एक असतो शाम अन एक असतो राम्या. दोघं एकाच वर्गात. लहानपणी शाम अगदी टापटिपीचा. परीटघडीचे कपडे, चापून चुपून पाडलेला भांग, सुरेख रचलेलं दप्तर, अक्षर वळणदार. तर राम्या एकदम गावंढळ. कसातरी खोचलेला शर्ट, शक्यतो सेकंड हँड पुस्तके, अन दप्तरात कोंबलेल्या वह्या. शाम मास्तरांनी सांगितल्या हुकुमबर करणार, तर राम्याचं लक्ष मात्र मैदानावर. शाम मैदानाच्या बॉर्डर वरून हाताची घडी घालून फिरणार. तर राम्या मैदानावर झोकून देणार. शाम आणि राम्या यथावकाश दहावी झाले. आश्चर्य म्हणजे राम्याला शाम पेक्षा जास्त मार्क पडले. तर शामचे वडील राम्याला म्हणाले "शाम ला कमी मार्क पडले ते ठीक आहे. बोर्डाची चूक झाली असेल. पण राम्या गधड्या तुला कसे इतके जास्त पडले." राम्या गप्प बसला. शाम आणि राम्याची दोस्ती अबधित राहिली.
पुढं मग शाम गेला व्ही जे टी आय ला डिप्लोमा करायला तर राम्या रत्नागिरीला. शाम पण पास झाला अन राम्या ही पास झाला. इथे मात्र शामला बक्कळ जास्त मार्क भेटले राम्या पेक्षा. शामचे वडील आता नागपूरला होते. आर बी आय मध्ये. शामला व्ही आर सी ई ला admission मिळाली. राम्याला मात्र LIT मिळाली. शाम नागपुरात तर राम्या हॉस्टेल ला. सेकंड ईयर ला एम ३ असतं. डिप्लोमा वाले हमखास गचकायचे. गंमत म्हणजे राम्या झाला पास पहिल्या शॉट मध्ये. शाम मात्र दोन तीनदा पेपर देऊन सुटला. एम ४ ला शामचे वडील म्हणाले "अरे राम्या तूझं गणित चांगलं आहे वाटतं. आमच्या घरी येउन राहत जा आणि आमच्या शामला तुझी गणिताची वही दाखवत जा" शामच्या आईचा राम्यावर खूप जीव. ती त्याला चांगलं चुंगलं खाऊ पिऊ घालायची. शाम एम ४ पास झाला. शाम आणि राम्याची दोस्ती अबाधित राहिली.
दोघं सिव्हिल इंजिनियर झाले. शाम लागला शापूरजी पालनजी मध्ये. ब्रिज डिझाईन ला तर राम्या लागला मोठया बिल्डर कडे, साईट वर. शामची व्हाईट कॉलर टाईट तर राम्या मजुरांना हाकतोय. शाम ला मिळाला परदेशात प्रोजेक्ट. ऑस्ट्रेलिया चा. तेव्हा राम्या मोठया बिल्डर कडून छोटया बिल्डर कडे. काय झालं माहित नाही, पण शामला परदेशात काही झेपलं नाही. राम्याने एकदा फोनवर खूप समजावलं. थोडीशी कळ काढ पण जमव तिकडेच बस्तान. पण शाम प्रोजेक्ट अर्धवट टाकून आला. परत डिझाईन ला. राम्याने त्याचं मिठी मारून स्वागत केलं. शाम आणि राम्याची दोस्ती अबाधित राहिली.
शाम आणि राम्या फोनवर बोलायचे, पण शामची मर्जी असेल तर. राम्या मात्र शामचा फोन आला की असोशीने बोलणार. राम्याने कधी फोन केला तर मात्र शाम मिटिंग मध्ये असणार. "I will call you back" टापटिपीचा शाम फोन टाळत राहिला, गावंढळ राम्या करत राहिला. शाम च्या वैवाहिक जीवनात हलकेसे वादळ उठले. शामच्या सासरेबुवांनी राम्या आणि त्याची गावाकडची बायको मंजुषा यांना घरी बोलावले. शामला नीट समजावून सांगा त्यांच्या पोरीला नीट नांदव म्हणून. राम्या आणि मंजुषाने आपापल्या परीने सांगितलं. शामचा संसार मार्गी लागला. शाम आणि राम्याची दोस्ती अबाधित राहिली.
शाम आणि राम्या, दोघांचेही करियर आकार घेऊ लागलं. राम्याने मग धंद्यात उडी घेतली. ब्रिज construction साठी उपकरण बनवू लागला. शापूरजी पालनजी राम्याचा कस्टमर होऊ शकत होता. शाम ने थोडा जरी शब्द टाकला तर नक्कीच. शब्द टाकणं तर दूरच पण शामने राम्याला कधी विचारलं ही नाही तू काय बनवतोस म्हणून. थोडी वर वर विचारपूस करायची बास. तरीही एकदा बाहेरच्या संदर्भाने शामला शापूरजी मध्ये भेटायला बोलावलं, देशपांडे साहेबाने. राम्या देशपांडे साहेबाच्या समोर बसला होता ते शामने पाहिलं. शाम साहेबाची केबिन उघडून आत आला. राम्याला वाटलं, आता शाम आपल्याबद्दल सांगेल, प्रोडक्ट बद्दल सांगेल. पण नाही, शामने देशपांडेशी हवापाण्याच्या गप्पा मारल्या अन राम्याकडे ढुंकूनही न बघता निघून गेला. राम्याच्या हृदयात बारीकशी कळ उमटली. मिटिंग झाल्यावर राम्या आपुलकीने शामला भेटला. जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात दोघांनी आपापल्या बायको पोरांच्या चौकश्या केला. राम्या दु:खी मनाने चालू लागला.शाम आणि राम्याची दोस्ती अबाधित राहिली.
शाम तसा अबोल, अन राम्या मात्र बडबड्या. शामशी तर बोलणारच पण शाळा कॉलेज मधल्या पोरांशी गप्पा टप्पा. राम्याने शाळेतले पोरं बोलावली, संजय, महेश, सुरेश, संदीप. शामला ही बोलावलं. शामने विचारलं "कोणा कोणाला बोलावलं आहेस" राम्याने सांगितली सगळ्यांची नावं. शाम म्हणाला "ही पोरं येणार असतील तर मी येणार नाही" शामची अटीयुक्त मैत्री बघून राम्याची सटकली. राम्याने शामचे आतापर्यंतचे सगळे गुन्हे माफ केले होते. पण हे मात्र अति झालं.
शाम आणि राम्याची दोस्ती बाधित झाली.
शाम आणि राम

No comments:
Post a Comment