Friday, 23 May 2014

माझी पण चिठ्ठी

चेतन शर्मा च्या शेवटच्या ball वर boundary line वर जर catch पकडला असता तर त्याला हिरो बनवला असता आपण. "काय हुशार (मुत्सद्दी) गोलंदाज आहे. शेवटचा ball आणि फुल toss, मानलं बुवा.  याला म्हणतात थिंकिंग. crisis च्या वेळेस……" वैगेरे वैगेरे.

शेवटची ओवर सचिनला दिली धोनीने. बुकलला असता तर धोनीच्या अकलेचे वाभाडे ;काढले असते. "अक्कल कुठे शेण खायला जाते का. शेवटची ओवर आणि सचिनला, च्यायला नेहरा परवडला………. " सचिनचा पफलू फिट बसला आणि धोनी हिरो झाला.

मुत्सद्दी असणे आणि नसणे हे व्यक्तीसापेक्ष, स्थलसापेक्ष आणि परिस्थितीसापेक्ष बदलत असते. उगवत्या सूर्याला नमस्कार हा जगाचा नियम आहे तर आपण कसे अपवाद राहणार. असो
 
महत्वाचं ते नाही आहे. थोडा वेळ दया हो. अजून शपथविधी ही झाला नाही तर पब्लिक च्या याद्या तयार आहेत. किराणा माल वाल्याला देण्यासाठी कशा तयार करतो अगदी तशाच. (यात विरोधक हि आले आणि  समर्थकांच्या जरा जास्तंच लांब दिसताहेत). जादुगार थोडी आहेत ते कि छु मंतर केलं कि सगळं रामराज्य आलं सगळीकडे.

आणि त्यांच्यावरचे परवाचे विनोद पण अगदीच पांचट बरं का! साधं घर घेतलं किंवा वर्षापूर्वी भाड्याच्याच पण नवीन कंपनीच्या जागेत गेलो तर लोकांच्या समोर बोलताना माझा गळा भरून आला होता. इथे तर च्यायला एकहाती देश ढवळून विजयश्री खेचून आणली त्यांनी. मला तर अगदी नैसर्गिक वाटलं ते. आणि नमस्कार केला तर काय चुकलं हो. म्हणजे ठीक आहे विचार सरणीला विरोध करावाही पण नुसतं आपलं जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी नुसताच विरोध किंवा नुसतं कौतुक, फारच बोर होतं राव.

आता दिली आहे ना सत्ता. आणि लोकशाहीत काही म्हणू नाही शकत मी नाही मत दिलं त्यांना. majority carries the law. तेव्हा आता थांबा आणि १८० दिवस वैगेरे नाही चांगले २ वर्ष थांबा. मग बांधा कि निष्कर्ष. (आमची पार्टी बघा, ९ महिन्यात निवडणूक, लागलीच सत्ता, फडफड निर्णय, लागलीच राजीनामा, लोकसभेची निवडणूक, बेफाम हार आणि आता जेल. तरी  आम्ही अजून चिकटून आहोत). आणि तसंही इतक्या बहुमताने आलेत कि एखाद दुसरा निर्णय चुकलाच तर काही वाकडं करू शकत नाही.

सगळं मित्रमंडळ हुशार आहेच तेव्हा जास्त काय सांगणार. विरोधकांनी आणि समर्थकांनी सतर्क राहावं.

आता एवढं लिहिलंच आहे तर छोटा industrialist म्हणून आपली पण चिट्ठी लिहूनच टाकतो. UPA सरकारनी अडकवलेली GST tax ची कल्पना मूर्त व्हावी. वेगवेगळ्या tax चे return file करताना थकतो हो आम्ही. एकच tax करा १५,१६, अगदी १७% टक्क्यापर्यंत करा आणि गोळा करून लोकल body आणि स्टेट ला द्या.

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.

- रामं (टोपण नाव लावलंय, नवीन सरकार आल्यापासून)
माझी पण चिठ्ठी

No comments:

Post a Comment