आज सिंहगडावर जरा लौकरंच गेलो, साडेपाच वाजता सकाळी. सात वाजता खाली उतरताना अचानक समोरून एक परिचित चेहरा आला. नीट बघितल्यावर लक्षात आले अरे हे तर आपले BJP चे उमेदवार श्री अनिल शिरोळे. घामेघूम झाले होते बिचारे. बरोबरचे एक जण म्हणाले "शिरोळे साहेब खास आपल्याला भेटण्यासाठी सिंहगडावर आले आहेत." नमस्कार झाला, मग मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. ते म्हणाले तुमचं तर मत हवंच पण मित्रांनाही सांगा. मला त्याक्षणी निर्भय, शरद, अविनाश आणि आनंद नरारे यांची फार आठवण आली. मनात म्हणालो तुमचं माहीत नाही पण तुमच्या नेतृत्वाचं कर्तृत्व मला भावत नाही (कसला सभ्य आहे ना मी). पण तोंडदेखलं हसलो आणि मार्गस्थ झालो.
फेसबुकवर वाचल्यामुळे का काय माहित आजकाल माझ्या राजकीय भावना फारच उचंबळून येतात. आणि मग मी उतरताना या उमेदवारांचा विचार करू लागलो. नैसर्गिकरीत्या पहिला विचार आला युवा तडफदार नेते राजकारणातील डेविड बेकहम, विश्वजित कदम यांचा. परत ते काँग्रेस चे, म्हणजे आपली एकदम आवडती पार्टी. अस्मादिक GPA मधून DME झाल्यावर (कसलं हार्वर्ड मधून MBA झाल्यासारखं टेचात लिहिलं आहे ना!) पिताश्रींना त्यांच्या चिरंजीवा बद्दल फारच विश्वास वाटू लागला आणि मग आम्हाला graduate engineer करण्याच्या मोहिमेवर ते लागले. COEP ला admission मिळणे हे दुरापास्त होतं. MIT कॉलेज मध्ये ₹ १५००० भरण्याची तयारी नसल्याने बाहेरचा रस्ता दाखवल्यावर मी आणि बाबा, सांगली चे SE श्री गायकवाड साहेब यांच्याबरोबर भारती विद्यापीठ येथे धडकलो. हो नाही करता, काही डोनेशन न भरता तिथे admission मिळाली. तेव्हा पंजावर शिक्का मारून या ऋणातून उतराई व्हावं कि काय या विचारात मी गड उतरू लागलो. पण एकंदरच वातावरण बघता हे काही योग्य वाटेना. मनमोहन सिंह यांचे आपण fan आहोत. पण त्यांची पण सद्दी संपली आहे सध्या.
अशा विचारातच मी भूतकाळात गेलो. दिनेश च्या दुकानात सोमवार पेठेत. त्या STD बूथ मधून माझे देशभरचे फोन व्हायचे. दिनेशची आई म्हणजे माउली च. माझ्यावर फार जीव. तिथे बसलो असताना दाढीधारी युवक आला. मावशींच्या पाया पडला आणि स्टूल वर बसला. मावशीनी ओळख करून दिली "ए दीपक, हे मंडलिक, engineer आहेत. लैच काम करत असतात." थोडाफार बोललो. आणि तो युवक गेला. मावशीनी विचारलं "ओळखलं का" मी नकारार्थी मान हलवल्यावर म्हणाल्या "ते दीपक पायगुडे, नगरसेवक आहेत. झळकणार बघ राजकारणात" मग त्यांनी दीपक कसा दिलदार आहे वैगेरे सांगितलं. मला फारच भारी वाटत होतं तेव्हा. शिवसेनेतून ते आता म न से त आले. पण काय करणार राज साहेबांचे विचार काही आपल्याला झेपत नाही.
अशा विचारातच घरी पोहोचलो. सिंहगड साथीदार वैभव जो घरातली कामंही करतो तो चहा पिउन खोली झाडू लागला. मी वैभव ला म्हणालो " तू आतली खोली झाड आणि मला दुसरा झाडू दे कारण आता मी सुद्धा झाडू हातात घ्यायची वेळ आली आहे" अशा रीतीने हातात घट्ट झाडू धरून मी घर साफ करू लागलो. मनात मात्र राजकारणाचे "वारे" खेळत होते.

No comments:
Post a Comment