लैच जळायचो मी, इनबॉक्सातल्या चॅटिंगच्या पोस्टीवर. नाही म्हणजे मी एकदम गोरा गोमटा नाही, पण एकदम टाकाऊ पण नाही हो. सहा आठ महिन्यापासून स्मितहास्य असलेलं प्रोपिक लावून ठेवलेलं. पण नाही, कुणी म्हणजे कुणीच मेसेज पाठवायचं नाही. आतुरतेने वाट पहायचो, कुणी मेहेरबान होतंय का ते. पण हाय रे दुर्दैव. गेले दोन वर्ष इमानऐतबारे पोस्टचा रतीब टाकूनही कुणीपण माझ्या इनबॉक्सकडे ढूंकूनही बघीतलं नाही. इथे कुणी धमक्या देतंय, कुणी स्क्रीन शॉटस लावताहेत, पुरूष म्हणताहेत मी पंचेचाळिसचा, पण चॅटिंग करू नका, कुणी आदरणीय नववृद्धाने पोस्ट टाकली की इनबॉक्सात छळू नका. मी असल्या पोस्टी वाचून पार अगदी निराशेच्या गर्तेत लोटला जायचो. आयला, असं काय सोवळेपण चेहर्यावर चिपकवलं की आपली नोंदही घेऊ नये.
त्यातूनही स्त्री वर्गातल्या कुणी मेसेज पाठवला तर सुरूवातच "राजेशदा" आणि कुणा पुरूषाने मेसेज केलाच तर "सर सीव्ही पाठवू का" असे अगदी शुष्क अन अरसिकतेने नटलेले मेसेजेस. हात शिवशिवायचे, आपण ही "तसल्या" संभाषणाची पोस्ट टाकावी, झालंच तर त्याचा उद्धार करावा पण दैव कायम रूसलेलंच.
शेवटी काल तो सोनियाचा दिनू उगवला. तर ती व्यक्ति सोनिया नावाची मुलगी होती की दिनू होता हे गुलदस्त्यात राहू देऊ. तर त्या व्यक्तिचा आधी दोन तीनदा ही मेसेज आला होता, पण म्या पामरानेच तिकडे दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य गुन्हा केला होता. काल मी दिल्लीत होतो, एकटाच. म्हणजे "हम भी अकेले, तुम भी अकेले और मौसम जवाँ" अशा मोहक अवस्थेत एकटाच पहुडलो होतो. आणि परत मेसेज आला "हाय" सुरूवातीला मी आपला सभ्य माणसासारखा उत्तरं देत राहिलो. पण हळूहळू ती व्यक्ती रंग दाखवू लागली. (साल्या, रंग च दाखवत होती ना, मग अंग दाखवत असल्यासारखं चेकाळतोस कशाला) मधलं संभाषण जाऊ द्या. मुद्द्याचं असं बोलणं झालं की मी व्यक्तिला म्हणालो "हॉटेलच्या रूमवर येण्याआधी मला तुझा फोटो पाहिजे" तर ती व्यक्ती म्हणाली "फोटो नको, तुम्ही त्याचा दुरूपयोग कराल" मी म्हणालो "या संभाषणाचा दुरूपयोग करून मी पोस्ट बनवेल याची भिती वाटत नाही का?" तर व्यक्ति सॉरी म्हणून गायब. साला, खेळ बनता बनता बिघडला.
चांगला २८५० मित्रांचा अन पन्नास एक म्युच्युअल फ्रेंडस असलेलं पण पोपटाचं प्रोपिक असलेलं प्रोफाईल. फुर्रकन उडून गेलं. अनफ्रेंडचे सोपस्कार करू नाही दिले त्या व्यक्तिने. पंधरा वीस दिवसांनी मिठू मिठू करेलही परत, पण लक्ष तर मलाच ठेवावं लागेल. कुणास ठाव आता ही पोस्ट वाचत ही असेल दुसर्या एखाद्या अकाउंट वरून.
दीड एक महिन्यापूर्वी नांदेड सिटीत मॉर्निंग वॉक घेताना एक अनोळखी मुलगा आला. म्हणाला "तुम्ही मंडलिक सर ना. मी तुमच्या सगळ्या पोस्ट वाचतो. खुप पॉझिटिव्ह फिलिंग येतं" हे ऐकल्यावर जितका आनंद झाला त्याच्या कैक पटीने काल मेसेजामेसेजी पाहिल्यावर आनंद झाला. अगदी बुडालेली नौका वर आल्यावर नवर्याला पाहून कलावतीला जितका झाला तितकाच.
आता पुढचा एखादा आठवडा तरी मी आनंदलहरीवर तरंगत असेल हे नि:संशय.
(व्यक्ति हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे लेखात योजला आहे हे चाणाक्ष मित्र मैत्रिणिंच्यी लक्षात आलंच असेल. ती व्यक्ति जरी पुरूष आहे तरीही ते मूळ स्त्रीचं प्रोफाईल असून फेक अकाऊंट पुरूषाचं असण्याची शक्यता गृहीत धरली आहे. आनंदलहरीवर झुलण्यासाठी अशा शक्यता गृहीत धरणं नितांत गरजेचं आहे. फेसबुक्याटिक लिबर्टी म्हणा हवं तर

No comments:
Post a Comment