मी मंडलिक, साधारण पणे मला मांडलिक या नावाने बोलावले जाते. जी लोकं फारच घाईत असतात, म्हणजे इंग्रजी स्पेलिंग पूर्ण वाचायचा हि त्यांना वेळ नसतो ते मला महाडिक असे बोलावतात. ज्यांना ऐकायचा वेळ नसतो ते मला पुंडलिक नावानेही बोलावतात. काल तर गम्मत झाली. तो कुरियर वाला मला कुंडलिक म्हणून बोलवत होता. असो आडनावामुळे गमती होत असतात. त्यावरून आठवलेलं.
कॉलेज मध्ये आमचे दोन मित्र. मिलिंद जगन्नाथ जोशी आणि मिलिंद रामचंद्र जोशी. आता बोलवावं तर लागायचंच. "ए, अरे मिल्या जोश्याला बोलाव रे." आता या प्रश्नांवर कोणता मिल्या जोशी हा प्रतिप्रश्न यायचाच. बरं या दोघांची अंगकाठी अन रंग पण सारखाच. दोघानाही डोक्यावर केस. म्हणजे कॉलेज मधल्या प्रचलित हाका "जाड्या किंवा बारक्या" "लंब्या किंवा बुटक्या" "काळ्या किंवा गोऱ्या" "टकल्या आणि केसवाल्या" हि अशी वर्गवारी पण करता येणं अवघड.
मग यावर मार्ग काय? तर एक दिवशी कुणी तरी म्हणालं "मिल्या जोशी ला बोलाव ना राव" तर कुणीतरी विचारलं "अरे जगन्नाथाचा कि रामचंद्राचा". झालं, ती प्रथाच चालू झाली. मिल्या जोशीला ला बोलाव म्हंटल कि पुढचा प्रश्न "जगन्नाथाचा कि रामचंद्राचा".
कॉलेज मध्ये कॉरिडोर मध्ये जात असताना एके दिवशी लेक्चर ला जात असताना साधारण ४०-४५ च्या गृहस्थाने मला अडवले. आणि कुठली ब्रांच वैगेरे विचारलं आणि पुढे म्हणाले "मिलिंद जोशीला ओळखतोस का?" मी विचारलं "कोण, जगन्नाथाचा कि रामचंद्राचा?" तर ते चपापले असावेत, अन लागलीच सावरून म्हणाले "जगन्नाथाचा". मी पण क्लासला जायच्या तिरमिरीत, बाजूने जाणार्या प्रदीप ला सांगितलं "ए जरा, जगन्नाथाच्या मिल्या जोशीला बोलाव रे" आणि त्या गृहस्थाला विचारले "कोण आलं म्हणून सांगू?"
तर देवदास मध्ये "डोला रे" गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या बघताना जसे माझे बुब्बुळे फिरतात अगदी तसेच माझ्याकडे अन माझ्यापेक्षा सावळ्या असलेल्या प्रदीप कडे बघत ते गृहस्थ कडाडले "मी जगन्नाथ जोशी"
फूटलोच आम्ही.

No comments:
Post a Comment