२ सप्टेंबर २०१५ ला माझी अँजिओप्लास्टी झाल्यावर मी खूपच गळपाटलो होतो. म्हंटलं कशाला ही आपण झकमारी करतोय. म्हणजे कंपनीची रिस्पॉन्सीबिलिटी घ्यायला आवडते पण त्याची किंमत म्हणून तब्येत कुर्बान होत असेल तर काय फायदा! १८ जानेवारी२०१६ ला सेटकोच्या बोर्ड ला सांगितलं "भावड्यानो, मला हे काही झेपत नाही आहे. म्हणजे इतकी घासून जर माझीच लागत असेल तर काय उपयोग" जेफ म्हणाला "जर तुझी तब्येत साथ देत नसेल तर सोड. But hand over your baby to some able hands" त्यात भरीस भर म्हणून की काय प्लास्टी नंतर पण माझ्या छातीत दुखणं चालूच होतं.
ही सगळी मेलामेली चालू असताना मला माझे मित्र यतीन तांबे यांनी क्रिसलीस अन पर्यायाने मनीष गुप्ता या माणसाबद्दल सांगितलं. खरं तर माझा या मॅनेजमेंट गुरु बिरु वर फारसा काही विश्वास नव्हता. अजूनही तसा कमीच आहे. वन मिनिट सक्सेस, एका दिवसात उद्योजक बना वगैरे मला बकवास वाटतं. यतीन ने सांगितल्यावर अजून एक रेफरन्स म्हणून नगरचा मित्र सुनील कानवडे ला मनीष गुप्ता सरांबद्दल बद्दल विचारलं. सुनील ने त्याच्या स्टाईल मध्ये सांगितलं "मंडल्या, xxx, पैसे भरत नसशील तर मी भरतो" त्याने माझी दुखरी नस बरोबर पकडली, या कंजूष माणसाकडून ही फीस काही भरली जाणार नाही. मला दुसरा पर्याय च नाही उरला. गुमान पैसे भरले.
मला ह्या कोर्स बद्दल एक खूप आवडलं होतं. कोर्स बारा सेशन चा होता अन प्रत्येक सेशन नंतर त्यातले लर्निंग तुम्ही कंपनीत इम्प्लिमेंट केलं की नाही याचा रिव्ह्यू आणि महिन्यातून एक पिअर मिटिंग.
आणि मग महिन्यातून एकदा मनीष गुप्ता एलियास एम जी त्यांच्या जादुई स्टाईल ने आम्हाला मॅनेजमेंट चे धडे शिकवू लागले. अफाट मेमरी, तल्लख विनोदबुद्धी आणि अफलातून वक्तृत्व या जोरावर कंपनी मॅनेजमेंट चे धडे एम जी आमच्यात उतरवत होते. प्रत्येक सेशन आधीच्या सेशन पेक्षा भारी असं आम्हाला हरएक लेक्चर ला वाटायचं. त्यांनी तो कोर्स पण तगडाच बनवला आहे म्हणा. त्या कोर्स मधल्या बऱ्याच गोष्टी आम्ही करायचो पण त्याकडे बघण्याची नवीन दृष्टी आम्हाला मिळाली. आणि काही गोष्टी पूर्णपणे नवीन शिकलो. लौकिकार्थाने मी एका मल्टी नॅशनल कंपनीचा एमडी. पण मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही की एकतर मला बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या किंवा मी त्यांचा अर्थ चुकीचा घेत होतो. आमच्या अमेरिकन पार्टनर ने आम्हाला हे शिकवण्याची कधी तसदी नाही घेतली. कदाचित हे इंडियन युनिट खूप लहान असेल किंवा कुणास ठाव, या अमेरिकन लोकांनाही हे माहित नसेल.
एकंदरीत ते बारा सेशन मी खूप एन्जॉय केले. एम जीं नी तर जीव तोडून शिकवलंच पण आमची ४०-४१ जणांची बॅच फार मस्त होती. आता कुणा एकाचं नाव नाही लिहीत, पण एकाहून एक वल्ली होते. क्लास मध्ये मजा करताना कधी वय आडवं नाही आलं आणि कंपनीचा टर्न ओव्हर पण. क्लासची दोस्ती बरकरार राहिली पाहिजे हीच इच्छा.
एम जी एक सेल्फ मेड माणूस आहे. अतुल खेर्डे एक शब्द वापरतो "स्वयंभू". तसा. उद्योजकता या माणसामध्ये नसानसात भिनली आहे. ४६ वर्षाचे एम जी, विशीपासून वेगवेगळे धंदे करताहेत. खरंतर सुखवस्तू घरात जन्माला आलेल्या एमजीं ना फॅमिली बिझिनेस चालवून आयुष्य व्यतीत करणं सहज शक्य होतं. पण त्यांनी वेगळी वाट चोखळली आणि अत्यंत कष्टपूर्वक क्रिसलीस नावारूपाला आणली आहे. आणि हो, ते हा सगळा प्रकार बिझिनेस म्हणून करतात. ते स्वतः ला इंट्रेप्रेन्युअर म्हणवून घेतात. त्यांच्या बिझिनेस कोच किंवा मॅनेजमेंट गुरु या उपाधीला उद्योजकतेमुळे एक झळाळी आली आहे. किंबहुना एखादा उद्योजक ज्या प्रॉब्लेम्स मधून जातो त्यातून ते गेले आहेत, जात आहेत. पण त्या प्रश्नांकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची कला त्यांच्याकडे आहे, म्हणून ते यशस्वी बिझिनेस कोच आहेत. आम्हालाही सांगतात "मी तुमच्या कडून वाजवून पैसे घेतो. पण रिटर्न मध्ये ताकदीचा कंटेंट देतो". सहा सव्वा सहा फुटाचे एम जी एखाद्या पिक्चरचे हिरो म्हणून सहज शोभले असते. आणि ते स्वतः ला ठेवतात पण चकाचक. समोरच्याला पण कडक राहायचा आग्रह करतात. वेळेच्या बाबतीत अत्यंत आग्रही असतात आणि उशीर केला तर समोरच्याची भीडभाड न ठेवता त्याची सॉलिड उतरवतात.
हं, तर कुठून चालू झालं होतं. तर अँजिओ प्लास्टी, डिप्रेशन, राजीनामा, छातीत दुखणं वगैरे. तर सांगायचं म्हणजे, छातीत दुखणं गेले पाच एक महिन्यापासून थांबलं आहे, जमेल तितकं काम ओढायचं ठरवलं आहे आणि बिझिनेस काही फार ग्लिटरिंग नाही आहे तरीही मी अत्यंत आनंदी फील करतो आहे. वर्तमान जरी फार मजेत नसेल पण भविष्याबद्दल खूप आशावादी वाटतं आहे. या पुढील उद्योजकतेच्या प्रवासात क्रिसलीस आणि पर्यायाने एम जी साथीदार असतील हे नक्की.
मनीष सर, तुमच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा, एकदम दिल से.

No comments:
Post a Comment