सगळे असंच करतात, म्हणून आपण पण असंच वागायचं या नियमाखाली आयुष्यात बर्याच गोष्टी घडतात. स्वत:चं घर असायला हवं ही अशीच एक गोष्ट. भारतासारख्या देशात घराचं value proposition काय हा नेहमीच डोक्यात वळवळणारा प्रश्न. घर घेतलं, म्हणजे asset झाली या वाक्याची सत्यासत्यता काय? आणि मग सुरू होतात नोशनल असणार्या पण कागदोपत्री वाढणार्या किंमतीची गणितं.
पुण्यासारख्या शहरात २ बीएचके घरासाठी शहराच्या बाहेर ही ५० ते ६० लाख मोजावे लागतात. ८% रेट ऑफ़ इंटरेस्ट रू ४ लाख जमा होतील. म्हणजे महिन्याला ₹ ३५००० खर्च करण्याची ताकद तुमच्यात येते. दोन वर्षापूर्वी कॉलनी नर्सिंग होम शेजारी ३ बीएचके, फर्निश्ड फ्लँट ₹ २२००० ला मी स्वत: भाड्याने पाहिला होता. आणि परत तो सुपर बिल्ट अप प्रकार. पांढरा हत्ती असलेला स्वीमिंग पूल, दोन तीन वर्षात इक्विपमेंट कंडम होणारी जिम, काहीही कामाची नसलेली लँडस्केपिंग असल्या भंगार गोष्टीचे पैसे आपण बिल्डरच्या घशात टाकत असतो. जसे दिवस चाललेत तसे आतले धोकादायक रस्ते, बंडल क्वालिटीच्या आणि छोट्या लिफ्ट, कारच्या किंमतीएवढी पार्किंगची किंमत असा काहीही मनमानी प्रकार चालू आहे. परत कार्पोरेशन टँक्स आणि सोसायटी मेंटेनन्स वेगळा भरावाच लागतो.
घरात जितके पैसे महिन्याला येतात त्याच्या २०-२५% EMI येत असेल तर घर विकत घेण्यात अर्थ आहे. नाहीतर इतर महत्वाच्या खर्चाला कात्री लावावी लागते.
या पार्श्वभूमीवर भाडे देऊन का राहू नये असा मनात विचार डोकावत राहतो.
बाकी त्याचे फायदे बघा
- कॉऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या विनोदी प्रकारापासून सुटका.
- घर बदलण्याची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे घरातलं सामान वजनाला हलकं (पर्यायाने किमतीला), जेवढं पाहिजे तितकंच (पोटमाळे आहेत, म्हणून भरा सामान असं राहणार नाही)
- ज्या भागात नोकरी, शाळा त्यानुसार घर शोधण्याचं स्वातंत्र्य
- म्हातारपणी वृद्धाश्रमात जाताना घराची attachment नाही.
- घर नावाच्या मालमत्तेवरून वारसांची भांडणं नाही.
- दुसरं काही, परदेशदौरा वैगेरे, करण्यासाठी पैसे राहतात.
- परत ज्या बदलता येतील त्या गोष्टी आयुष्यात बदलाव्या. घर बदलण्यात आनंद मानावा.
पहिल्या वाक्यात लिहीलेलं value proposition चं गणित पाश्चिमात्य देशात राहणारे लोकं जास्त योग्य पद्धतीने सांगू शकतील. एकच उदाहरण देतो. अमेरिकेन मित्राने दीड वर्षापूर्वी शिकागो मध्ये (म्हणजे २० किमी दूर, पुण्यापासून वाघोली वैगेरे अंतर) २ एकराच्या प्लॉट वर ४००० sqft चं घर ४७०००० डॉलर्स ला विकलं. म्हणजे जवळपास ३ कोटी रुपयाला. आता विचार करा, एक तर पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरात ३ कोटी रुपयात २ एकराचा प्लॉट अन ४००० sqft घर मिळेल का? शिकागो मध्ये घराशिवाय मिळणाऱ्या गोष्टी आणि त्या या शहरात मिळू शकतील का?
कंपनी साठी आम्ही जागा विकत घेतली. अमेरिकन लोकांनी विरोध केला. जमिनीत पैसे invest करण्यापेक्षा equipment मध्ये पैसे गुंतवा, कंपनीची पत वाढेल. आम्ही काही बाही स्टोर्या सांगून पटवलं. अन जमीन विकत घेतली. आता बोंबलायला ती न NA होत आहे न पुढे काही काम करता येत आहे.
हि थियरी मी स्वत:च्या पोरांना तरी पटवू शकेल का?…………. कदाचित "हो".

No comments:
Post a Comment