माजी राष्ट्रपती गेले. समानार्थी शब्द वापरल्याने लोकं पोस्ट वाचतात, म्हणून ही आयडिया. आकाशवाणीवर राष्ट्रीय दुखवटा चालू आहे. त्यामुळे रेडियोवर मुकेश, तलत, मन्ना डे, रफीसाहेब, किशोरदा, लताबाई अशा सर्व दिग्गजांची रडकी गाणी लागताहेत.
आश्चर्य हे आहे की ही गाणी रडकी असली तरी मनाला खुप शांती देतात. कंपनीतून घरी आलो की गुणगुणतच वरती येतो. तलतचं "जिंदगी देनेवाले सुन" लागलं की डेस्टिनेशनला पोहोचलो तरी गाडीत बसून गाणं ऐकत बसलो आहे, मुकेशचं "आसू भरी है ये जीवन की राहे" लागलं की मुद्दामून लांब फिरून परत येतो आहे, "कर चले हम फिदा" लागलं की आंवढे गिळत कार चालवतो आहे, "मन रे तु काहे ना धीर धरे" लागल्यावर काल मला उजवीकडे कर्वे रोडला वळायचं होतं, तर सरळ अलका टॉकीज ला आलो. अशा गमतीजमती चालू आहेत.
दुखवटा संपला तरी या गाण्याची आठवण येत राहील.
एखादं फक्त रडक्या गाण्याचं रेडियो एफ एम चॅनल चालू करावं का?
१०० मेगाहर्टझ वर ऐका एफ एम: रेडियो अश्रू,
रेडियो अश्रू, रेडियो अश्रू
अश्रू बहनेवाले ऑलवेज खुश, ऑलवेज खुश.
म्हातारा बितारा झालो की काय, च्यामायला?
No comments:
Post a Comment