ग्रीसच्या फेडरल बँकेत नुसती लगबग चालू होती. तिथले लिडींग फंड मॅनेजर १०० बिलीयन युरोची व्यवस्था कशी करता येईल याच्या विंवचनेत होते. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड कडूनच आता जी काय आशा होती. बाकी जर्मनी आणि फ्रान्सने तर आता सप्लाय बंद करून टाकला होता. बाकी स्कँडेनेवियन देश तर त्यांना वार्याला उभं राहू देत नव्हतं. आयएमएफ बरोबरच, नव्याने उभ्या राहिलेल्या ब्रिक्स बँक काही लोन देईल का याची चाचपणी ग्रीसचे राष्ट्रप्रमुख करत होते. पण कुठून ही आशेचा किरण दिसत नव्हता.
इकडे चायना राष्ट्रीय बँकेचे चेयरमन कॅश रिझर्व्ह चेेक करत होते. १.५ ट्रिलीयन डॉलर्सच्या रिझर्व्हचा योग्य विनियोग करा अशा स्पष्ट सूचना चायना प्रिमीयरने त्यांना दिल्या होत्या. पोलिटब्युरोमधल्या आंतरराष्ट्रीय संबंधातल्या तज्ञाने सांगितलं होतं की पाश्चिमात्य जगात चीनला पाय रोवायचे असतील तर तिथे प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. ग्रीस, वक्रदृष्टी पडली होती चीनची. २५० बिलीयनची युरोची संघाची देणी आणि देश चालवण्यासाठीचे १०० बिलीयन युरो टाकले की जगातल्या जुन्या संस्कृतीचा पाईक चीनच्या कवेत येणार होता. परत युरोपियन संघाच्या विविध देशामधे चीनमधल्या धनिकांनी केलेल्या प्रचंड गुंतवणूकीवर बारीक नजर ठेवता येणार होती.
ग्रीसच्या मंत्रीमंडळाची बैठक चालू झाली होती. जगातल्या सर्व देशांनी तसेच ,IMF ने मदत करण्याची असमर्थता दर्शवल्यावर चीनच्या प्रस्तावावर विचार चालू झाला. गोम अशी होती की, इथे मदत वैगेरे प्रकार नव्हता. तर प्रस्ताव होता आउटराईट पर्चेसचा. चीनने ग्रीस देशच विकत घ्यायची तयारी दाखवली आहे. पण मग त्यांच्या पोलादी साम्यवादाला आपण कसं सामोरं जायचं यावर सगळेच चिंतीत होते. पण आर्थिक परिस्थितीच इतकी चिघळली होती की दुसरा काही पर्याय डोळ्यासमोर येत नव्हता. Finally, it was a question of survival.
अथेन्स शहराच्या मुख्य चौकात भव्य शामियाना उभारला होता. ग्रीक लोकसंख्यपैकी पाव लोकं तरी चौकात दाटीवाटीने उभे होते. चीनमधील किमान दहा एक लाख लोकं चौकात आले होते. युरोपमधील सर्व विमानतळांचे हँगर्स चायनीज चार्टर्ड प्लेनने भरून गेले होते. बरोबर १२ च्या ठोक्याला चायनीज प्रिमीयर आणि ग्रीक पंतप्रधान खुर्चीवर विराजमान झाले. आणि पाचच मिनीटात दोघांनी त्या दीडहजार पानी MOU वर दोघांनी सह्या केल्या. स्क्रीनवर ते दिसताच ग्रीक हमसाहमशी रडू लागले. करणार काय, ऐषोआराम आणि निष्काळजी पणामुळे अख्खा देश त्यांना विकावा लागला. ग्रीसचं राष्ट्रगीत वाजू लागलं शेवटचं आणि त्यांचा राष्ट्रध्वज उतरू लागला. ग्रीक लोकांची ओळख पुसुन जाण्याची ती नांदी होती. चीनच्या राष्ट्रगीताबरोबरच त्यांचा राष्ट्रध्वज ग्रीसच्या पार्लमेंटवर डौलाने फडकू लागला. आणि आकाशात अक्षरं चमकू लागली.
Greece, ROC (A China Undertaking)
ग्रीस, चीनचा अंगीकृत व्यवसाय.

No comments:
Post a Comment