आदर्शवत जगात घरी राहणं किंवा बाहेर जाऊन रोजीरोटी कमावणे यातला पाहिजे तो चॉईस करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला हवं.
सध्या हा चॉईस फक्त राजकारण्यांना आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बिनधास्त बाहेर जातात. नुसते बाहेर जात नाहीत तर लाखो जनतेला रॅलीज आणि सभांच्या नावाखाली एकत्र पण आणतात. सत्तेची नशा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
वर्षभर अभ्यास करणाऱ्या पोरांच्या परीक्षा हे लोक रद्द करू शकतात पण एकाही राजकारण्याने एखादी निवडणूक रद्द करा किंवा पुढं ढकला अशी मागणी केल्याचं ऐकवात नाही. म्हणजे अगदी २८८ विधानसभेच्या जागा असलेल्या राज्यातील एक पोटनिवडणूक देखील नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की तिथले दिवंगत आमदार हे पोस्ट कोविड आजारामुळे निधन पावले.
आणि हो, सर्व धार्मिक मेळे हा राजकारणाचा भाग आहे. इथं कुणीही अपवाद नाही. तो सगळाच प्रकार इतका थर्ड रेट आहे की त्यावर काही लिहावंसं पण वाटत नाही. निरिच्छ भावना आहे त्याबद्दल. हे सगळं घडवून आणणाऱ्या राजकारणी लोकांच्या पोलादी पंजात आपल्या सारख्या सामान्य जनतेचा जीव अडकला आहे, ऑक्सिजन आणि रेमेडिसीविर पेक्षा पण ही पकड दुर्दैवी आहे. मला आता राजकारणी लोकांचा राग येत नाही, तर त्यांना बाहेर जाऊन जो काही उच्छाद मांडायचा आहे त्याबद्दल त्यांचा मत्सर वाटतोय.
डॉ भूषण शुक्ला यांच्या पोस्टचा स्वैरानुवाद
No comments:
Post a Comment