माझी कंपनी अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल्स, पुण्यात अन या लेखातील दुसरं पात्र आहे वेस्टविंड एयर बेअरिंग हि आपल्या साहेबाच्या देशातील म्हणजे इंग्लंड मधील. पी सी बी च्या ड्रिलिंग स्पिंडल मधील दादा नाव. जगात ७०% मार्केट शेयर.
दीड वर्षं झालं मी वेस्टविंड नावाचा मासा गळाला लागेल असा प्रयत्न करत होतो. म्हणजे त्यांचे स्पिंडल्स भारतात रिपेयर करण्यासाठी आम्हाला अधिकृत करावं यासाठी मी झटत होतो पण आमच्याबरोबर दिल्ली ची एक कंपनी हि त्याच्या ऑथोरायझेशन साठी झगडत होती.शेवटी एक दिवस वेस्ट विंड च्या मार्क चा मेल आला "आमचे दोन्ही डायरेक्टर चीन मध्ये एक्झिबीशनला येणार आहेत. तू तिथं जाऊन दोघांना पटव." पटवण्याच्या कलेपासून मी वयाच्या २१ व्या वर्षी फारकत घेतली होती. पण फरक होता, इथं एका माणसालाच पटवायचं होतं. मी ठरवलं चीन ला जायचं. IPCA चं २७ जणांचं डेलिगेशन तयार झालं. बाकी सर्व PCB manufacturer होते. मी एकटाच सर्विस देणारा.
मार्च २००५ ला निघालो. शांघाय मध्ये एक्झिबिशन होतं. डेलिगेशन च्या हेड ने तिथं असं हॉटेल शोधलं कि ज्याचं restaurant भारतीय होतं. पतियाला पर्ल त्याचं नाव. आता चीन मध्ये भारतीय खाद्य पदार्थ दिसणे म्हणजे राज्यसभेत रेखा दिसण्या इतकं दुर्मिळ होतं. (सचिन आपला आवडता त्यामुळे त्याला माफ). सकाळी नाश्ता आम्ही रामटवून करायचो. मग दिवसभर काही मिळालं नाही तरी हरकत नव्हती. खरं तर इतकी पण वाईट परिस्थिती नाही आहे, पण भरपेट नाश्ता करण्यासाठी हे एक कारण.
एव्हाना डेलिगेशन मधील लोक माझे मित्र झाले होते. सगळ्यांना माझं येण्यामागचं कारण कळलं होतं. त्यांनी शक्कल लढवली. हि सगळी मंडळी वेस्टविंड च्या प्रोडक्ट चे एंड युजर. त्यामुळे त्यांना हे प्रोडक्ट रिपेयर करण्यासाठी कंपनी भारतात असणं गरजेचं होतं. एक एक करून वेस्टविंड च्या बूथ वर जायचे. तिथे स्टीव्ह वेब म्हणून वेस्टविंड चा एम डी उभा असायचा. मित्र जायचा (जो PCB manufacturer असायचा), गप्पा मारायचा आणि हळूच स्पिंडल रिपेयर करण्याबद्दल बोलायचा. हळू हळू डिस्कशन ची गाडी माझ्यापर्यंत येउन पोहोचायची अन मित्र बूथ मधून निघेपर्यंत वेस्टविंड चे स्पिंडल भारतात रिपेयर करण्यासाठी अल्ट्रा प्रिसिजन हि कशी योग्य कंपनी आहे यावर शिक्कामोर्तब झालेलं असायचं. असे जवळपास २० मित्र माझं प्रेझेन्टेशन व्हायच्या आधी स्टीव्ह ला टेकून आले होते.
झालं. शांघाय मधील एका अलिशान हॉटेल मध्ये त्या दोन डायरेक्टर समोर मी बडबडलो, पण एव्हाना माझ्या मित्रांनी माझं काम फत्ते केलं होतं. मी परत पतियाला पर्ल मध्ये आलो अन पोहोचेपर्यंत माझ्या मोबाईल मध्ये मेसेज झळकू लागला "वेलकम टू वेस्टविंड फ्यामिली"
अशा पद्धतीने २००५ साली इंग्लंड च्या कंपनीने भारतातल्या कंपनीला चीनच्या भूमीवर त्यांच्या प्रोडक्ट ला रिपेयर करण्यासाठी अधिकृत मान्यता दिली.
जाता जाता एकंच सांगतो, शांघाय, चीन भारी वैगेरे असेल हि, पण मला तिथली लोकं एकदम चालू, अढ्याताखोर वाटली. अर्थात चीमूटभर लोकांना भेटून पूर्ण देशाबद्दल असं लिहिणं बावळट पणाचं लक्षण पण जवळपास २५ कंपनी च्या मालकांना भेटलो, त्यात एकही धड माणूस भेटू नये हे नवलच नव्हे काय?
लय भारी

No comments:
Post a Comment