सकाळचे पाच वाजलेत. पुणे एयरपोर्टला बसलो आहे.
या एयरपोर्टवर मला वेगवेगळे स्त्री पुरूष नेहमीच दिसतात. त्यात माझं लक्ष वेधून घेतात म्हणजे.......................
नाही नाही, आज कोणतीही कन्यका नाही, सुंदरी नाही किंवा बर्फ़ी नाही. आज फक्त पुरूष. (राजेश, इतका बिघडला असशील असं वाटलं नव्हतं हो.)
तर सकाळी ४:३० किंवा ५ वाजता मोबाईलमधे तोंड घालून गुलूगुलू बोलणार्या लोकांबद्दल मला विलक्षण कुतूहल वाटतं. पण त्यापेक्षा या भोरप्रहरी लँपटॉपवर कीबोर्ड बडवून एक्सेल वर काम करणारे किंवा इमेल ला उत्तर देणारे बघितले की मला आदराचं भरतं येतं. हा प्रकार काही मला आयुष्यात जमला नाही.
सेल्सच्या कामाला जुंपल्यानंतर माझे प्रवास एकतर बसने व्हायचे किंवा मग रेल्वेने. त्यावेळेला पहिला छंद होता लोकांशी गप्पा मारणे. "काय मग, कुठे निघाले" साधारण या प्रश्नाने सुरूवात होणारी गप्पाची मैफल, दुसर्या दिवशी सकाळी "चला, भेटू मग कधीतरी" या निरोपाने व्हायची. या प्रवासात मला एशियन गेम रौप्यपदक विजेता भेटला, केवळ रेल्वेप्रवासात आराम मिळतो म्हणून विमानप्रवास टाळणारे कंपनीचे मालक भेटले, काही कथा भेटल्या तशाच व्यथाही, काही विदेशी मंडळी भेटली ज्यांना भारताबद्दल सांगताना रंगून जायचो.
दुसरी मला साथ दिली ती वाचनाने. या प्रवासात मी इतकी पुस्तकं वाचली आहेत की गणना नाही. ३-४ पुस्तकं मी घेऊनच जायचो. एकदा मी महानायक वाचत होतो. नेताजींचा युनिफॉर्मचा फोटो त्यावर अन माझा मिलीटरी कट. एक कन्यका बाजूलाच होती बर्थवर, म्हणजे बसली होती. पापण्या फडफडवत ती म्हणाली "Are you in defense?" आता हो म्हणावं तर पुढचे प्रश्न "कुठे पोस्टींग, काय पोस्ट, बॉर्डरवर कधी होता का" यावर थापा तर मारता आल्या असत्याही. पण मग स्टेशनवर उतरून पाण्याची बॉटल आणा. आणि हे सगळं करताना ती मधेच म्हणायची "भैया, जरा वडापाव लाना मेरे लिये प्लीज़" झालं, भैया, म्हणजे मग थापा सगळ्या पाण्यात. मी आपलं नाही म्हणून टाकलं. तिचा हिरमुसलेला चेहरा आजही लक्षात आहे.
तर लँपटॉप चा प्रवेश माझ्या आयुष्यात झाला. १९९९-२००० साली. ती लँपटॉपची बँग गळ्यात अडकवून फिरताना खांदे भरायचे, पण लोकांच्या कुतुहुलमिश्रीत नजराच ते उचलायचं बळ द्यायच्या. मी पण इतर लोकांसारखं रेल्वेत किंवा विमानतळावर मेल ला उत्तर द्यायचा अभिनय करायचो पण का कोण जाणे मला ते कधीच जमलं नाही. लोकांचं बघून मी एकदा चेन्नै हून येताना मालिका शेरावत च्या मर्डर ची सीडी घेतली. ५० रुपयाला. खूप excited होतो. जेवण वगैरे झाल्यावर मस्त मांडी घालून सरसावून बसलो. तर च्यामायला सेन्सॉर बोर्डाने महेश भट ला negotiations मध्ये पाठवलेली पहिली सीडी असावी. कारण चुंबनविशारद इम्रान हाशमी आणि अल्पावस्त्रांकिता मलिका यांचा एकही प्रणय सीन नसणारी ती महाभयानक सीडी होती. (मग नंतर मांडवली झाल्यावर पूर्ण पिक्चर बाहेर आला). इतका हिरमोड झाला कि तेव्हापासून आजतागायत सीडी म्हणून पहिली नाही कि ऐकली नाही. त्यावर मागच्या बाजूला तमिळ मध्ये काहीतरी लिहिलं होतं. "मुर्खा, ५० रुपयात यापेक्षा जास्त नाही बघायला मिळणार" असे लिहिले असेल असं मला वाटलं.
आता तर मी प्रवासात आय पॅड वापरतो. दोन चार वाक्यात मेल ला उत्तर असेल तर उजवतो, नाहीतर सांगतो नंतर लिहितो म्हणून. बाकी वेळेस हेच ब्लॉग लिहिणे. १६७ पैकी किमान सत्तर ब्लॉग्स चं बाळंतपण विमानतळावर झालं आहे नाहीतर रेल्वेत.
हे आपलं असं आहे
बाकी निवांत

No comments:
Post a Comment