी जवळ स्वत:ची कंपनी उघडेल आणि तेव्हा त्याला digital divide, दळणवळण, skilled manpower उपलब्धता हे प्रश्न राहणार नाहीत.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा appropriately loaded trucks ७० च्या स्पीड ने अपघात न करता पुण्याहून बंगलोर ला १२ तासात पोहोचतील.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा पाण्याची बाटली हि फक्त पाणी carry करण्यास सोयीस्कर म्हणून विकत घेतली जाईल ना कि सार्वजनिक नळावर ते अस्वच्छ असतं म्हणून.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा आजोबा आजींना रेल्वे प्रवास करताना platform वरचा दादरा कसा चढायचा याची चिंता राहणार नाही.
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा एक माणूस दुसर्या माणसाला सायकल रिक्षा वर वाहवेल ते एक joy ride म्हणून, ना कि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटवण्यासाठी.

आणि
- विकसित भारत तेव्हा होईल जेव्हा प्रसूतीपूर्व लिंग निदान केंद्रे पुन्हा चालू होतील, आणि घरात लक्ष्मी किंवा सरस्वती येणार म्हणून जल्लोष केला जाईल, पेढे वाटले जातील.

(सांगायला थोडं कसं तरीच होतं पण "भारत हा कृषिप्रधान देश आहे" या पलीकडे मला शेतीबद्दल काहीच माहित नाही. शेती संदर्भात एक वाक्य हवं होतं)

मित्रानो,  मला असं वाटतं विकसित देश असा असावा. किती मेसेजेस फिरले होते पेट्रोल, डीझेल चे भाव जगभर कमी आहेत फक्त भारतात जास्त आहेत. आपण पण केलेच ना कौतुकाने फोरवर्ड. अहो मिडल इस्ट सोडलं ना, थोड्याफार फरकाने सगळीकडे सारखेच भाव आहेत. किंवा अगदी साधं सांगतो, जिथे क्रूड ओईल मिळतं तिथं स्वस्त. आपण processor. आपल्याकडे महागच. ते जर कमी होतील याच्या भरवशावर असाल तर विसरा. लिटर मागे ५ रु कमी होऊन जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही श्रीमंत होणार, तेव्हा देश गरिबीकडे चालला आहे असं खुशाल समजा.

आणि हो, हे काही सहा महिन्यात किंवा एका वर्षात होईल असं मी अजिबात म्हणत नाही आहे. मी तर म्हणतो या आयुष्यात हे दिसलं नाही तरी चालेल, पण आज दहा वर्षाचा असलेला पोरगा मोठा झाल्यावर म्हणाला कि माझ्या बापानं हे लिहून ठेवलंय तरी बाजी मारली असं होईल.

तेव्हा हे सुस्तावलेलं giant wheel आहे, त्याला गती देण्यासाठी प्रचंड शक्ती आणि तेव्हढाच वेळ हि लागणार आहे. समर्थकानो आणि विरोधकानो, सतर्क राहावं लागणार आहे. आता भरकटून चालणार नाही.

No comments:

Post a Comment