समीरने आमच्या कंपनीत राजीनामा दिला. एक्झिट इंटरव्ह्यू च्या वेळेस तो माझ्यासमोर बसला. आणि पार डोळ्यात पाणी वगैरे आणून आमच्या कंपनीतले प्रॉब्लेम सांगू लागला. मी त्याला थांबवलं आणि म्हणालो "पहिले ते डोळ्यातून पाणी येणं थांबव. तू चालला आहेस, तर आणि काही प्रॉब्लेम असेल तर राग येऊन सांग. पण कुठल्याही प्रकारचं गिल्ट फिलिंग मला येईल असं बोलू नको. कारण तुझे ग्रीव्हन्सेस असतील किंवा डिसऍग्रिमेंट पण असतील. आमचीही काही चूक झाली असेल ते मान्य आहे. पण तुझ्या डोळ्यातून पाणी यावं इतका काही मी वाईट वागत नाही."
असं बऱ्याचदा होतं, नाही? एखादा/दी, आपणावर विनाकारण इमोशनल अत्याचार करत अशी काही स्टोरी बनवतं की आपण काही फार मोठा गुन्हा केला आहे. आपल्याला काही कारण नसताना दोषी ठरवून पाश्चातापाच्या कटघर्यात उभं राहायला भाग पडतात आणि अत्यंत काहीतरी पुचाट कैफियत हिरीरीने मांडत असतात.
झालं आहे असं की स्वतःवर काम करता करता स्वतःच्या वागण्याबद्दलची थॉट प्रोसेस इतकी क्लिअर झाली आहे की कुठल्याही संबंधाला, मग ते एम्प्लॉयर-एम्प्लॉयी असो, की कस्टमर-सप्लायर हे प्रोफेशनल रिलेशन्स अथवा मैत्रीचं, नात्यातील (अगदी आई मुलाचं) हे पर्सनल रिलेशन्स , सांभाळताना माझ्याकडून पूर्ण न्याय माझ्या बाजूने दिला जाईल अशी जीवनप्रणाली बनली आहे.
थोडक्यात सांगायचं आहे की आता पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन्स मेंटेन करत मी सुद्धा ३०/३२ वर्षे व्यतीत केली आहेत. कळत्या वयापासून हटवादीपणा, मानापमान, तिरस्कार, स्वार्थ या सगळ्यांपासून दूर राहायचा प्रयत्न केला आहे. या तीन दशकात कुणाला पैशाला फसवलं नाही, जाणून बुजून कुणाला थर्ड लावला नाही, एखादं काम अंगावर घेतलं तर त्याच्या रिटर्न्स ची फारशी अपेक्षा न ठेवता ते पूर्ण करायचा मनापासून प्रयत्न केला आहे, कुणाचा ठरवून अपमान केला नाही, स्वतःचा फायदा व्हावा म्हणून फारसं कधी खोटं बोललो नाही. असं असताना काही वर्षांपूर्वी पर्यंत लोकांच्या कैफयतीना मी सिरियसली घ्यायचो आणि बिनकामाच्या गिल्टपायी विनाकारण तळमळत बसायचो.
आता मात्र गेल्या पाच वर्षात बराच बदललो आहे. फॉर गुड. एव्हाना खात्री आहे की आपली बाजू खणखणीत आहे. हे मानण्यात माज नव्हे तर स्वतःवरचा विश्वास आहे. आतापर्यंत जो जगण्याचा मार्ग निवडला आहे त्याचं ते फलित आहे. या सगळ्यांचा, गर्व नव्हे, पण अभिमान नक्की आहे.
a1
No comments:
Post a Comment