चेन्नई हून चार मुलं आली होती ट्रेनिंग साठी, तीन महिन्यासाठी. काल त्यांच्या साठी रात्री पार्टी होती. कंपनीत च रात्री बिर्याणी मागवली होती. जेवण झाल्यावर कुणीतरी गाणी लावली. पोरांचे लागलीच पाय थिरकायला लागले. मी पण दोन वेळा पाय पुढे अन चार वेळा मागे करून हलवले. मला कॉलेज चे दिवस आठवले. स्वत:बद्दल त्यावेळेस बरेच गैरसमज होते. अजूनही आहेत, गैरसमजाचे मुद्दे बदलले आहेत. तर गैरसमज असा होता की, मी खूप चांगला नाचतो. तो समज पुढे एरोबिक्स मध्ये शिस्तशीर नाचताना फोल ठरला. पण गद्धे विशी ती, कोण सांगणार.
ह्या गैरसमजापायी कोणत्याही गणपतीच्या मिरवणुकीत किंवा अजून कुठल्याही नाचणार्यांच्या घोळक्यात मी जरा हटके नाचायचो. म्हणजे लोकांच्या लक्षात यावं म्हणून. त्यावेळेही, लोकं बघून न बघितल्या सारखे करायची, कुणी गालातल्या गालात हसायची. छद्मश्री. हे नवीन नाव कळलं, छद्मी हसणाऱ्यासाठी, मोहन सरांकडून. कुणी दुसर्याच्या कानात काही तरी सांगायचं. त्यातल्या त्यात हे कुणी "सांगणारी किंवा बोलणारी" असेल तर मी अजून चेकाळायचो. साधारणपणे अशा वागण्यार्याला attention seeker म्हणतात.
मग पुढील आयुष्यात कुणाचं लक्ष वेधून घ्यावं असं काही घडलं नाही. नाही म्हणायला, वैभवीच्या आई वडिलांचं लक्ष वेधून घेतलं, कारण इलाजच नव्हता. एकदा महिन्याच्या पगारापेक्षा क्रेडीट कार्ड वर जास्त खर्च केला म्हणून इन्कम tax अधिकाऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. स्क्रुटिनी झाल्यावर अधिकाऱ्यानेच मला १००० रु वरखर्चासाठी दिले. मागच्या महिन्यात २७ रु कमी सेल्स tax भरला म्हणून ही सेल्स tax अधिकाऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. यश आणि नील ही 5 स्टार क्याड्बरी वैगेरे आणली तरी ढुंकूनही बघेनासे झाले. त्यांच्या अपेक्षा म्हणे Mac D किंवा KFC सारख्या माझ्या खिशाला न परवडनार्या आहेत म्हणे.
एकंदरीत फारच गळचेपी होऊ लागली. कुणी बघायला तयार नाही.
शेवटी ती संधी फेसबुकने दिली. मित्रांच्या वाढदिवसाचे नोटिफिकेशन देवून. लक्षात आलं की सगळे जण वाढदिवसाच्या शुभेच्छा न्यूज फीड मध्ये किंवा टाईम लाईन वर देतात. इथे मी डाव साधला. मी इन बॉक्स मध्ये जाऊन शुभेच्छा टाकतो. अगदीच माहितीतलं असेल अन फोन नंबर पण असेल तर WA वर. अन दुसरं म्हणजे विविध डे च्या शुभेच्छा, सर्वपित्री अमावसे सारख्या सणांच्या शुभेच्छा, नेत्यांच्या शुभेच्छा या आपण दिल्या तर इतक्या पोस्टच्या भाऊ अन बहीण गर्दीत कोण बघणार त्यांच्याकडे , केवळ ह्या कारणासाठी मी तिकडे फिरकत ही नाही.
Hard core attention seeker, you know.
जे आहे ते आहे.

No comments:
Post a Comment